Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील आणखी सहा व्यक्तींना कोरोनाची लागण, तालुक्यातील रुग्ण झाले १८८
शहरातील आणखी सहा व्यक्तींना कोरोनाची लागण, तालुक्यातील रुग्ण झाले १८८
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरात कोरोना संक्रमणाची गती अधिकच तीव्र झाली असून रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने प्रशासनही चिंतेत आले असून नागरिकही चांगलेच भयभीत झाले आहेत. सातत्याने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडाही चांगलाच फुगत चालला आहे. आज आणखी सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८ झाली आहे. आज आणखी दोन रुग्ण कोरोनातुन पूर्णपने बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. <p><p>शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला असून कोरोनाची लाट तीव्र रूप धारण करतांना दिसत आहे. कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच असल्याने प्रशासनही चांगलेच चिंतेत आले आहे. काही केल्या कोरोना संक्रमणाची गती कमी होतांना दिसत नसून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने तालुक्यातील जनजीवन चांगलेच प्रभावित झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १२ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्यापैकी सहा व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर सहा रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण १२०५ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. आज आणखी २७ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २६० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित झाले आहेत. पॉझिटिव्ह व्यक्तींपैकी २८ रुग्णांवर कोविड केयर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत, तर १३ व्यक्तींना यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच ३७ व्यक्तींना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. सध्यस्थितीत कोविड केयर सेंटरमध्ये ६४ व्यक्तींना विलीगीकरणात ठेवण्यात आले आहे. तालुक्यात ४९ प्रतिबंधित क्षेत्र असून ग्रामीण भागात १५, तर शहरात ३४ प्रतिबंधित क्षेत्र ऍक्टिव्ह आहेत. आज पॉझिटिव्ह आलेले व्यक्ती शहरातीलच असून यामध्ये सानेगुरुजी नगर येथील एक, टागोर चौक एक, समृद्धी अपार्टमेंट एक, शिवनेरी चौक एक, जैन ले-आऊट एक तर टिळक चौक येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८८ झाली असून ११० रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७८ झाली आहे. प्रशासन कोरोनाचे संक्रमण रोखण्या करिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे. <p><p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील आणखी आठ व्यक्तींना कोरोनाची लागण, तालुक्यातील रुग्णसंख्या झाली १८२
शहरातील आणखी आठ व्यक्तींना कोरोनाची लागण, तालुक्यातील रुग्णसंख्या झाली १८२
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच असून प्रत्येक उजाडणारा दिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढवितांना दिसत आहे. दररोज पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासनही चिंताग्रस्त झाले असून उपाययोजना करतांना प्रशासनावर चांगलाच तान पडतांना दिसत आहे. आज तालुक्यात आणखी आठ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या १८२ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. आज कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या १५ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता १०८ झाली आहे. <p>शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. कोरोना संक्रमणाची गती अधिकच तीव्र झाली असून सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने शहरवासियांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे. आज २९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी ८ पॉझिटिव्ह तर २१ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज १३ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, त्या सर्वांचेच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत ११९३ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या, तर १६७० आरटी पीसीआर स्वाब तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी ६२ व्यक्तींचे स्वाब तपासणी करिता पाठविण्यात आल्याने २३३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. ६४ व्यक्तींना सध्या स्थितीत कोविड केयर सेंटरला ठेवण्यात आले आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये रवी नगर येथील दोन, साईनागरी एक, गाडलीपुरा तीन, पटवारी कॉलनी एक, तर विठ्ठलवाडी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १८२ झाली असून १०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७४ झाली आहे. आठ कोरोना बाधित रुग्णांवर अन्य जिल्ह्यात उपचार सुरु आहेत. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्या करिता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनीही अनावश्यक जनसंपर्क टाळून कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यास सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
रेल्वे कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
रेल्वे कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
सेंट्रल रेल्वेच्या वनी विभागात ट्रैक मेन या पदावर कार्यरत असलेल्या कर्मचार्याने किरायाच्या रुममधे सिलिंगला गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास विट्ठलवाडी परिसरात उघडकिस आली आहे. <p>मुळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी असलेला दिपक मोर्या हा रेल्वे कर्मचारी तीन महिन्याच्या सुट्टीनंतर चार पाच दिवसांआधिच वनी येथे परतला असून त्याला होम क्वारंटईन ठेवण्यात आले होते. अंदाजे 26 ते 27 वर्षाचा असलेला हा कर्मचारी माजी नगरसेवक प्रकाश पिंपळ्कर यांच्या घरी किरायाने रहात होता. 14 दिवसानंतर तो कर्तव्यावर रुजू होणार होता. पण आज सकाळी त्याने घराच्या सिलिंगला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने अनेक तर्कवितर्क लावल्या जात आहे. अत्यंत शांत व सुस्वभावी कर्मचारी म्हणून त्याची डीपार्टमेन्ट मध्ये ओळख होती.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच, आज आणखी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !
तालुक्यात कोरोनाचा तांडव सुरूच, आज आणखी २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून दिवसागणिक मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहे. आज २१ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून हि आता पर्यंतची एका दिवसातील सार्वधिक रुग्ण संख्या ठरली आहे. मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा फुगतच चालला आहे. त्यामुळे प्रशासना वरील ताणही दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७४ झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१ झाली आहे. ही सुधारित पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या असून निव्वळ जिल्ह्यात नोंदी असलेल्या रुग्णांची ही एकूण संख्या आहे. <p><p>शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा कहर वाढतच चालला असून प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासन हादरून गेले आहे. ग्रामीण भागही हळूहळू कोरोनाच्या विळख्यात येऊ लागला आहे, तर शहरात कोरोनाचे तांडव सुरु आहे. शहरातील बहुतांश परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने प्रत्येक क्षेत्रातील नागरिकांची काळजी वाहतांना आरोग्य प्रशासनाची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. आज एकूण २६ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी २० पॉझिटिव्ह तर ६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज दोन रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी एक पॉझिटिव्ह तर एका व्यक्तीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत ११८० रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या तर १६०८ व्यक्तींच्या स्वाबची तपासणी करण्यात आली आहे. आज आणखी ६२ व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले असून एकूण २०० व्यक्तींचे अहवाल अप्राप्त आहेत. ५३ व्यक्तींना सध्या स्थितीत कोविड केयर सेंटरला भरती ठेवण्यात आले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३७ रुग्णांवर कोविड केयर सेंटरला उपचार सुरु असून ११ रुग्ण यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहेत. तसेच अन्य पॉझिटिव्ह रुग्णांपैकी गृह विलीगीकरणात २५, चंद्रपूर येथे दोन, नागपूर येथे तीन, सावंगी मेघे येथे एक तर पांढरकवडा येथे दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तालुक्यात एकूण प्रतिबंधित क्षेत्र ५७ झाले असून त्यापैकी ४६ प्रतिबंधित क्षेत्र ऍक्टिव्ह आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागात १५ तर शहरात ३१ प्रतिबंधित क्षेत्र ऍक्टिव्ह आहेत. जिल्ह्याच्या आकडेवारीनुसार तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७४ झाली असून ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१ झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्ण हे भालर, कैलासनगर व शहरातील असल्याचे समजते. यामध्ये विठ्ठलवाडी येथील एक, भालर येथील तीन, कैलासनगर येथील चार, सर्वोदय चौक येथील सहा, जुना कॉटन मार्केट परिसरातील पाच, दीपक टॉकीज जवळील रामपुरा येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. शहरातील प्रसिद्ध असलेले मिष्ठान व्यावसायिक व त्यांच्या कुटुंबातील काही व्यक्ती नागपूर येथे पॉझिटिव्ह निघाल्याचे कळते. कोरोना शहरात उग्र रूप धारण करतांना दिसत असून आज एकाच दिवशी २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याने ही आज पर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण संख्या ठरली आहे. प्रशासन कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता हरसंभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
भाऊ मी आत्महत्या करीत आहे, मला माफ कर...Read More
NEWS34.CO.IN
भाऊ मी आत्महत्या करीत आहे, मला माफ कर...Read More
news34.co.in
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात कोरोनाचा कहर सुरुच, आज आणखी 15 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले!
तालुक्यात कोरोनाचा कहर सुरुच, आज आणखी 15 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले!
प्रशांत चंदनखेडे वणी :-<p> शहरा बरोबरच ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा घट्ट होतांना दिसत आहे. तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होतांना दिसत असून प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहे. आज आणखी १५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या १७४ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १०७ झाली आहे. <p>शहर व तालुक्यात कोरोनाने उछांद मांडला असून दिवसा गनिक कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. कोरोना संक्रमणाची गती तिव्र झाल्याने आरोग्य विभागही हादरला आहे. कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांची कळजी वाहतांना व कोविड केयर सेंटर मधिल रुग्णांवर उपचार करतांना आरोग्य विभागाची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. शहरातील बहुतांश परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याने आरोग्य प्रशासनावर चांगलाच तान पडतांना दिसत आहे. आज १३ तपासणी स्वाबचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर दोन रापिड़ अँटीजन चाचणीचे रेपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढून १७४ झाला आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १०७ झाली आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींमधे भालर येथील सहा व्यक्ती, लालगुडा येथील एक, काथडे ले-आउट गणेशपूर येथील चार, वसंत विहार येथील दोन, राजूर येथील एक तर पद्मावती नगर येथील एका व्यक्तिचा समावेश आहे. सध्यास्थीतीत कोविड केयर सेंटरला ४५ व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. ज्या रुग्णांमध्ये अती सौम्य लक्षणे आहेत त्यांना दोन तीन दिवसांच्या त्रिटमेन्ट नंतर होम आयसोलेशनमध्ये ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. आज एका रुग्णाला यवतमाळ येथे हलविण्यात आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे. प्रशासन नागरिकांना कोविडमुक्त करण्याकरिता हरसंभव प्रयत्न करित असून नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
काय सांगता! या गावात पडला चक्क मासोळ्यांचा पाऊस…लोकांच्या घरावर, अंगणात मासोळ्याच मासोळ्या...Read More
WWW.ESAKAL.COM
काय सांगता! या गावात पडला चक्क मासोळ्यांचा पाऊस…लोकांच्या घरावर, अंगणात मासोळ्याच मासोळ्या...Read More
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आज सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या 159 झाली
आज सात व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या 159 झाली
प्रशांत चंदनखेडे वणी :-<p>शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून दर दिवशी कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडतांना दिसत आहे. शहरतील कोरोना संक्रमणाची गती अधिक तिव्र झाली असून आज आणखी सात पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 159 झाली आहे. तर ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 92 झाली आहे. <p>शहर व तालुक्यात कोरोनाचा पदुर्भाव चांगलाच वाढतांना दिसत असून कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. आज 5 तपासणी नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तर दोन रापिड़ अँटीजन चाचणींचे रेपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तिंमध्ये जटाशंकर चौकातील मेडिकल मधिल दोन व्यक्ती, भालर टाऊनशिप येथील दोन, रंगणाथ नगर येथील एक, रंगारीपुरा येथील एक तर सावंगी (नायगाव) येथील एका व्यक्तिचा समावेश आहे. आज एकुण सात व्यक्ती पॉझिटीव्ह असून तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 159 झाली आहे. तर ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 92 झाली आहे. प्रशासन योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना करित असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शेतकऱ्याची रोकड लांबविल्या प्रकरणी विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक
शेतकऱ्याची रोकड लांबविल्या प्रकरणी विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक
प्रशांत चंदनखेडे वणी :-<p> शेतातील पिकांवर फवारनी करण्याकरिता किटक नाशक द्रव्य खरेदी करण्याकरिता शहरात आलेल्या वनोजादेवी येथील एका 60 वर्षीय शेतकऱ्याचे नऊ हजार रुपये चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. <p>सध्या शेतांमधिल पिकांवर फवारनी मारण्याचा हंगाम सुरू असून शेतकऱ्याचे किटक नाशक खरेदी करिता तालुक्याच्या ठिकानी रोजचेच जाने येणे सुरू असते. जनार्दन तुकाराम गाडगे (60) रा. वनोजदेवी ता. मारेगाव हा शेतकरी देखील किटक नाशक खरेदी करण्याकरिता 28 ऑगस्टला शहरात आला होता. जटाशंकर चौकातील एका कृषी केंद्रातून किटक नाशक खरेदी केल्यानंतर भाजी खरेदी करिता गेला असता त्याच्या जवळील नऊ हजार रुपये चोरला गेल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने वनी पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपी विरुद्ध तक्रार नोंदविली. तक्रार मिळताच पोलिसांनी तत्काळ तपास करित सूत्रांकडून माहिती मिळवत सेवानगर येथील विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली असून त्याच्यावर भादंवि च्या कलम 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या जवळून चोरी केलेल्या रक्कमेतिल 2500 रुपये व गुन्हा कर्तेवेळी वापरलेली दुचाकी किंमत 30 हजार रुपये असा एकुण 32 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. <p>सदर कार्यवाही एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नी. वैभव जाधव, डिबी पथकाचे गोपाल जाधव, सुधिर पांडे, सुनिल खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर यांनी केली आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील चार व्यक्तींना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या झाली 152
WANICITY.COM
शहरातील चार व्यक्तींना कोरोनाची लागण, रुग्ण संख्या झाली 152
प्रशांत चंदनखेडे वणी :-<p> शहर व तालुक्यात कोरोनाचा विळखा घट्ट होतांना दिसत असून कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढती संख्या प्रशासनाला हादरऊन सोडत आहे. शहरात कोरोनाचा उद्रेक होण्याच्या मार्गावर असून ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्या करिता आरोग्य विभाग दिवसरात्र झटत असून प्रतिबंधित क्षेत्रा बरोबरच कोविड केयर सेंटर मधिल व्यक्तींचीही योग्यरित्या काळजी घेण्यात येत असतांनाही कोरोना संक्रमनाची गती कमी होतांना दिसत नाही. आज आणखी 4 व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याणे तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 152 झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 85 झाली आहे.<p> शहरात दिवसा गनिक कोरोनाचे रुग्ण आढळत असून कोरोना बाधितांचा आकडा फुगतच चालला आहे. कोरोनाच्या दहशतीत प्रत्येक जीव वावरतांना दिसत आहे. साधा सर्दी खोकलाही झाला की, अंगाचा थरकाप उडतांना दिसत आहे. सर्दी खोकल्याचा रुग्ण खाजगी डॉक्टरांकडे गेला की, डॉक्टरच भयभित होऊन शासकीय रुग्णालयाचा रस्ता दाखवतात. अन्य कोणताही गंभीर आजार जडला तरी कोरोनाची चाचणी करावी लागत आहे. अन्य कोणत्याही प्रकारच्या आजाराने अत्यवस्थ स्थितीत असलेल्या व्यक्तीला भरती करुन घेतांना खाजगी रुग्णालयातील डॉक्टर कचरत आहे. आधी शासकीय रुग्णालयातून कोविडची चाचणी करण्याचा सल्ला दिल्या जात आहे. कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढतच असून आता डॉक्टारांमध्येच भितिचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळत आहे. अन्य कोणताही आजार जडला तरी कोरोनाची टेस्ट करावी लागत असल्याने कित्येक व्यक्ती दवाखान्यात जाण्याचेच टाळतांना दिसत आहे. कोरोनामूळे अन्य आजाराकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात डॉक्टारांनाच कोरोनाची लागण झाल्याने नागरिकांमधील भिती आणखीच वाढली आहे. एकुणच नागरिकांबरोबरच आता कोविड योध्यांमधे सुद्धा कोरोनाची चांगलीच धास्ती निर्माण झलेली पाहायला मिळत आहे. आज पॉझिटीव्ह आलेले चारही रुग्ण सानेगुरुजी नगर येथील आहेत. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 152 झाली असून 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 85 झाली आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करित असून नागरिकांनीही खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
दारुची तस्करी करणाऱ्या वाहनावर कार्यवाही, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त !
WANICITY.COM
दारुची तस्करी करणाऱ्या वाहनावर कार्यवाही, 9 लाखांचा मुद्देमाल जप्त !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p> अवैधपणे देशी दारुची वाहतूक करणाऱ्या एका चार चाकी वाहनावर कार्यवाही करुन देशी दारुसह नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बोधेनगर चिखलगाव येथे 27 ऑगस्टला रात्री 10 ते 10.30 वाजताच्या सुमारास ही कार्यवाही करण्यात आली. तसेच आरोपिला अटक करुन त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. <p>गणेश उस्तव सुरू असल्याने शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता गस्तिवर असलेल्या पोलिसांना बोधे नगर चिखलगाव येथे एका महिंद्रा पिकअप मध्ये अवैध देशी दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानूसार पोलिसांनी सापळा रचून बोधे नगर चिखलगाव येथे उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला ताब्यात घेतले. MH 49 D 7064 या महिंद्रा पिकअप वाहनात राजू शंकर आत्रम (22) रा. गोकुळनगर हा आरोपी आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये रॉकेट संत्रा देशी दारूचे 180 मि.ली. चे 77 बॉक्स तर 90 मी.ली. चे 88 बॉक्स आढळून आले. पोलिसांनी 4 लाख 21 हजार 300 रुपये किमतीची देशी दारू तसेच दारू तस्करी करिता उपयोगात आणलले महिंद्रा पिकअप वाहन अंदाजे किंमत 5 लाख रुपये, असा एकुण 9 लाख 21 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणपतीचे विसर्जन अगदीच जवळ आले असतांना विसर्जन काळात दारुची दुकाने बंद रहात असल्याने अवैध दारूचा तूटवाडा भासू नये म्हणून अवैध मार्गाने दारुची तस्करी करण्याकरिता अवैध दारू विक्रेते सरसावले आहेत. चोरट्या मार्गाने दारू तस्करी करण्यात येत असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवैध दारू विक्रेत्यांचा हा प्रयत्न फसला आहे. राजू शंकर आत्रम रा. गोकुलनगर या आरोपीच्या माध्यमातून अवैध दारू विक्रेत्यांचे मोठे रॉकेट गळाला लागू शकते. शहर व तालुक्यात अवैध दारू विक्रिचे प्रमाण चांगलेच वाढले असून अवैध दारू विक्रेतेही चांगलेच निर्ढावले आहेत. आजच्या या कार्यवाहीने अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले असले तरी अवैध दारू तस्करीतले मोठे मासे गळाला लागल्या शिवाय अवैध दारू विक्रिवर अन्कुश लागणार नाही. पोलिसांनी 4 लाख 21 हजार 300 रुपयांची देशी दारू व 5 लाख रुपये किंमतीचे महिंद्रा पिकअप वाहन असा एकुण 9 लाख 21 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी राजू शंकर आत्राम याच्यावर भादंवि च्या कलम 269,188 व सहकलम 65 (अ)(ई), 82,83 मदाका नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. <p>सदर कार्यवाही एसडीपीओ सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नी. वैभव जाधव, डिबी पथकाचे गोपाल जाधव, सुनिल खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, पंकज उंबरकर यांनी केली आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सण उस्तवांच्या काळात आवश्यक वस्तूंचे भाव वधारले
WANICITY.COM
सण उस्तवांच्या काळात आवश्यक वस्तूंचे भाव वधारले
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p> <p><p> कोरोना लॉकडाऊनच्या काळात सार्वजनीक उस्तव सोहळ्यांवर निर्बंध घातल्या गेल्याने नागरिकांच्या आनंदावर विरजण आले असतांनाच हंगामी व्यावसायिकांनाही लॉकडाऊनचा चांगलाच फटका बसला व बसत आहे. काही व्यवसायिकांचा हंगाम लॉकडाऊनला बळी चढला आहे. तर काही हंगामी व्यावसायिकांना अजुनही लॉकडाऊनचा फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामूळे आता ज्या सण उस्तवात ज्या वस्तूंची जास्त मागणी असते, त्या वस्तूंचे भाव दुपटिने वाढविण्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता सण उस्तवांचा काळ सुरू झाला असून प्रत्येक सनाला एका विशिष्ट वस्तूचं महत्व प्राप्त आहे. सध्या गणेशोस्तवाचा काळ सुरू असून हार फुलांना या काळात चांगलीच मागणी असते. नेमकी हिच संधी साधून फुलहार विक्रेत्यांनी हारांची किमत दुपटिने वाढविली असल्याने आधिच आर्थिक झळा सोसत असलेल्या सामान्य वर्गाला गणेशोस्तवाचा आनंदही हारा वाचुन फुलावरच साजरा करण्याची वेळ आली आहे. गणरायाची स्थापना होण्याच्या दोन दिवस आधी 10 रुपयांना मिळणारा फुलांचा हार स्थापना दिनी 30 रुपयांवर जाऊन पोहचला. यावरुन प्रत्येकांचा एक दिवस जरुर येतो, हे लक्षात येत असले तरी याचा भुरदंड सामान्य जनतेलाच सहन करावा लगतो हे ही तेवढेच खरे आहे. <p>कोरोनाच्या दहशतीत सुरवातीच्या दोन तीन महिन्यांचा काळ घरातच बसुन दिवस मोजण्यात गेला. कालांतराने लॉकडाऊन मधून शिथिलता मिळत गेल्यानंतर उध्योग, व्यवसाय, कामधंदे सुरू झाले खरे पण पाहिजे त्या प्रमाणात त्यांना चालना मिळाली नाही. लॉकडाऊन काळात हजारो लोकांचा रोजगार हिरावल्या गेल्याने बेरोजगारीच संकट गडद होत गेलं. अशा परिस्थितीत जवळचा पैसा आटल्याणे जिवन जगणं कठिण झाल असतांना अन्य वस्तू खरेदी करण्याचा तर विचारच दुर राहिला. आजही परिस्थिती पुर्व पदावर आलेली नाही. जगण्या साठीचा संघर्ष सुरू असतांना वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडत आहे. श्रावण महिना सुरू होण्या पुर्वी चिकन विक्रेत्यांनी धुम ठोकली तर सण उस्तवांच्या काळात महत्वपुर्ण वस्तूंच्या किमती वाढविण्यात आल्याने सामान्य वर्गाच्या आनंदावर विर्जन आले आहे. प्रत्येक वस्तूंचे भाव वधारत असून मिळकत मात्र अत्यल्प असल्याने सण उस्तव कसे साजरे करायचे या विवंचनेत नागरिक अडकले आहेत. जागतिक मंदीतून सावरत नाही तोच कोरोनाने रोजगारांचीही संधी हिराऊन घेतल्याने सामान्य कुटुंबाची परवड होत असतांना सण उस्तवांच्या काळात आवश्यक वस्तूंच्या किमती वाढविल्या जात असल्याने सामान्य नागरिकांमध्ये सण उस्तवाच्या आनंदातही नैराश्य पाहायला मिळत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मुलाला नोकरीच्या आमिशात फसवणूक झालेल्या वडिलांची घुग्घुस वर्धा नदीत आत्महत्या...Read More
WWW.RAJYAREPORTER.COM
मुलाला नोकरीच्या आमिशात फसवणूक झालेल्या वडिलांची घुग्घुस वर्धा नदीत आत्महत्या...Read More
rajyareporter.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आज सतरा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या झाली १४८
WANICITY.COM
आज सतरा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यातील रुग्ण संख्या झाली १४८
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यातील कोरोनाचं संकट गडद होतांना दिसत असून मागील काही दिवसांपासून शहरात कोरोनाचा उद्रेक होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. निवळत आलेली कोरोनाची साथ परत सक्रीय होऊन उग्र रूप धारण करू लागली आहे. शहर व तालुक्यात कोरोनाचे संक्रमण अगदीच तीव्र गतीने वाढत असून प्रत्येक दिवशी मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने जनता चांगलीच भयभीत झाली आहे. आज आणखी १७ व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या १४८ झाली. तर ऍक्टिव्ह पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या ८७ झाली आहे. <p> शहरात कोरोनाचा उद्रेक होताना दिसत असून शहर वासियां बरोबरच पोलीस व डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होतांना दिसत आहे. कोविड योद्धेच आता कोरोनाग्रस्त होऊ लागल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सहा नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर ११ जणांचे रॅपिड अँटीजेन चाचणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ८७ झाली आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्यांमध्ये पटवारी कॉलनीतील दोन, काळे लेआऊट मधील दोन, रंगारी पुरा एक, एस बी लॉन परिसरातील एक, रवी नगर एक, रंगनाथ नगर मधील एक, उकनी येथील एक, जैन लेआऊट मधील एक, जत्रा रोड एक, सिंधी कॉलनीतील पाच, भाल्लर येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. सतत आढळणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्णांमुळे प्रशासनही चिंतेत आले असून उपाय योजना करतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. आरोग्य यंत्रणाही हतबल झाली असून सततच्या धावपळीने, त्यांच्या वरही चांगलाच ताण वाढल्याचे दिसत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी जनसंपर्क टाळून आवश्यक नसल्यास घराबाहेर पळण्याचे टाळावे तसेच स्वतःची व परिवाराची योग्य दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यातील दहा व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह, रुग्ण संख्या झाली 131
तालुक्यातील दहा व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह, रुग्ण संख्या झाली 131
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढतच असून आज तालुक्यात 10 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 131 झाली आहे. तर ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 70 झाली आहे. <p>शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर वाढतच असून दिवसागनिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहे. कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोनचे संक्रमण रोखतांना प्रशासनही हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाचिही कोरोना बाधित क्षेत्रातील नागरिकांची काळजी वाहतांना चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. आज शहरातील दोन डॉक्टारांबरोबरच आठ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज तीन नमुन्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले तर अँटी रापिड़ चाचणी अंतर्गत पाच रेपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत, तसेच शहर्तील दोन व्यक्तींचे रेपोर्ट चंद्रपुर येथे पॉझिटीव्ह आले आहेत. आज पॉझिटीव्ह आलेल्या व्यतींमधे भालर येथील एक, सर्ववोदय चौक येथील तीन, तलाव रोड वरिल एक, वरध अपार्टमेन्ट च्या बाजूचे दोन व गौरक्षंंन मधिल तीन व्यक्तींचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव औषधी विक्रेत्यासह डॉक्टारांनाही होतांना दिसत आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या व्यक्तींमुळे तालुक्यातील पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या 131झाली असून ऐक्टिव पॉझिटीव्ह व्यक्तींची संख्या 70 झाली आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनाही दक्षता घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1628
1629
1630
1631
1632
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे