Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जतीन मेन्स वेअर वणी
WANICITY.COM
जतीन मेन्स वेअर वणी
wanicity.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
६४ वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा साध्या पद्धतीने साजरा
६४ वा धम्मचक्र प्रवर्तनदिन सोहळा साध्या पद्धतीने साजरा
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे स्टेशन व तक्षशिला महिला मंडळ विठ्ठलवाडी यांच्या विद्यमाने ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी १४ ऑक्टोबर १९५६ च्या ऐतिहासिक धम्म दिक्षा सोहळ्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. विठ्ठलवाडी येथील बुद्ध विहारात तक्षशिला महिला मंडळाच्या अध्यक्षा अर्चना कांबळे यांच्या मार्गदर्शनात धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा घेण्यात आला तर रेल्वे स्टेशन येथे आजी माजी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर घडविलेली धम्मक्रांती निरंतर स्मरणात रहावी म्हणून दरवर्षी देशात ठिकठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येतो. परंतु यावर्षी देशात कोरोनाचे संकट आल्याने प्रत्येकचं उत्सव सोहळे मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साजरे करण्याचे शासनाचे आदेश असल्याने धम्मचक्र प्रवर्तनदिनही साध्या पद्धतीनेच साजरा करण्यात आला. <p>शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळ सेवानिवृत्त व विद्यमान रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मागील ३५ वर्षांपासून नित्य नियमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध या महामानवांच्या जयंत्या, महापरिनिर्वाणदिन, धम्मचक्र प्रवर्तनदिन, नामांतरदिन, संविधान दिवस आदी कार्यक्रम साजरे करण्यात येतात. तत्कालीन रेल्वे कर्मचारी सोपान धवन, किसन भगत, विठ्ठल नागराळे, कैलास बोरकर, बबन भगत, पांडुरंग गजभिये बु. कृष्णाजी चंदनखेडे व बु. मुकिंदा गरपाल यांच्या पुढाकाराने रेल्वे स्टेशन येथे पंचशील झेंडा बसविण्यात आला. यांच्याच धम्मकार्याच्या ओढीतून याठिकाणी कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली. आर्थिक जुळवणुकीपासून निघणाऱ्या मिरवणुकीपर्यंत त्यांच्याच योग्य नियोजनाने प्रत्येक धम्मकार्य पार पडायचे. बुद्धभिम गीतांचे कार्यक्रम, प्रबोधनात्मक कार्यक्रम, कव्वाली, मनोरंजनात्मक कार्यक्रम, वऱ्हाडी हास्य कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम त्यांच्या कार्यकाळात शिस्तबद्ध पद्धतीने पार पडायचे. कार्यक्रमांच्या आयोजनापासून तर नियोजनापर्यंतची सर्व जबाबदारी कुशलतापूर्वक पार पाडण्यात ते तरबेज होते. त्यांच्या कार्यकाळात बुद्ध भीम जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याने रेल्वे स्टेशनची शहरात वेगळीच ख्याती निर्माण झाली होती. कालांतराने ही रेल्वे कर्मचाऱ्यांची सशक्त टीम सेवानिवृत्त झाली व धम्मकार्याची धुरा तरुण पिढीकडे सोपऊन ते मार्गदर्शनाचे काम करू लागले. त्यांच्या धम्मकार्याची प्रेरणा घेऊन तरुणांनी जयंती उत्सव समितीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली व ती पुढे नेण्याचा पुरेपूर प्रत्नही केला. पण म्हणतात ना, जुनं ते सोनं असतं, तरुणांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा तर घेतली पण त्यांची कार्याप्रती असलेली तळमळ तरुण पिढीने आत्मसात केली नाही. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर एकाही प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन झाले नसले तरी तरुण पिढीने धम्मकार्य थांबू दिलं नाही. बुद्ध भीम जयंतीची मिरवणूक आजही ऐटितच काढली जाते. पण नियोजनाचा अभाव नेहमीच राहिला आहे. विद्यमान रेल्वे कर्मचारी, सेवा निवृत्त रेल्वे कर्मचारी व तरुण पिढी आपसात सांगड घालून जयंती उत्सव समितीचे सर्वच कार्यक्रम पार पाडत आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा आजचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदीच साधेपणाने साजरा करण्यात आला.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सणासुदीच्या काळात भडकतात आवश्यक वस्तूंच्या किमती
सणासुदीच्या काळात भडकतात आवश्यक वस्तूंच्या किमती
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p <p>विजया दशमी व धम्मचक्र प्रवर्तनदिना निमित्त पारंपरिक वस्तूंच्या खरेदीकरिता शहर आज कोरोनाच्या सावटातही नागरिकांच्या गर्दीने फुलून दिसत होते. रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या बाजाराला नागरिकांच्या मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाने आणखीच साज चढला होता. हारफुलांबरोबरच तोरण पताका, मिठाई, प्रसाद, घेणाऱ्यांची लगबगही दुकानदारांचा हात रिकामा राहू देत नव्हती. सण उत्सवांच्या या काळात नागरिकांचा उस्ताह व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. प्रत्येक जण पारंपरिक पूजेकरिता लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्याच्या लगबगीत दिसत होता. आजचा दिवस गाजवला तो फुलहार विक्रेत्यांनी. हारांच्या किमती आज दुपटीने वाढल्या होत्या तर फुलांचे भाव गगनाला भिडले होते. सायंकाळ होता होता फुलांचा तुटवडाही निर्माण झाला होता. आजच्या दिवशी सायकल पासून तर जड वाहनांपर्यंत सर्वच लोखंडी वस्तुंना धून पुसून हारे फुले वाहण्यात येतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी फुल हारांना विशेष महत्व प्राप्त होत असते. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळाही ठिकठिकाणी साजरा होत असल्याने फुल हारांना विशेष मागणी असते. हीच संधी कॅश करण्याच्या हेतूने सणासुदीच्या काळात आवश्यक वस्तूंच्या भरमसाठ किंमती वाढविण्यात येतात. आज फुलं खरेदी करतांना नागरिकांच्या अंगावर काटे येत होते. हारांच्या किमती ऐकून कानांवर विश्वास बसत नव्हता. सण उत्सवात मागणी असणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढविण्याची जणू प्रथाच झाली आहे. लॉकडाऊन काळात नैराश्य आलेल्यांना सणासुदीच्या काळातील आनंदही वस्तूंच्या वाढणाऱ्या किमतींमुळे पूर्णपणे उपभोगता येत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दसरा दिवाळी हे मोठे सण असल्याने सामान्य माणूसही परिवारासह हे महत्वाचे सण आनंदात साजरे करण्यास धडपडत असतो. पण नेमके सणांना हेरूनच आवश्यक वस्तूंच्या किमती वाढविण्यात येत असल्याने नाईलाजास्तव सामान्यांना आपल्या आनंदावर पाणी सोडावे लागत असल्याचे प्रत्येक वेळीच पाहायला मिळते. तेंव्हा सणासुदीच्या काळात वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे. नाही तर प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळीही सामान्यांना दुसऱ्याच्या आनंदातच आपला आनंद मानून डोळ्याचे पारणेच फेडावे लागतील.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
दोन दिवसांत चार व्यक्तींना झाली कोरोनाची लागण
दोन दिवसांत चार व्यक्तींना झाली कोरोनाची लागण
corona update २५ oct <p></p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>शहरात कोरोनाची लागण लागण होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य झाले असून प्रतिदिन आढळणाऱ्या रुग्णांमध्येही कमालीची घट झाली आहे. काल तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तर आज केवळ चार कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७५९ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८ झाली आहे. दोन दिवसांत आठ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ६९० रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी परतले आहेत. <p>शहर व तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर रोख लागल्याने रुग्णसंख्याही अतिशय संथ गतीने वाढत आहे. आज ५१ नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ४ पॉझिटिव्ह तर ४७ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ११ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून सर्वच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंतचे संपूर्ण तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. आज एकाही व्यक्तीचा स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे आरटी पीसीआर तपासणीचे अहवाल अप्राप्त राहिलेले नाहीत. आता पर्यंत तालुक्यात २६१० व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली तर २९१० व्यक्तींची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. आज चार व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा ६५९ वर पोहचला असून ६९० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ६८ वर आला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, १२ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयामध्ये तर ३ रुग्ण कोविड केयर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये मुकुटबन येथील दोन, गडचांदूर येथील एक तर तेजापूर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
केंद्राकडून अतिरिक्त जमिनींची होणार विक्री; रेल्वे, संरक्षण मंत्रालयाकडे २९.७५ लाख एकर जमीन...Read More
WWW.LOKMAT.COM
केंद्राकडून अतिरिक्त जमिनींची होणार विक्री; रेल्वे, संरक्षण मंत्रालयाकडे २९.७५ लाख एकर जमीन...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पूर्णा पटना साप्ताहिक एक्सप्रेस वनी वरून सुरु
पूर्णा पटना साप्ताहिक एक्सप्रेस वनी वरून सुरु
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका प्रवासी रेल्वे वाहतुकीलाही चांगलाच बसला. जनसंपर्कातून कोरोनाचे संक्रमण वाढू नये याकरिता संपूर्ण प्रवासी रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्याने रेल्वेला कोट्यावधीचा आर्थिक तुटवडा सहन करावा लागला. परंतु आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर रेल्वेची प्रवासी वाहतूकही टप्याटप्याने सुरु करण्यात आली. थांबलेली रेल्वे प्रवासी वाहतुकीची चाके आता धावू लागली आहेत. रेल्वेच्या प्रवासी गाड्यांनी प्रवाशांचा ठिकठिकाणचा प्रवास सुरु झाला असला तरी तालुक्यातील जनतेच्या रेल्वे प्रवासाची धुरा सांभाळणारी एकमेव दैनंदिन प्रवासी रेल्वे गाडी नंदीग्राम एक्सप्रेस अद्यापही वणी मार्गे नागपूरपर्यंत वाढविण्यात न आल्याने तालुकावासीयांचा चांगलाच हिरमोड झाला असताना २३ ऑक्टोबर पासून पूर्णा पटना साप्ताहिक प्रवासी रेल्वे गाडी सुरु झाल्याने तालुक्यात रोजगारानिमित्त वसलेल्या परप्रांतीय जनतेच्या प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे. <p>कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने प्रवासी रेल्वे वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. परंतु आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्याने रेल्वे प्रवासी वाहतूक टप्याटप्याने सुरु करण्यात येत आहे. ठिकठिकाणच्या रेल्वे प्रवास सुरु झाला असताना तालुक्यातील रेल्वे प्रवासाला प्राथमिकता देणारी जनता नंदीग्राम एक्सप्रेस सुरु होण्याची चातका सारखी वाट पहात असताना ही गाडी नांदेड पर्यंतच येत असल्याचे कळल्याने तालुक्यातील प्रवाशांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. २३ ऑक्टोबर पासून पूर्णा पटना ही साप्ताहिक प्रवासी रेल्वे गाडी सुरु करण्यात आल्याने परप्रांतीय प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात शेकडो परप्रांतीय नागरिक रोजगारानिमित्त वसले आहेत. दिवाळी साजरी करण्याकरिता ते आपापल्या गावी जातात. दिवाळीच्या मुहूर्तावर पूर्णा पटना ही साप्ताहिक रेल्वे प्रवासी गाडी सुरु झाल्याने परप्रांतीयांचा प्रवासाचा मार्ग सुकर झाला आहे. पुर्णाहून पटनाकडे जाणारी रेल्वे सोमवारला रात्री १२.४५ वाजता वणी स्थानकावरून सुटते तर पटनाकडून पूर्णाकडे जाणारी रेल्वे सोमवारलाच रात्री ११.१० वाजता वणी स्थानकावरून सुटते. लॉकडाऊन आधी वणी रेल्वे स्थानकावर वरून चार साप्ताहिक रेल्वे जायच्या. त्यामध्ये कोलकाता नांदेड संत्रकांजी एक्सप्रेस, धनबाद कोल्हापूर दीक्षाभूमी एक्सप्रेस, काजीपेठ मुंबई ताडोबा एक्सप्रेस व पूर्णा पटना एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश होता. त्यापैकी २३ ऑक्टोबर पासून पूर्णा पटना ही साप्ताहिक रेल्वे प्रवासी गाडी सुरु झाली आहे. वणी वासियांना आता वेध लागले आहे ते नंदीग्राम एक्सप्रेस सुरु होण्याचे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जतीन मेन्स वेअर वणी
WANICITY.COM
जतीन मेन्स वेअर वणी
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जैताई माता मंदीर लाईव्ह दर्शन...Click Here
WWW.FACEBOOK.COM
जैताई माता मंदीर लाईव्ह दर्शन...Click Here
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
नागपुरात पोलीस शिपायाच्या मुलाच्या अपहरणाने खळबळ...Read More
WWW.LOKMAT.COM
नागपुरात पोलीस शिपायाच्या मुलाच्या अपहरणाने खळबळ...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जतीन मेन्स वेअर वणी
WANICITY.COM
जतीन मेन्स वेअर वणी
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तलवार हातात घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या आरोपीस अटक
तलवार हातात घेऊन परिसरात दहशत माजविणाऱ्या आरोपीस अटक
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>शहरातील मोक्षधाम समोर हातात तलवार घेऊन धुमाकूळ घालत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सेवानगर येथील तरुणाला डीबी पथकाने अटक करून त्याच्यावर मपोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रितिक अनिल बिसमोरे (१९) रा. सेवानगर असे या तलवारीने धुमाकूळ घालणाऱ्या आरोपीचे नाव आहे. <p>लॉकडाउन शिथिल होताच शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण वाढीस लागले आहे. शहरातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी शहरात धुमाकूळ घालतानाच भाईगिरीचा प्रपोगंडा अवलंबला आहे. शहरात हाणामारीच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत. आता तर अपप्रवृतीच्या लोकांची मजल घातक शास्त्रांनी वार करण्यापर्यंत गेली आहे. पोलिसांची गुन्हेगारांवर असलेली वचक सैल होताना दिसत आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक न उरल्याने शहरात भाईगिरी प्रवृत्ती वाढत चालली आहे. दीपक चौपाटी व त्या सभोलतालचा परिसर गुन्हेगारी कारवायांचा केंद्र बिंदू बनला आहे. या परिसरांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती चांगलीच फोफावली आहे. दीपक चौपाटी येथे झालेल्या हाणामारीच्या घटनांत एकाचा बळी गेला आहे तर एकाचा जीव थोडक्यात बचावला आहे. आज २४ ऑक्टोबरला सकाळी ९ ते ९.३० वाजताच्या सुमारास एक तरुण हातात तलवार घेऊन मोक्षधाम परिसरात धुमाकूळ घालत नारीकांमध्ये दहशत पसरवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळ गाठत तलवारीसह आरोपी रितिक बिसमोरे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर भादंवि च्या कलम २६९, सह कलम ४/२५ आर्म ऍक्ट, सह कलम १३५ मपोका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. <p>पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शेतमजुराची गळफास घेवून आत्महत्या, मारेगाव तालुक्यात आत्महत्या चे सत्र सुरूच
WWW.SAHYADRINEWS.ONLINE
शेतमजुराची गळफास घेवून आत्महत्या, मारेगाव तालुक्यात आत्महत्या चे सत्र सुरूच
sahyadrinews.online
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का
WWW.ESAKAL.COM
आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
एकमेकांच्या हाताला रुमाल बांधून प्रेमीयुगुलाने घेतली वैनगंगा नदीत उडी; पोलिसांकडून शोध सुरू...Read More
WWW.ESAKAL.COM
एकमेकांच्या हाताला रुमाल बांधून प्रेमीयुगुलाने घेतली वैनगंगा नदीत उडी; पोलिसांकडून शोध सुरू...Read More
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
5 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
काचेने मानेवर वार करून इसमाला केले जख्मी
काचेने मानेवर वार करून इसमाला केले जख्मी
</p>प्रशांत चंदनखेडे वणी (9738181616)<p> <p>जुन्या वादातून दोघा जणांनी एकाच्या मानेवर काचेने वार केल्याची घटना शहरातील दीपक चौपाटी परिसरातील करण बार समोर २२ ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास घडली. रवी रामराव गाढवे (४१) रा. रामपुरा वार्ड असे या जख्मी झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. <p>दीपक चौपाटी येथे गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले असून अपप्रवृतीच्या लोकांचा दीपक टॉकीज परिसर मुख्य अड्डा बनला आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून येथील गुन्हेगारीच्या घटना वाढू लागल्या आहेत. शहरातील संपूर्ण बाजारपेठेबरोबरच मंदिरालयांचीही वेळ वाढविण्यात आल्याने दीपक चौपाटी परिसरात रात्रीच्या वेळेला मद्य शौकिनांचा धिंगाणा सुरु असतो. मद्याच्या झिंगात वादावादी होऊन हाणामारीची प्रकरणे घडत आहे. जुन्या वैमनस्यातून दोघा जणांनी एकावर तीक्ष्ण काचेने हल्ला चढविला. काचेच्या तुकड्याने मानेवर वार करून जख्मी केले. काही दिवसांआधी साळ्याला मारहाण केल्याचा वचपा काढण्याकरिता दोघा जणांनी रवी गाढवे याच्या मानेवर तीक्ष्ण काचेने वार करून जख्मी केले. शहरातील दीपक चौपाटी परिसरातील करण बार समोर रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रवी गाढवे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ईश्वर दशरथ देठे (२८) व राम दशरथ देठे (३२) दोघेही रा. रंगनाथ नगर याना अटक करून त्यांच्यावर भादंवि च्या कलम ३२४,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1614
1615
1616
1617
1618
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे