Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तयारीला लागा! SBI बंपर भरती काढणार; हजारो जागा भरणार...Read More
WWW.LOKMAT.COM
तयारीला लागा! SBI बंपर भरती काढणार; हजारो जागा भरणार...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना रुग्णांची वाढ संत गतीने सुरु, आज १० कोरोना बाधित रुग्ण आढळले ! रेल्वे विभागात कोरोनाचा शिरकाव !
कोरोना रुग्णांची वाढ संत गतीने सुरु, आज १० कोरोना बाधित रुग्ण आढळले ! रेल्वे विभागात कोरोनाचा शिरकाव !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच असली तरी एका दिवसात अवाढव्य संख्येने आढळणारे रुग्ण कमी झाले आहेत. मागील तीन चार दिवसांपासून कोरोना संक्रमणाची गती मंदावल्याने पाहायला मिळत असून रुग्णसंख्येचा आलेखही धिम्यागतीने वाढतांना दिसत आहे. कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येतांना दिसत असून आज १० कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५०३ वर पोहचला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२१ वर आली आहे. रुग्णसंख्येने ५०० चा टप्पा पार केला असून झटपट रुग्णवाढीनंतर आता हळुवार रुग्णवाढ होतांना दिसत आहे. आज आणखी ३५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ३७१ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. <p>दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून काही दिवस मोठ्या संख्येने आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. झपाट्याने होणारी रुग्णवाढ आता संत गतीने होतांना दिसून येत आहे. रुग्णांची संख्या मंदावल्याने प्रशासनावरील दडपण काही अंशी कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य प्रशासनानेही रुग्णसेवेत कसलीही दिरंगाई न करता रुग्णांना योग्य त्या सेवा पुरविल्या आहेत. आरोग्य सेवक व आशा सेविका शहरातील संपूर्ण परिसर पिंजून काढत नागरिकांची आरोग्य विषयक चौकशी करून त्यांची थर्मल स्कॅनिंग तपासणी करतांनाच त्यांना कोरोना विषयक मार्गदर्शन करतांना दिसत आहे. शहर प्रशासन व आरोग्य प्रशासनाचे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता अथक प्रयत्न सुरु असून प्रशासनामार्फत वेगवेगळ्या उपाययोजनाही करण्यात येत आहे. आज १७ तपासणी अहवाल प्राप्त झाले असून ७ पॉझिटिव्ह तर १० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच १३ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून ३ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १० व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी १४ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १२१ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. आज १० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५०३ झाली असून ३७१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२१ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २८ रुग्ण कोविड सेंटरला भरती असून ६६ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १७ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये ब्राह्मणी येथील एक, चिखलगाव एक, विठ्ठलवाडी एक, रजा नगर एक, सिंदी कॉलनी एक, विराणी टॉकीज परिसर दोन, जैताई नगर दोन तर सर्वोदय चौक येथील एका रुग्णाचा समावेश आहे. विठ्ठलवाडी येथील रुग्ण वाढतच असून याठिकाणी २० रुग्णांची नोंद झाली आहे. विठ्ठलवाडी येथील रेल्वे कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला असून तो माजरी येथे कार्यरत होता. त्यामुळे आता रेल्वे विभागातही कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसांपासून त्याची प्रकृती ठीक नसल्याने तो सुट्या घेण्याकरिता डिपार्टमेंटमध्ये गेला असता त्याला अधिकाऱ्यांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. त्यानुसार त्याने पळसोनी कोविड केंद्रात चाचणी केली असता आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. बांधकाम ठेकेदारांचा मुलगा असलेला रेल्वे कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने विठ्ठलवाडी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रजानगर येथे पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली, पोलीस अधीक्षक पदी रुजू होणार डी.के. पाटील भुजबळ !
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांची बदली, पोलीस अधीक्षक पदी रुजू होणार डी.के. पाटील भुजबळ !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>राज्य पोलीस दलातील ६० हुन अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे गुरुवारी रात्री उशिरा आदेश निघाले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील व महानगरातील उंच पदस्थ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांचा जिल्ह्यातील सेवेचा कार्यकाळ संपला असून त्यांच्या जागी बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक डी.के. पाटील भुजबळ हे यवतमाळचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार आहे. एम. राजकुमार यांनी आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील अवैध धंदे, टोळी युद्ध व खुना सारख्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवून गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायद्याची वचक निर्माण केली होती. डी. के. पाटील भुजबळ यांच्या समोरही अवैध धंदे व गुन्हेगारी नियंत्रित ठेवण्याचे आव्हान असणार आहे. <p>त्याच प्रमाणे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातही पोलीस अधीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची बदली कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक पदावर झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम.सी.व्ही. महेश्वर रेड्डी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी भंडाऱ्याचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे रुजू होणार आहे. अहेरी, गडचिरोली विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग यांना बढती मिळाली असून त्यांची बदली रत्नागिरी येथे पोलीस अधीक्षक पदी झाली आहे. गुरुवारी रात्री पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांचे बदली आदेश निघाले असून आज अध्यादेश जरी करण्यात आला आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
उकणी येथील २४ वर्षीय तरुणाने पाटाळा पुलावरून घेतली वर्धा नदीत उडी !
उकणी येथील २४ वर्षीय तरुणाने पाटाळा पुलावरून घेतली वर्धा नदीत उडी !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>उकनी येथील रहिवाशी असलेल्या एका २४ वर्षीय तरुणाने पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावरून उडी घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ईश्वर शिवशंकर शुक्ला (२४) रा. उकनी असे या उडी घेतलेल्या तरुणाचे नाव असून दुचाकी नदीच्या पुलावर उभी करून त्याने रात्री ७ वाजताच्या सुमारास नदीत उडी घेतल्याचे समजते. घुग्गुस येथील वेकोली अधिकाऱ्याने अशाच प्रकारे वर्धा नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे असतांनाच आज त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून येत असून सततच्या आत्महत्यांनी समाजमन हेलावल्याचे पाहायला मिळत आहे. ईश्वर शुक्ला याचा अजूनही थांगपत्ता लागला नसून प्रशासना तर्फे त्याचा शोध घेण्यात येत आहे. <p>तालुक्यातील उकानी येथील रहिवासी असलेल्या २४ वर्षीय ईश्वर शुक्ता याने आज रात्री ७ वाजताच्या सुमारास आपली दुचाकी क्रं. MH २९ BN ९४१९ पुलावर उभी करून नदीत उडी घेतल्याचे समजते. ईश्वर शुक्ला हा नेहमी मद्य सेवन करीत असल्याचे समजते. त्याचे वडील १० वर्षाआधीच मरण पावले असून आई भालर कॉलरी येथे भांडी घासण्याचे काम करीत असल्याचे समजते. त्याला एक मोठी बहीण असून तिचे लग्न झाल्याचे समजते. ईश्वर हा पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीत टायर हेल्पर म्हणून कमला होता. घरोघरची भांडी घासून मुलाला लाहण्याचे मोठे केले व आज त्याच पोटच्या गोळ्याने नदीत उडी घेतल्याने आईचा आधारच हिरावला असून तिच्या मनातील वेदना किंचाळ्याच्या रूपाने बाहेर पडत आहे. सायंकाळी ४.३० ते ५ वाजे पर्यंत गावातच असलेल्या ईश्वरने नदीच्या पुलावरून उडी घेतलीच कशी, हा एकच प्रश्न गाववासीयांना पडला आहे. काल १६ सप्टेंबरला त्याने २४ तासाची ड्युटी केली व आज अशा प्रकारचे टोकाचे पाऊल उचल्याने उकनी गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. ७ सप्टेंबर रोजी उकनी येथीलच व्हाल्वो कंपनीत ड्रायवर असलेल्या आकाश दर्वेकर या २८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आज ट्रान्सपोर्ट कंपनीतच टायर हेल्पर म्हणून कार्यरत असलेल्या २४ वर्षीय तरुणाने नदीत उडी घेतल्याने उकणी हे छोटेसे गांव हादरले आहे. <p> <p> <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोनाची एका दिवसातील रुग्णसंख्या मंदावली, आज आले ९ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !
कोरोनाची एका दिवसातील रुग्णसंख्या मंदावली, आज आले ९ कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढतच असून संक्रमणाची गती मागील दोन तीन दिवसांपासून धीमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसाला मोठ्या संख्येने आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण आता कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे. एका दिवसातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असल्याचे मागील दोन तीन दिवसांच्या आकडेवारीवरून लक्षात येत आहे. आज ९ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९३ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. आज आणखी १५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत ३३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील एकता नगर परिसरातील ६० वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा ११ वर पोहचला आहे. तालुक्यातील कोरोना बळींची संख्या वाढतांना दिसत आहे. <p>शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून ग्रामीण भागातील रुग्णही वाढीस लागले आहे. मागील दोन तीन दिवसांपासून एका दिवसातील कोरोनाची रुग्ण संख्या नियंत्रित झाल्याचे पाहायला मिलत असून दिवसाला मोठ्या संख्येने आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. आज ४३ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ७ पॉझिटिव्ह तर ३६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज १६ व्यक्तींच्या रॅपिड अँटीजेन चाचणीचे रिपोर्ट प्राप्त झाले असून २ पॉझिटिव्ह तर १४ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आजच्या दिवसा पर्यंत १५७३ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या असून २१४० व्यक्तींच्या स्वाबची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी ४७ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १२४ नमुन्यांचे अहवाल पेंडिंग झाले आहेत. शहरातील एकता नगर परिसरातील एका ६० वर्षीय कोरोना बाधित महिलेचा यवतमाळ येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या ११ झाली आहे. आज ९ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९३ झाली असून ३३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३९ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ९० रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १७ रुग्ण यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये भालर येथील दोन, गणेशपूर दोन, चिखलगांव एक, देशमुखवाडी एक, पानघाटे ले-आऊट दोन तर सेवानगर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मद्याच्या नशेत दोन मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू !
मद्याच्या नशेत दोन मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>मद्यसेवन केल्यानंतर दोन मित्रांमध्ये वादावादी होऊन त्याचे पर्यावसन हाणामारीत झाल्याने एका मित्राने दुसऱ्या मित्राला जबर मारहाण केल्याची घटना काल रात्री ७.३० वाजताच्या सुमारास दीपक चौपाटीवरील एका बारच्या समोर घडली. आज सकाळी कुटुंबीय त्याला दवाख्यात नेण्याच्या बेतात असतांना अचानक तो भोवळ येऊन खाली कोसळला व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रामपूर येथील मृतकाचे घर गाठून घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. तसेच खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केल्याचे समजते. प्रफुल बंडू गारोडे (२८) रा. रामपुरा असे मृतकाचे नाव असून अमोल शंकर काकडे (३६) रा. शास्त्री नगर असे आरोपीचे नाव आहे. हे दोघेही अगदी जवळचे मित्र असून ते नेहमी सोबतच मद्य सेवन करीत असल्याचे समजते. <p>शहरातील रामपुरा परिसरातील रहिवासी असलेल्या व बारमध्ये काम करीत असलेल्या प्रफुल गारोडे याची शास्त्री नगर येथील रहिवासी असलेल्या अमोल काकडे याच्याशी घनिष्ट मैत्री होती. नेहमी प्रमाणे मद्याचे सेवन केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यवसान वादावादीत होऊन वाद विकोपाला गेल्याने नंतर दीपक चौपाटी येथील बारच्या बाहेर त्यांच्या मध्ये जबर हाणामारी झाली. अमोलने प्रफुल याला लाकडी दंडुक्याने जबर मारहाण केल्याचे समजते. प्रफुल नशेत असल्याने रात्रीला त्याला वेदनांची जाणीव न झाल्याने तो तसाच घरी जाऊन झोपला. त्यानंतर सकाळी वेदना जाणवू लागल्याने कुटुंबीय दवाखान्यात नेण्याच्या तयारीत असतांना अचानक तो भोवळ येऊन खाली कोसळला व त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. याबाबत पोलीस स्टेशला तक्रार देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीला पाठवून आरोपी अमोल शंकर काकडे याला अटक करून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. <p> <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणी यवतमाळ रोडवरील माता मंदिर जवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !
वणी यवतमाळ रोडवरील माता मंदिर जवळ ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जगिच ठार झाल्याची घटना काल रात्री ७.३० वाजता वणी यवतमाळ रोडवरील पळसोनी फाट्याजवळ असलेल्या मातामंदिराजवळ घडली. राजकुमार अंबर मेश्राम (५५) रा. परसोडा असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. <p>वणीवरून परसोडा या आपल्या गावी जात असतांना राजकुमार मेश्राम यांच्या मोपेड दुचाकीला घुग्गुस वरून यवतमाळकडे कोळसा भरून जात असलेल्या MH ३४ BG ००८२ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने राजकुमार मेश्राम यांना जबर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याने पोलीस त्याला अटक करण्याकरिता त्याच्या शोध घेत आहे. पोलिसांनी ट्रक चालक शिवराशी दीनानाथ यादव रा. चंदनी चौक घुग्गुस याच्या विरुद्ध भादंवि च्या कलम २७९. ३०४ (अ) नुसार गुन्हा नोंदविला असून त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास एएसआय डी बी भादेकर करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीचे लैगिक शोषण केल्या प्रकरणी पोलिसांनी शहरातील एका तरुणाला अटक केली असून त्याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. गजानन नत्थूजी बोधलकर (२८) रा. वणी असे या आरोपी तरुणाचे नाव आहे. <p><p>प्रेमसंबंध असलेल्या एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. मागील सात वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या या तरुणीला लग्नाचे आश्वासन देत तिचे लैंगिक शोषण केले. नंतर लग्नाला नकार दिल्याने तिने गजानन बोधलकर याच्या विरुद्ध लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी आरोपी तरुणावर भादंवि च्या ३७६ (२) (N) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास एपीआय माया चाटसे करीत आहे. <p><p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोनाचे संक्रमण वाढतच असून आज ११ व्यक्तींना झाली कोरोनाची लागण !
कोरोनाचे संक्रमण वाढतच असून आज ११ व्यक्तींना झाली कोरोनाची लागण !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यातील कोरोनाचं संकट गंभीर होतांना दिसत असून कोरोनाची परिस्थिती आणखीच बिकट होतांना दिसत आहे. कोरोना संक्रमणाची गती अधिकच तीव्र झाली असून कोरोना रुग्णांचा वाढता आलेख प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे. आरोग्य प्रशासनावरही चांगलाच तान निर्माण झाला असून आरोग्य सेवक व आशा सेविकांची चांगलीच पायपीट होतांना दिसत आहे. दिवसागणिक रुग्ण आढळत असल्याने रुग्णांचा आकडाही चांगलाच फुगत चालला आहे. आज आणखी ११ कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८४ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. आज आणखी २६ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३२१ झाली आहे. सुरक्षा रक्षक, आरोग्य रक्षक, कायदेविषयक सल्लागार, न्यायालयीन कर्मचारी, गृहरक्षक. प्रशासकीय कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात आले असतांनाच आता वृत्त सेवेतील व्यक्तीलाही कोरोनाची लागण झाल्याने प्रत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली आहे. <p>तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जनजीवन प्रभावित झाले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविताना शहर प्रशासन व आरोग्य प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न कमी पडतांना दिसत आहे. कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. आज ३६ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ७ पॉझिटिव्ह तर २९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २० व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी ४ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १६ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी ३४ व्यक्तींचे स्वाब आरटी पीसीआर तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १२० रिपोर्ट पेंडिंग झाले आहेत. आज ११ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८४ झाली असून ३२१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५३ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४४ रुग्ण कोविड केयर सेंटला भरती असून ९३ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहेत. तर १६ रुग्णांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्यास्थितीत ६० व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले असून महत्वपूर्ण क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींनाही कोरोनाची लागण होतांना दिसत आहे. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये सिंधी कॉलनी येथील एक, जिजाऊ नगर ३, जैन ले-आऊट २, वाघदरा २, सेवानगर १, पेटूर येथील एक तर बांधकाम विभागाच्या क्वाटर मधील एका व्यक्तीचा समावेश आहे. प्रशासन कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता सर्वोतपरी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही कोरोनाचे संक्रमण वाढणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना बाधितांची संख्या वाढतीवरच, आज आणखी १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले !
कोरोना बाधितांची संख्या वाढतीवरच, आज आणखी १३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून कोरोनाची परिस्थिती गंभीर वळण घेतांना दिसत आहे. दररोज आढळत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. आज आणखी १३ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७३ झाली. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६८ झाली आहे. आज आणखी चार व्यक्ती कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २९५ झाली आहे. तालुक्यातील कोरोनाचे संकट गडद हातांना दिसत असून कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाबरोबरच नागरिकही चिंतेत आले आहे. कोरोनाचे संक्रमण तीव्र गतीने वाढत असून शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची लाट पसरल्याने जनता भीतीच्या सावटात आली आहे. आज २५ तपासणी नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ५ पॉझिटिव्ह तर २० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच १५ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली असून ८ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ७ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १५३७ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर २०४७ व्यक्तींच्या स्वाबची आरटी पीसीआर तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी २७ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १२२ स्वाबचे अहवाल पेंडिंग झाले आहेत. आज १३ व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७३ झाली आहे. २९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १६८ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५८ रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये उपचार सुरु असून ९५ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १६ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये टिळकनगर येथील ३, साने गुरुजी चौक १, आर एच क्वाटर १, राजूर १, देशमुखवाडी १, चिखलगाव १, टागोर चौक १, सिंधी कॉलनी १, जैताई नगर १, विराणी टॉकीज एक तर विठ्ठलवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. <p>विठ्ठलवाडी येथील रुग्णांची संख्या वाढतच असून आता पर्यंत याठिकाणी १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. परिसरातील व्यक्ती कोरोनाला अगदी सहजतेने घेत असून प्रशासनाच्या नियमांचे पालन न करता प्रतिबंधित क्षेत्राबाहेर बिनधास्त फिरतांना दिसत आहे. ही अफवा नसून सत्य परिस्थिती आहे. नागरिकांच्या बेसावध वागण्याने व परिसराबाहेर मुक्त वापरण्याने कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथील नागरिक लापर्वाहीचा कळस गाठतांना दिसत असून याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमणे गरजेचे झाले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या मुक्त वावरण्याने परिसरातील इतर नागरिक धास्तीत आले आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर फिरणाऱ्यांवर अंकुश लावण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. अन्यथा कोरोना संक्रमणाला प्रतिबंध लावणे कठीण होऊन बसेल. नागरिकांनी स्वतःचे व इतरांचे आरोग्य धोक्यात येनार नाही याची काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
हॉटेलमध्ये चोर शिरला, पैशाला हातही न लावता भूक भागवली, चंद्रपुरातील घटनेने मालकही गलबलला...Read More
WWW.TV9MARATHI.COM
हॉटेलमध्ये चोर शिरला, पैशाला हातही न लावता भूक भागवली, चंद्रपुरातील घटनेने मालकही गलबलला...Read More
tv9marathi.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच मृत्यू !
ट्रॅक्टरला दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच मृत्यू !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>टॅक्टरला मागून येणारी दुचाकी धडकल्याने झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज रात्री ७.३० वाजताच्या सुमारास मारेगाव यवतमाळ राज्य महामार्गावरील करणवाडी फाट्याजवळ घडली. मारेगाव पासून तीन किमी अंतरावर असलेल्या कारवाडी फाट्याजवळ बुरांडा येथील रहिवासी असलेल्या बळीराम गुंजेकर वय अंदाजे ४५ वर्ष, यांचा दुचाकीच्या अपघातात जाग्यावरच मृत्यू झाला. <p>मारेगाव येथील आपले काम आटपून बुरांडा या आपल्या गावी परत जातांना बळीराम गुंजेकर यांच्यावर काळाने झडप घातली. ते आपल्या दुचाकी क्रं. MH २९ ८४५५ ने गावाकडे जात असतांना त्यांची दुचाकी ट्रॅक्टर क्रं. MH २९ C ४५१४ ला मागून धडकल्याने त्यांना जबर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकींचा लाईट नादुरुस्त असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांमधून बोलल्या जात होते. याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह उत्तरीय तपासणी करिता प्राथमिक आरोग्य केंद्र मारेगाव येथे पाठवला. बळीराम गुंजेकर वय अंदाजे ४५ वर्ष रा. बुरांडा हे मजुरीचे काम करीत असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट, तब्बल ४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तालुका हादरला
WANICITY.COM
तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट, तब्बल ४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तालुका हादरला
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p> <p>शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरुच असून कोरोनाची रुग्णसंख्या उचांकाचे शिखर गाठतांना दिसत आहे. आज रुग्ण संख्येने एका दिवसातील उचांक गाठला असून तालुक्यात आज तब्बल ४२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही हादरले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६० झाली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५९ झाली आहे. आज आणखी ६ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण २९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील आणखी एका नामांकित डॉक्टराचा कोरोनाने मृत्यू झाला आहे तर चिखलगाव येथील ५३ वर्षीय इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून ओम नगर येथील व्यक्तीही कोरोनाने दगावल्याने तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा दहावर पोहचला आहे. <p> <p>तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रुग्ण संख्या उचांक गाठत आहे. आजच्या रुग्णसंख्येने एका दिवसातील रुग्णसंख्येचा उचांक गाठला आहे. आज ६१ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३७ पॉझिटिव्ह तर २४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच आज १४ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २३ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. त्यामुळे १२० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५४ रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत असून ८९ व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १६ व्यक्तींवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज एकूण ४२ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला आहे. तर प्रशासन चांगलेच चिंतेत आले आहे. आज नव्या उचांकासह ४२ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६० एवढी फुगली आहे. २९१ रुग्ण कोरोनमुक्त झाले तर १० रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १५९ झाली आहे. आज आणखी तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चिखलगाव येथील ५३ वर्षीय पुरुष, शहरातील एक नामांकित डॉक्टर तसेच ओम नगर येथील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या दहा झाली आहे. <p> <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये रवी नगर येथील १, जिल्हा परिषद कॉलनी ४, भालर २, चिखलगाव ४, भीमनगर २, गणेशपूर १०, शास्त्री नगर ५, सेवानगर ५, भांडेवाडा ५, विद्या नगरी १, बेलदारपुरा १, लक्ष्मी नगर १ तर गायकवाड फैल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. वाढत्या कोरोना रुग्णांनी प्रशासन चिंतेत आले आहे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन हर संभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सर्व पक्षीय सभेत एकमत न झाल्याने जनता कर्फ्यू न पाळण्याचा निर्णय !
सर्व पक्षीय सभेत एकमत न झाल्याने जनता कर्फ्यू न पाळण्याचा निर्णय !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातांना दिसत असून तालुक्यात कोरोनाचा स्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचा विळखा घट्ट झाला असून तालुक्यात कोरोनाचे संक्रमण वाढतच चालले आहे. तालुक्यात कोरोनाची पकड मजबूत झाली असून कोरोनावर आळा घालण्याचे सर्वच उपाय निष्फळ ठरत आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांना यश मिळत नसून आरोग्य प्रशासनही हवालदिल झाले आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आल्याने शहरातही जनता कर्फ्यू पाळण्या संदर्भात चर्चा करण्याकरिता सर्व पक्षीय सभा घेण्यात आली. आंबेडकर चौकातील माता मंदिरालगत असलेल्या कल्याण सभागृहात आयोजित या सभेला व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, व्यावसायिक, सामाजिक व राजकीय प्रतिनिधी तसेच सुज्ञ नागरिक उपस्थित होते. याठिकाणी झालेल्या वादळी चर्चेनंतर जनता कर्फ्यू न पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. जनता कर्फ्यू पाळण्याने परिस्थिती पूर्व पदावर येणार नसल्याचे सर्वच उपस्थितांचे मत झाले. आता आवश्यकता आहे शासन व प्रशासनाच्या सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची. योग्य उपचाराची, आणखी एक कोविड केयर सेंटर उभारण्याची. कोविड केयर सेंटर उभारण्याकरिता बंद पाळणार असाल तर आजच आमचा पाठिंबा असल्याचे काही राजकीय पुढाऱ्यांचे मत होते, तर प्रशासनाच्या पाठिंब्याशिवाय बंद यशस्वी होणार नाही हे काहींचे मत झाले. संपूर्ण राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असून बसेस सुरूच राहणार असल्याने कुठल्याही व्यक्तीला शहरात येण्यापासून रोखता येणार नाही, तसेच शासकीय व प्रशासकीय कार्यालये सुरु राहतील, त्यांचे कामकाज सुरु राहील, बँका सुरु राहतील, तेंव्हा लोकांचे रस्त्यांवरून जाणे येणे सुरूच राहणार आहे. त्यामुळे बंद पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी होईल असे वाटत नसल्याचे सर्वच राजकीय प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींचे मत झाल्याने अखेर बंद न पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्षांनी कोरोनाची परिस्थिती चिघळण्याची शक्यता वर्तवतांनाच कोविड केयर सेंटर मधील असुविधांचा पाढाच वाचला. कोविड केयर सेंटर मध्ये रुग्णांची हेळसांड होत असून त्यांना प्राथमिक सुविधा व उपचार मिळत नसल्याची त्यांनी खंत व्यक्त केली. लोकवस्तीत कोविड केंद्र उभारण्याला विरोध होणारच असून प्रशासनाने आज पर्यंत योग्य पर्यायी ठिकाण कोविड केंद्र उभारणी करिता निवडले नसल्याचे तारेंद्र बोर्डे यांनी यावेळी सांगितले. बहुजन समाज पार्टीचे प्रवीण खानझोडे यांनी प्रशासनाच्या दिरंगाईनेच कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे सांगतानाच बंद मध्ये प्रशासनाला सोबत घेणे आवश्यक असल्याचे सूतोवाच केले. तर राकेश खुराणा यांनी कोविड केयर सेंटर उभारण्याकरिता जर बंद पाळावा लागत असेल तर माझा उभारणी पर्यंत बंदला पाठिंबा राहील असे जाहीर केले. त्याच प्रमाणे मनसेचे राजू उंबरकर यांनी व्यापारी जो निर्णय घेतील त्याला आपले समर्थन असेल असे सांगितले. शेवटी आमदारांनी बंदने काहीही साध्य होणार नसल्याचे सांगत सावधानी बाळगून दैनंदिन कामे सुरु ठेवण्याचे सांगितले. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना खबरदारीचे नियम पाळावे. स्वतःचे व इतरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घ्यावी. जेमतेम व्यवसाय व कामधंदे सुरु झाले. बंदने आणखी त्यावर परिणाम होऊ शकतो, असे बोदकुरवार यांनी स्पष्ट करतांनाच बंद न पाळण्यावर शिक्का मोर्तब झाले. <p>याआधी अशाच सर्व पक्षीय सभेत २९ जून पासून जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरले होते. मात्र एका दिवसांतच जनता कर्फ्यू मागे घ्यावा लागला. उस्फुर्त प्रतिसाद मिळूनही जनता कर्फ्यू रद्द करण्याची वेळ आली. २९ जूनला जेंव्हा जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरले तेंव्हा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ होती. पाच दिवसांचा जनता कर्फ्यू एकाच दिवसांत गुंडाळल्यानंतर ४ जुलैला पेट्रोलपंप व्यावसायिक पॉझिटिव्ह आला व ५ जुलैला त्याची पत्नी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच गेली व एक दोन करता करता ३० जुलैला एकदम १० व्यक्ती पॉझिटिव्ह आले. २९ जूनला ७ वर असणारा रुग्णांचा आकडा ३० जुलैला ३६ वर पोहचला. त्यानंतर कोरोनाशी नागरिकांचा ३६ चा आकडा झाला. व आज रुग्णांची संख्या ४१८ वर पोहचली आहे. जेंव्हा बंदची आवश्यकता होती तेंव्हा राजकारण आडवे आले, आता तर कोरोनाची मुळे घट्ट झाली आहे. आता सभागृहाबाहेर राजकारण सोडले तरी त्याचा फारसा उपयोग होणार नाही. तेंव्हा आता कोरोनाशी दोन हात करूनच कोरोनाला हरवावें लागणार आहे. त्यामुळे आता बंद करण्याची नाही तर नियमांचे पालन करून कोरोनाशी द्वंद करण्याची वेळ आल्याचा सूर सर्वपक्षीय सभेतून ऐकायला मिळाला.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट, तब्बल ४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तालुका हादरला !
तालुक्यात कोरोनाचा ब्लास्ट, तब्बल ४१ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने तालुका हादरला !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरु असून कोरोनाची रुग्णसंख्या उचांकाचे शिखर गाठतांना दिसत आहे. आज रुग्ण संख्येने एका दिवसातील उचांक गाठला असून तालुक्यात आज तब्बल ४१ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही हादरले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१८ झाली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. आज आणखी १५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण २८५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यातील आणखी दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा सातवर पोहचला आहे. <p><p>तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रुग्ण संख्या उचांक गाठत आहे. आजच्या रुग्णसंख्येने एका दिवसातील रुग्णसंख्येचा उचांक गाठला आहे. आज ५६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी ३६ पॉझिटिव्ह तर २० नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. तसेच आज १४ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी ५ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्हआले आहेत. आज आणखी २१ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आले आहे. त्यामुळे १५८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४४ रुग्ण कोविड केयर सेंटरला उपचार घेत असून ६२ व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १६ व्यक्तींवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज एकूण ४१ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला आहे. तर प्रशासन चांगलेच चिंतेत आले आहे. आज नव्या उचांकासह ४१ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४१८ एवढी फुगली आहे. २८५ रुग्ण कोरोनमुक्त झाले तर ७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. आज आणखी दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गणेशपूर येथील ५२ वर्षीय पुरुष व एका ८५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या सात झाली आहे. <p><p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये राजूर येथील सात, रांगणा सात, भालर चार, पळसोनी १, मुरधोंनी १, चिखलगाव १, पंचशीलनगर ६, वसंत विहार ३, विराणी टॉकीज परिसर १, पद्मावती नागरी १, देशमुखवाडी १, प्रगती नगर १, माळीपुरा १, सिंधी कॉलनी २, जैन ले-आऊट २, जिजामाता नगर १ तर इतर एका व्यक्तीचा समावेश आहे. वाढत्या कोरोना रुग्णांनी प्रशासन चिंतेत आले आहे तर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन हर संभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1624
1625
1626
1627
1628
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे