Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
विष्णू कष्टी यांची हत्त्या करणाऱ्या परप्रांतीय शंभू चौधरी याला त्वरित अटक करा- मनसेचा इशारा...Read More
BHUMIPUTRACHIHAK.COM
विष्णू कष्टी यांची हत्त्या करणाऱ्या परप्रांतीय शंभू चौधरी याला त्वरित अटक करा- मनसेचा इशारा...Read More
bhumiputrachihak.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पाटाळा पुलावरून वर्धा नदीत उडी घेतलेल्या वेकोली अधिकाऱ्याचा आज मृतदेह आढळला !
पाटाळा पुलावरून वर्धा नदीत उडी घेतलेल्या वेकोली अधिकाऱ्याचा आज मृतदेह आढळला !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>वेकोलिच्या बल्लारपूर कोळसा खदानीत सेफ्टी ऑफिसर पदावर कार्यरत असलेल्या तीस वर्षीय युवकाने पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावरून नदी पात्रात उडी घेतल्याने त्याचे शोध कार्य सुरु होते. आज त्याचा मृतदेह नायगाव बेलोरा लगत असलेल्या वर्धा नदीच्या पात्रात तरंगतांना सामाजिक कार्यकर्त्यांना आढळला. याबाबत वणी पोलिसांना सूचना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरिता पाठविला. <p>तालुक्यातील पाटाळा पुलावरून वर्धानदीच्या पात्रात घुग्गुस येथील रहिवासी असलेल्या व बल्लारपूर येथील कोळसा खदानीत सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अमित विठोबा पोले (३०) या युवकाने ११ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आज १२ सप्टेंबरला दुपारी त्याचा मृतदेह नायगाव बेलोरा लगतच्या वर्धा नदीपात्रात तरंगताना त्याचा शोध घेणाऱ्या कार्यकर्त्यांना आढळून आला. त्यांनी याबाबत पोलिसांना सूचना देत मृतदेह नदीतून बाहेर काढला. पाटाळा येथील पुलावर दुचाकी व आधारकार्ड ठेऊन मोबाईलवर संभाषण करतंच त्याने नदी पात्रात उडी घेतल्याचे सांगितल्या जात आहे. कालपासून सामाजिक कार्यकर्ते त्याचा नदीपात्रात शोध घेत होते. त्यांनीच पोलिसांना मृतदेह मिळाल्याची सूचना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत जागेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविला. आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून पोलीस तपास करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात कोरोनाचा धमाका, आज ३९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने झाले रेकार्ड ब्रेक !
तालुक्यात कोरोनाचा धमाका, आज ३९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने झाले रेकार्ड ब्रेक !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाचे अहवाल मिळण्यास होणार विलंब व परिक्षेत्राबाहेर नागरिकांचा मुक्त वावर कोरोनाचे संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. आज कोरोना रुग्णांनी आणखी उचांक गाठला असून एका दिवसात ३९ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रेकार्ड ब्रेक झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३७७ आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. आज आणखी १५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत २७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. <p>शहराबरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाची लाट पसरली असून कोरोनाच संकट अधिकच गडद होतांना दिसत आहे. नागरिक कोरोनाला अगदी सहजतेने घेत असून चोरून लपून प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पडून इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. कोरोना अहवाल प्राप्त होण्याला बराच विलंब होत असल्याने दरम्यानच्या काळात नागरिक समाजात बिनधास्त वावरतांना दिसत आहे. स्वाब घेतलेले व्यक्तीही लोकांमध्ये वावरत असल्याने त्यातील काही व्यक्ती नंतर पॉझिटिव्ह आल्यास इतर नागरिकांचा जीव भांड्यात पडतांना दिसत आहे. चाचणी अहवाल येईस्तोर होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना असतांनाही काही व्यक्ती लापर्वहीचा कळस गाठून बाहेर पडतांना दिसत आहे. त्यांच्या समाजात वावरण्याने इतरांचे आरोग्य धोक्यात येत असून संक्रमणाची गती वाढत आहे. आज १०२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ३१ पॉझिटिव्ह तर ७१ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २५ व्यक्तींची अँटीजेन चाचणी करण्यात त्यापैकी ८ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १७ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आज आणखी २५ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने १५८ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३१ रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये उपचार सुरु असून ५३ रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १४ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. आज शहरातील एका प्रसिद्ध वकिलांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा पाचवर गेला आहे. आज ३९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला आहे. दिवसागणिक मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनावरील ताणही वाढतच आहे. आजच्या ३९ पॉझिटिव्ह रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३७७ झाली असून २७० रुग्ण कोरोनमुक्त झाले तर ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९८ झाली आहे. <p>आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये विठ्ठलवाडी येथील १०, कैलास नगर ३, चिखलगांव ३, गणेशपूर ३, काळे ले-आऊट १, लक्ष्मीनगर ३, गौरकार ले-आऊट १, पेटूर १, झोला १, भालर १, पळसोनी २, नायगाव १, अर्जुनी १, एकता नगर १. नवीन वागदरा १, साधनकरवाडी १, ओमनगर १, सदाशिव नगर १, गौरव कॉलनी १, माळीपुरा १ तर देशमुखवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आज शहरातील २२ तर ग्रामीण भागातील १७ असे एकूण ३९ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात आज आढळलेल्या कोरोना रुग्णांनी एका दिवसातील सर्वोच रुग्णसंख्येचे सर्वच रेकार्ड मोडीत काढले असून नवीन रेकार्ड निर्माण आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनी स्वतःचे व इतरांचे आरोग्य धोक्यात येणार नाही याची दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तपासणी अहवाल मिळण्यास होतो आहे बराच वेळ, मग सांगा कसा संपेल कोरोनाचा खेळ !
तपासणी अहवाल मिळण्यास होतो आहे बराच वेळ, मग सांगा कसा संपेल कोरोनाचा खेळ !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून कोरोनाचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. कोरोना चाचणीचे अहवाल प्राप्त होण्याकरिता दीर्घ कालावधी लागत असून स्वाब घेण्यात आलेले नागरिकही परिसरात मुक्त वावरत असल्याने कोरोना संक्रमणाचे हे सुद्धा प्रमुख कारण ठरत असल्याचे बोलल्या जात आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांचे व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वाब घेऊन तपासणी करिता पाठविण्यात येतात. परंतु स्वाबचे अहवाल येण्यास आठ ते नऊ दिवसांचा कालावधी लागत असल्याने संशयित व्यक्ती परिसरात व परिसराबाहेर मुक्त वावरतांना दिसत असून जनसंपर्कात येऊन इतरांचे आरोग्य धोक्यात आणत आहे. लक्षणे जाणवत असलेल्या व्यक्तींचेही कोरोना चाचणी अहवाल येण्यास दीर्घ कालावधी लागत असल्याने त्यांच्या संपर्कातून इतर व्यक्ती संक्रमित होतांना दिसत आहे. स्वाबचे अहवाल प्राप्त होण्याच्या कालावधीत रुग्णांची लक्षणेही नाहीशी होतात, नंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह येतो व त्याला सोपस्कार म्हणून कोविड केयर सेंटला हलविल्या जाते. अशी कित्येक उदाहरणे आहेत की, कोरोनाची लक्षणे धूसर झाल्यानंतर व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह येतो आहे. मग तो टागोर चौकातील छाया चित्रकार असो की, साईनगरीतील पॉझिटिव्ह रुग्णांची मुले असो, लक्षणे निवळल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आले व त्यांना सोपस्कार पार पाडण्याकरिता कोविड केयर सेंटर मध्ये हलविण्यात आले. आज विठ्ठलवाडी परिसरातील १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजते. पीठ गिरणी व्यावसायिकाला झाली कोरोनाची लागण, मग एका दोघावरच कसं भागन, या व्यासायिकाच्या गाढ्या संपर्काने तब्बल त्याला पकडून १४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे स्वाब घेऊन सात ते आठ दिवसांचा कालावधी झाला. पण रिपोर्ट आज प्राप्त झाले. पीठ गिरणी व्यावसायिकाच्या कुटुंबातील एक सदस्य काही दिवस तापाने फणफणत होता. आता तर त्याची लक्षणेही निवळली आहेत. आज त्याच्या कुटुंबातील सर्वच सदस्य पॉझिटिव्ह आले. या कालावधीत सदस्य प्रतिबंधित क्षेत्राबाहेर फिरले, समाजात वावरले, त्यामुळे इतर रहिवाशांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोनाचे विलंबनाने येणारे अहवाल संक्रमणाची गती वाढवत असल्याचे खुले बोलल्या जात आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या पीठ गिरणी व्यावसायिकाच्या कुटुंबातील सदस्यांमुळे विठ्ठलवाडी येथे आता पर्यंत १८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. <p>कोरोना संशयित व्यक्तीचा स्वाब घेतल्या नंतर तातडीने त्याला विलीगीकरणात ठेवणे आवश्यक असते. मात्र ८ ते ९ दिवसांपर्यंत अहवालच मिळत नाही. त्यामुळे ती व्यक्ती पूर्णवेळ घरी किंवा घराबाहेर वावरत असते. अशा स्थितीत त्या व्यक्ती कडून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरासह तालुक्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. पॉझिटिव्ह व्यक्ती ८ ते ९ दिवसांनंतर माहित होत असल्याने दरम्यानच्या कालावधीत ती व्यक्ती कोरोना संक्रमणाचे कारण ठरत आहे. अशा पद्धतीने कामकाज सुरु राहिल्यास दहा जणांपैकी चार जण कोरोनाच्या विळख्यात येतील, असे तज्ज्ञानकडुन सांगण्यात येत आहे. तपासणी अहवाल तातडीने मिळावे यासाठी कोणत्याच सूचना अथवा निर्देश देण्यात आलेले नाहीत. आरोग्य सेवक, आशा सेविका व गावपातळीवरच्या कोरोना नियंत्रण समित्या अस्वस्थ झाल्या आहेत. नऊ दिवसांनंतर एखाद्याकडे पॉझिटिव्ह अहवाल घेऊन गेल्यास तणाव निर्माण होत असून आरोग्य सेवकांना वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. <p>जिल्हा कोरोना लॅबची तपासणी क्षमता २४ तासांत २५० नमुने तपासण्याची आहे. प्रत्यक्षात मात्र दिवसाला हजाराच्याही वर नमुने तपासणी करिता जातात. अहोरात्र काम करूनही प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढतच जात असल्याचे समजते. सध्यस्थितीत साडेतीन हजारांच्यावर नमुने प्रयोग शाळेत प्रलंबित असल्याचे समजते. त्यामुळे अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगितल्या जात आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोनाने घेतला आणखी एक बळी, प्रसिद्ध कायद्याचे जाणकार हरपले !
कोरोनाने घेतला आणखी एक बळी, प्रसिद्ध कायद्याचे जाणकार हरपले !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>कोरोना या महामारीने आणखी एक बळी घेतला असून यवतमाळ येथे उपचार सुरु असलेल्या एक नामांकित कायद्याच्या जाणकाराचा मृत्यू झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले आहे. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले होते. आयसोलेशन मधील अतिदक्षता विभागात त्यांना ठेवण्यात आले होते. मागील सात आठ दिवसांपासून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरु होते. तसेच त्यांना शुगर व बीपीचा त्रास असल्याचेही समजते. त्यांच्या जाण्याने शहरातील कायदे क्षेत्रातील जाणकार हरपला असल्याने शहरात शोककळा पसरली आहे. कोरोनाने मृत्यू झाल्याचे ते तालुक्यातील सातवे व्यक्ती ठरले आहेत. पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविल्याचे कळते. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने जनता भयभीत झाली असून या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढू लागल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहे. काही दिवसांच्या अंतरातच तीन व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. रंगारीपुरा येथील ६० वर्षीय व्यक्ती, सोमनाळा येथील ६५ वर्षीय व्यक्ती तर आज प्रसिद्ध कायद्याचे जाणकार कोरोनाने दगावल्याने कोरोनाचा प्रकोप वाढत असल्याचे जाणवू लागले आहे. त्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने जिल्ह्यात नोंद झालेले ते तालुक्यातील पाचवे कोरोनाबाधित व्यक्ती ठरले आहेत.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वर्धा नदीचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन चुलत बहिणी गेल्या वाहून !
वर्धा नदीचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने दोन चुलत बहिणी गेल्या वाहून !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>धुनी धुण्यासाठी वर्धा नदीवर गेलेल्या दोन सख्या चुलत बहिणी धरणाचे पाणी सोडल्याने आलेल्या ओढ्यात वाहून गेल्याचे प्रकरण गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुक्यातील कोना या गावी उघडकीस आले. शुक्रवारी घटनास्थळापासून ११ किमी अंतरावर मासे पकडणाऱ्यांना त्यातील एक बहीण बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तर एका बहिणीचा अद्याप थांगपत्ता लागला नसून तिला शोधण्याचे कार्य प्रशासनाकडून सुरु आहे. <p><p>शहरापासून ८ किमी अंतरावर असलेल्या कोना या गावातील दोन सख्ख्या चुलत बहिणी कपडे धुण्याकरिता वर्धानदीवर गेल्या. संततधार पावसाने आधीच नद्या दुथडी भरून वाहत आहे, त्यातच अप्पर वर्धा धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह वाढून अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने कोना या गावातील ज्योती श्रीकृष्ण परचाके(२०) व आंचल शंकर परचाके (१९) या दोन सख्ख्या चुलत बहिणी वाहून गेल्या. त्यातील ज्योतीला पोहता येत असल्याने ती घटनास्थळापासून ११ किमी अंतरावर मासेमारांना बेशुद्ध अवस्थेत आढळली तर आंचल हिचा अद्यापही शोध लागलेला नाही. प्रशासनाकडून तिचे शोधकार्य सुरु आहे. ज्योती हिला बेशुद्ध अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती धोक्या बाहेर असल्याचे कळते. <p><p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे अतिरिक्त कोविड केयर सेंटर उभारणीचे काम थांबले !
स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे अतिरिक्त कोविड केयर सेंटर उभारणीचे काम थांबले !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील गुरुवर्य कॉलनी या ठिकाणी असलेल्या सत्यसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उभारण्यात येणारे खाजगी कोविड केयर सेंटर परिसरातील नागरिकांच्या तीव्र विरोधामुळे रद्द करण्यात आल्याचे समजते. सत्यसेवा हॉस्पिटल हे लोकवस्तीत असून याठिकाणी कोविड केयर सेंटर उभारण्यात आल्यास नागरिक भीतीच्या सावटात येतील व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने याठिकाणी कोविड केयर सेंटची निर्मिती होऊ नये अशी मागणी स्थानिक नागरिकांनी उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांना दिलेल्या निवेदनातून केली. या निवेदनाची दखल घेत सत्यसेवा हॉस्पिटल येथे खाजगी कोविड केयर सेंटर उभारण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचे कळते. <p><p>शहरात कोरोनाची लाट पसरली असून कोरोना या साथीच्या आजाराची लागण होण्याचे प्रमाणही चांगलेच वाढले आहे. दरदिवशी मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत असून शहरात एकच कोविड केयर सेंटर असल्याने त्याठिकाणी रुग्णांचा भरणा वाढला आहे. एकाच ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण भरती व विलीगीकरण करण्यात येत असल्याने कोविड केंद्र ओव्हरफ्लो झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात अतिरिक्त कोविड केयर सेंटर उभारणीकरिता कित्येक दिवसांपासून प्रयत्न सुरु असून पर्यायी ठिकाणाचा शोध घेतांना कोणताही ताळमेळ जुळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात याआधीही लोकवस्तीत कोविड केयर सेंटर उभारण्याला विरोध झाला होता. कोविड केयर सेंटर हे शहराबाहेर असावे ही बहुतांश नागरिकांची अपेक्षा असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाने गावाबाहेरच कोविड केयर सेंटर उभारण्याचा पर्याय शोधायला हवा ही मागणी शहरवासियांमधून करण्यात येत आहे. गुरुवर्य कॉलनी येथील सत्यसेवा हॉस्पिटल हे लोकवस्थीत असून आजूबाजूला असलेल्या निवास्थानातील नागरिकांनी या कोविड केयर सेंटरची धास्ती घेतली आहे. हॉस्पिटलच्या अवतीभवती राहत असलेल्या नागरिकांचा जाण्यायेण्याचा मार्ग हॉस्पिटल जवळूनच जात असून लहान मुलं या रस्त्यांवर खेळत असतात. त्यामुळे या ठिकाणी कोविड केयर सेंटर उभारल्यास संसर्गाचा धोका संभवू शकतो. तसेही गुरुवर्य कॉलनीत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील नागरिक आधीच दहशतीत आले आहे. त्यातल्यात्यात कोविड केयर सेंटर भर वस्तीत उभारण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये आणखीच भीती निर्माण होऊन त्यांच्यात संताप व्यक्त केल्या जात आहे. तेंव्हा येथील रहिवाशांचा सत्यसेवा हॉस्पिटल येथे कोविड केयर सेंटर उभारण्याला तीव्र विरोध असून याठिकाणी कोविड केयर सेंटर उभारण्यात आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. नागरिकांनी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनाही निवेदन देऊन कोविड केयर सेंटरला तीव्र विरोध दर्शविला. स्थानिक नागरिकांचा विरोध लक्षात घेता प्रशासनाने सत्यसेवा हॉस्पिटल येथे कोविड केयर सेंटर उभारण्याचा निर्णय मागे घेतल्याचे कळते. <p><p>सत्यसेवा हॉस्पिटल येथील कोविड केयर सेंटर उभारणीचे काम स्थानिकांच्या आक्षेपामुळे थांबवावे लागल्याचे डॉ. महेंद्र लोढा यांनी स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करूनच हे काम हाती घेण्यात आले होते. कोरोना रुग्णावर योग्य वेळी योग्य उपचार व्हावे ही या कोविड केयर सेंटर उभारण्या मागची मनीषा होती. कोविड केयर सेंटर उभारण्याला दीर्घ कालावधी लागतो, सत्यसेवा हॉस्पिटल हे सर्व सेवानिशी समृद्ध असल्याने याठिकाणी सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याठिकाणी सर्व उपाययोजना करूनच व नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेऊनच कोविड केयर सेंटरचे कार्य सुरु राहणार होते. शहरात ५ किमी अंतरावर एकच कोविड केयर सेंटर असल्याने कोविड रुग्णांना आरोग्य विषयक सुविधा पुरवितांना तेथील यंत्रणेवर तान पडतांना दिसत असून त्यांच्यावरील तान कमी व्हावा व कोरोनाग्रस्तांना शीघ्र उपचार मिळावे याकरिता अतिरिक्त कोविड सेंटर उभारण्यात येत होते. डॉक्टरही कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास तयार होते. पण गैरसमजुतीतून या कोविड केयर सेंटरला स्थानिकांनी तीव्र विरोध केल्याने कोविड सेंटर उभारणीचे काम थांबवावे लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. <p><p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून आज १५ व्यक्तिंचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत !
तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून आज १५ व्यक्तिंचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून सतत पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने प्रशासनही चिंताग्रस्त झालं असून आरोग्य प्रशासनावरही चांगलाच तान निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना संक्रमणाची गती अधिकच तीव्र झाली असून तालुक्यात कोरोनाच संकट गडद होतांना दिसत आहे. आज आणखी १५ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३३८ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. आज आणखी १६ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. <p><p>तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून कोरोना बाधितांची संख्या जलद गतीने वाढत आहे. ११ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या ३१ दिवसांच्या कालावधीत २९७ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. ११ ऑगस्टला एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ होती. तर आज हा आकडा ३३८ वर पोहचला आहे. कोरोनाचा संसर्ग अगदीच जलद गतीने वाढत असल्याचे या आकड्यांवरून स्पष्ट होते आहे. आज ३३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ७ पॉझिटिव्ह तर २७ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज २६ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून ८ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर १८ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १४६९ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून १९५१ व्यक्तींच्या स्वाबची (आरटी पीसीआर) तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी २४ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २३५ स्वाबचे अहवाल येणे बाकी आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २८ रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये उपचार सुरु असून ३३ व्यक्तींना होम आयसोलेशनची मुभा देण्यात आली आहे. तर १४ व्यक्ती यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. आज १५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३३८ झाली असून २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्या करिता वेगवेळ्या उपाययोजना करीत असून आरोग्य प्रशासनही रुग्णसेवेत तत्पर असल्याने कोरोनातून बऱ्यापैकी रुग्ण बरे होतांना दिसत आहे. शहरात आणखी एक सुसज्य कोविड केयर सेंटर तयार करण्याची योजना सुरु असून लवकरच रुग्णांच्या सेवेत ते उपलब्ध होणार असल्याचे कळते. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये गाडलीपुरा येथील दोन, गुरुवर्य कॉलनी दोन, भगतसिंग चौक एक, रंगारीपुरा दोन, सानेगुरुजी चौक एक, सेवानगर एक, टिळकनगर एक तर जुने कॉटन मार्केट येथील दोन व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांना अतिरिक्त कोविड केयर सेंटर अगदी सुलभ व सोयीचे होणार आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
रुग्णसंख्येचा आलेख वाढतच असून आज चार व्यक्तिंचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत !
रुग्णसंख्येचा आलेख वाढतच असून आज चार व्यक्तिंचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यात सातत्याने कोरोना बाधित रुग्ण आढळत असून रुग्ण वाढीचा आलेख वाढतच चालला आहे. कोरोना संक्रमणाचा वेग वाढला असून सामूहिक संसर्गाला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा फुगतच चालला आहे. आज चार व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२३ झाली. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. आज आणखी १५ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत २३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. <p>शहर व तालुक्यात कोरोनाचे संक्रमण चांगलेच वाढले असून दरदिवशी कोरोना संक्रमित व्यक्तींची नोंद होत असल्याने प्रशासनावरील तान चांगलाच वाढतांना दिसत आहे. आरोग्य प्रशासनाचीही चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारेच आता कोरोना संक्रमित होऊ लागल्याने त्यांच्यातही कोरोनाची धास्ती निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोविद योद्धयांनाच कोरोनाची लागण होऊ लागल्याने परिस्थिती गंभीर होतांना दिसत आहे. ११ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या २९ दिवसांच्या कालावधीत तब्बल २८२ कोरोनाग्रस्त रुग्णांची भर पडली आहे. १० ऑगस्ट पर्यंत तालुक्यात ४१ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होती. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह एकच रुग्ण राहिला होता. तालुका कोरोनमुक्त होण्याच्या वाटेवर असतांना अचानक कोरोनाने उसंडी मारत रुग्णांचे त्रिशतक पूर्ण केले आहे. आज २४ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी ४ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर २० व्यक्ती निगेटिव्ह आल्या. आता पर्यंत एकूण १४४३ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर १९२७ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली. आज आणखी २७ नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २४४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. आज आणखी १५ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २९ रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ३३ व्यक्तींना होम आयसोलेशन करण्यात आले आहे. तर १४ व्यक्तींवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. सध्या स्थितीत ७५ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. आज ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२३ झाली असून २३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये पोलीस क्वाटर येथील एक, शास्त्रीनगर एक, वासेकर ले-आऊट एक तर रंगारीपुरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. आज आणखी एक पोलीस जमादार पॉझिटिव्ह आल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले असून नगरपरिषदे मार्फत निर्जंतुकीकरणाची फवारणी होते तरी कोठे ?
शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले असून नगरपरिषदे मार्फत निर्जंतुकीकरणाची फवारणी होते तरी कोठे ?
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून अन्य साथीचे आजारही बळावले आहेत. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून डेंग्यू व टायफाईडच्या आजाराचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साथीच्या रोगाने ग्रस्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण चांगलेच वाढले असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. औषधी दुकानांमध्ये डॉक्टरांच्या पर्च्या हातात असलेल्या नागरिकांची रोजच रीघ लागलेली आढळून येत आहे. साथीच्या गंभीर आजरांनी शहरात कहर केलेला असतांना आरोग्य विभाग मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कित्येक वार्डांमध्ये मागील बऱ्याच दिवसांपासून निर्जंतुकीकरणाची फवारणी झाली नसून बहुतांश परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डुकरांनी तर हौदोस घातला असून आंगण परिसरात मुक्त संचार करणारी डुकरे घराच्या आवारात शिरतांना दिसत आहेत. डुकरांच्या बंदोबस्ता करिता सुज्ञ नागरिकांबरोबरच पत्रकारांनीही आरोग्य विभागाचे लक्ष वेधले पण आरोग्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. हजारोंच्या संख्येने असलेल्या डुकरांच्या लाखोंच्या संपत्तीचा वारसा आरोग्य विभागालाच मिळाला की काय, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. आरोग्य विभागाचे प्रतिबंधित उपायासंबंधीचे उदासीन धोरण साथीचे रोग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. <p>शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून या आजाराने आता पर्यंत तालुक्यातील सहा रुग्णांचा बळी घेतला आहे. रुग्णसंख्येचा आलेख तीव्र गतीने वाढत असून ११ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या २९ दिवसांत तब्बल २७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे. शहरात कोरोनाने थैमान घातले असतांनाच आता डासांपासून होणाऱ्या डेंग्यू मलेरिया व इतर आजारांनी सुद्धा नागरिकांना ग्रासले आहे. डेंग्यूचा डास शुद्ध पाण्यात निर्माण होत असल्याचे सांगितल्या जाते पण अशुद्ध ठिकाणीही डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. शहरातील वॉर्ड क्रं २ मध्ये एका व्यक्तीला डेंग्यू या आजाराने ग्रासले असून एकाला टायफाईड झाला आहे. तर कित्येक व्यक्ती साथीच्या रोगाने फणफणत आहे. घराघरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे. त्यानंतरही नगर परिषदेकडून डास निर्मूलनासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना होतांना दिसत नाही. गवत, झाडे झुडपे, साचलेले गढूळ पाण्याचे डबके, उघड्या नाल्या असलेल्या परिसरात नगरपरिषदेच्या मशीन कडून फॅगिंग होणे अपेक्षित असतांना प्रत्येक्षात ही मशीन अनेक भागात फिरकतही नाही. तिचा प्रवास फक्त मुख्य मार्गाने दिसून येतो. वास्तविक शहराच्या आतमध्ये गल्लीबोळात डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो. मात्र आतील गल्लीबोळांपर्यंत फॅगिंग मशीन पोहचतच नसल्याची नागरिकांची ओरड आहे. शिवशेनेतर्फे निर्जंतुकीकरणाचे कार्य करण्यात येत होते. त्यांचे निर्जंतुकीकरणाचे वाहन एक महिन्याआधी वार्डात फिरले होते. त्यानंतर वार्डात निर्जंतुकीकरणाची फवारणी झाल्याचे पाहायला मिळाले नाही. दररोज डुकरांचा मुक्त संचार सुरु असतो. गल्ली अंगणात फिरणारी डुकरे घराच्या आवारात शिरतांना दिसत आहेत. वॉर्ड क्रं २ हा वांझोटा वार्ड झाला असून या वार्डात असुविधा व अस्वच्छतेची भरमार पाहायला मिळत आहे. विठ्ठलवाडी येथील मुख्य रस्ता दुरुस्तीकरणाकरिता पूर्णतः खोदण्यात आला असून पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. मागील पाच महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरु असून अगदीच संत गतीने सुरु असलेले काम पावसाने पूर्णतः ठप्प पडले आहे. रस्ता पूर्णतः चिखलमय झाला असून नागरिकांच्या घरासमोर डबके साचले आहे. चिखलातून मार्ग काढतांना दुचाकी घसरून कित्येक अपघात झाले आहेत. गल्लीबोळातून निघणारा मार्गही प्रतिबंधित क्षेत्रात गेल्याने रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. साचलेल्या डबक्यांमध्ये डुकरे गटांगळ्या घालत असून डासांची उत्पत्ती होतांना दिसत आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती व संबंधित नगरसेवकांनी याबाबींकडे जातीने लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या असुविधा व आरोग्यविषयक निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याची आग्रही मागणी नागरिकांमधून होत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले असून नगरपरिषदे मार्फत निर्जंतुकीकरणाची फवारणी होते तरी कोठे ?
शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले असून नगरपरिषदे मार्फत निर्जंतुकीकरणाची फवारणी होते तरी कोठे ?
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहरात कोरोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले असून अन्य साथीचे आजारही बळावले आहेत. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून डेंग्यू व टायफाईडच्या आजाराचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. साथीच्या रोगाने ग्रस्त झालेल्या रुग्णांचे प्रमाण चांगलेच वाढले असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची कमालीची गर्दी पाहायला मिळत आहे. औषधी दुकानांमध्ये डॉक्टरांच्या पर्च्या हातात असलेल्या नागरिकांची रोजच रीघ लागलेली आढळून येत आहे. साथीच्या गंभीर आजरांनी शहरात कहर केलेला असतांना आरोग्य विभाग मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे. कित्येक वार्डांमध्ये मागील बऱ्याच दिवसांपासून निर्जंतुकीकरणाची फवारणी झाली नसून बहुतांश परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डुकरांनी तर हौदोस घातला असून आंगण परिसरात मुक्त संचार करणारी डुकरे घराच्या आवारात शिरतांना दिसत आहेत. डुकरांच्या बंदोबस्ता करिता सुज्ञ नागरिकांबरोबरच पत्रकारांनीही आरोग्य विभागाचे लक्ष वेधले पण आरोग्य विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. हजारोंच्या संख्येने असलेल्या डुकरांच्या लाखोंच्या संपत्तीचा वारसा आरोग्य विभागालाच मिळाला की काय, अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. आरोग्य विभागाचे प्रतिबंधित उपायासंबंधीचे उदासीन धोरण साथीचे रोग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. <p>शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून या आजाराने आता पर्यंत तालुक्यातील सहा रुग्णांचा बळी घेतला आहे. रुग्णसंख्येचा आलेख तीव्र गतीने वाढत असून ११ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या २९ दिवसांत तब्बल २७८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळत आहे. शहरात कोरोनाने थैमान घातले असतांनाच आता डासांपासून होणाऱ्या डेंग्यू मलेरिया व इतर आजारांनी सुद्धा नागरिकांना ग्रासले आहे. डेंग्यूचा डास शुद्ध पाण्यात निर्माण होत असल्याचे सांगितल्या जाते पण अशुद्ध ठिकाणीही डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो. शहरातील वॉर्ड क्रं २ मध्ये एका व्यक्तीला डेंग्यू या आजाराने ग्रासले असून एकाला टायफाईड झाला आहे. तर कित्येक व्यक्ती साथीच्या रोगाने फणफणत आहे. घराघरात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे. त्यानंतरही नगर परिषदेकडून डास निर्मूलनासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना होतांना दिसत नाही. गवत, झाडे झुडपे, साचलेले गढूळ पाण्याचे डबके, उघड्या नाल्या असलेल्या परिसरात नगरपरिषदेच्या मशीन कडून फॅगिंग होणे अपेक्षित असतांना प्रत्येक्षात ही मशीन अनेक भागात फिरकतही नाही. तिचा प्रवास फक्त मुख्य मार्गाने दिसून येतो. वास्तविक शहराच्या आतमध्ये गल्लीबोळात डासांचा प्रादुर्भाव जास्त असतो. मात्र आतील गल्लीबोळांपर्यंत फॅगिंग मशीन पोहचतच नसल्याची नागरिकांची ओरड आहे. शिवशेनेतर्फे निर्जंतुकीकरणाचे कार्य करण्यात येत होते. त्यांचे निर्जंतुकीकरणाचे वाहन एक महिन्याआधी वार्डात फिरले होते. त्यानंतर वार्डात निर्जंतुकीकरणाची फवारणी झाल्याचे पाहायला मिळाले नाही. दररोज डुकरांचा मुक्त संचार सुरु असतो. गल्ली अंगणात फिरणारी डुकरे घराच्या आवारात शिरतांना दिसत आहेत. वॉर्ड क्रं २ हा वांझोटा वार्ड झाला असून या वार्डात असुविधा व अस्वच्छतेची भरमार पाहायला मिळत आहे. विठ्ठलवाडी येथील मुख्य रस्ता दुरुस्तीकरणाकरिता पूर्णतः खोदण्यात आला असून पावसाळ्याच्या तोंडावर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. मागील पाच महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरु असून अगदीच संत गतीने सुरु असलेले काम पावसाने पूर्णतः ठप्प पडले आहे. रस्ता पूर्णतः चिखलमय झाला असून नागरिकांच्या घरासमोर डबके साचले आहे. चिखलातून मार्ग काढतांना दुचाकी घसरून कित्येक अपघात झाले आहेत. गल्लीबोळातून निघणारा मार्गही प्रतिबंधित क्षेत्रात गेल्याने रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. साचलेल्या डबक्यांमध्ये डुकरे गटांगळ्या घालत असून डासांची उत्पत्ती होतांना दिसत आहे. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती व संबंधित नगरसेवकांनी याबाबींकडे जातीने लक्ष घालून नागरिकांना होणाऱ्या असुविधा व आरोग्यविषयक निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याची आग्रही मागणी नागरिकांमधून होत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
शहरात साथीच्या रोगाने थैमान घातले असून नगरपरिषदे मार्फत निर्जंतुकीकरणाची फवारणी होते तरी कोठे ?
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
क्राईम ब्लास्ट :- व्यक्तिगत स्पर्धेतून सुपारी देऊन विष्णू कष्टी याचा खांबाडा परिसरात निर्दयी खून
BHUMIPUTRACHIHAK.COM
क्राईम ब्लास्ट :- व्यक्तिगत स्पर्धेतून सुपारी देऊन विष्णू कष्टी याचा खांबाडा परिसरात निर्दयी खून
bhumiputrachihak.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज ३६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला !
तालुक्यात कोरोनाचा उद्रेक, आज ३६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून तालुक्यात कोरोना संक्रमणाची गती अगदीच तीव्र झाली आहे. आज कोरोना संक्रमित व्यक्तींच्या संख्येने उचांक गाठला असून एका दिवसात ३६ व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली आहे. तालुका कोरोनाचा हॉसस्पॉट बनला असून सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही हादरले आहे. आरोग्य विभागही सततच्या रुग्णवाढीने मेटाकुटीस आल्याचे पाहायला मिळत आहे. आशासेविकांची व आरग्य सेवकांची चांगलीच पायपीट होत असून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची नोंदणी व तपासणी करतांना त्यांची दमछाक होतांना दिसत आहे. आज ३६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१९ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. शहरातील आणखी एका कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या चार झाली आहे. आज आणखी २३ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. आता पर्यंत एकूण २२४ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहे. <p><p>तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या उचांक गाठत आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णसंख्येने एका दिवसातील पॉझिटिव्ह रुग्णांचा विक्रम मोडला असून एका दिवसातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येचा नवीन विक्रम आज प्रस्थापित केला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून आज ३६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुका हादरला आहे. कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात ठेवण्याचे सर्व प्रयत्न असफल होतांना दिसत आहे. नागरिकांच्या बेजाबदारपने कळस गाठला असून त्यांची लापर्वाही कोरोना संक्रमणाचे कारण बनत आहे. आज ५८ नमुन्याचे अहवाल प्राप्त झाले असून २२ पॉझिटिव्ह तर ३६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आज ७४ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यापैकी १४ व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ६० व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत १४१९ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून १८९९ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४७ व्यक्ती कोविड केयर सेंटरमध्ये भरती असून ३० व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १४ व्यक्तींवर यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. आज एकूण ३६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३१९ झाली असून २२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. पांढरकवडा येथे कोरोनाचा उपचार घेत असलेल्या ६५ वर्षीय रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या चार झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये साईनगरी येथील दोन, गुरुवर्य कॉलनी एक, सिंधी कॉलनी एक, शिवाजी चौक पाच, चिखलगांव एक, जैन ले-आऊट एक, कणकवाडी एक, भीमनगर एक, नांदेपेरा रोड एक, श्रीराम नगर एक, रंगारीपुरा चार, सेवानगर दोन, छोरीया नगर एक, जिल्हा परिषद कॉलनी एक, ग्रामीण रुग्णालय क्वाटर एक, न्यायालयातील दोन, पटवारी कॉलनी एक तर सानेगुरुजी नगर येथील सहा व्यक्तींचा समावेश आहे. आज आणखी एका नामांकित डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाला आहे. न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्येही कोरोनाचे संक्रमण वाढत असून आज आणखी दोन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. शहरात कोरोनाचा तांडव सुरु असून डॉक्टरच पॉझिटिव्ह निघत असल्याने त्याचा परिणाम रुग्णसेवेवर होतांना दिसत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
धक्कादायक! बचत गट वितरण( SIK) अधिकारी यांनी केली महिलेला शरीर सुखाची मागणी...Read More
WWW.MAREGAONWARTA.COM
धक्कादायक! बचत गट वितरण( SIK) अधिकारी यांनी केली महिलेला शरीर सुखाची मागणी...Read More
maregaonwarta.com
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1625
1626
1627
1628
1629
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे