Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
लॉकडाऊन काळात व्यवसायांवर लावलेले निर्बंध हटविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी !
लॉकडाऊन काळात व्यवसायांवर लावलेले निर्बंध हटविण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले. २५ मार्च पासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी सतत वाढत असल्याने नागरिकांची आर्थिक गळचेपी झाली असून नागरिकांवर मानसिक तणावही निर्माण झाला आहे. या काळात रोजगार नोकऱ्या हिरवाल्याने आर्थिक विवंचनेत सापडलेल्या नागरिकांनी आत्महत्ये सारखे पर्याय निवडले आहे. छोटे व्यवसाय ठप्प पडले आहेत. हंगामी व्यावसायिकांचा हंगाम लॉकडाऊनला बळी चढला आहे. बारा बलुतेदारांचे व्यवसायही लॉकडाऊनमुळे बंद पडले आहेत. परंपरागत व्यवसायालाही लॉकडाऊनची झळ बसली आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची तर पूर्ती दैना झाली आहे. वाहतुकीची साधने बंद असल्याने गावागावात नागरिक कैद झाले आहेत. शहरांपासून तर गाव खेड्यापर्यंत माणसांना सुखरूप पोहचवणारी वाहतूक वर्धनी लालपरी लॉकडाऊन काळापासून पूर्णतः बंद होती, तर आता तिच्या वाहतुकीवरही सीमा लावण्यात आल्या आहे. त्यामुळे वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांवर उदरनिर्वाहाचे संकट ओढवले आहे. सरकारी सेवेत असूनही एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ड्युटी मिळत नसून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याने बहुतांश एसटी ड्राइवर ट्रांसपोर्टींग कंपन्यांमध्ये ट्रक चालवितांना दिसत आहे. एकूणच लॉकडाऊनमध्ये बेरोजगारीचा आलेख वाढला असून राज्यात बेरोजगारीची छाया गडद होतांना दिसत आहे. तेंव्हा लॉकडाऊन शिथिल करून प्रत्येक व्यसायावरील निर्बंध हटवून व्यवसाय सुरु करण्याची मुभा देण्याबरोबरच एसटी बसेसही पूर्ववत सुरु करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वणी शाखेतर्फे उपविभागीय अधिककाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. <p><p>लॉकडाऊन काळात छोटेमोठे व्यवसाय ठप्प पडल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य वर्गाला आणखीनच भरडण्याचे काम सुरु असून शासनाच्या या धोरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वणी शाखेतर्फे डॉ. आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच आपल्या काही मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये एसटी बस सेवा पूर्ववत सुरु करावी, बारा बलुतेदार व निर्बंध घातलेले सर्वच व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी, वाजनतंत्री व बॅण्डबाजावरील बंदी हटविण्यात यावी, हॉटेल रेस्टॉरंट व चाय पानटपऱ्या सुरु करण्याची परवानगी देऊन कामगारांना त्याठिकाणी काम करण्याची मुभा देण्यात यावी इत्यादी मागण्यांचा समावेश आहे. या मागण्या मान्य करून जनतेच्या रोजगारा विषयक समस्यांचे समाधान करण्याचे शासनाने प्रयत्न करावे अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या वणी शाखे तर्फे मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. <p><p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
बोर्डा गावात सुरीचे घाव घालून युवकाला केले गंभीर जख्मी
बोर्डा गावात सुरीचे घाव घालून युवकाला केले गंभीर जख्मी
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>दारूच्या नशेत विनाकारण वाद घालून एका तीस वर्षीय युवकावर सुरीने हल्ला करून गंभीर जख्मी केल्याची घटना तालुक्यातील बोर्डा गावात सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली असून जख्मी अवस्थेत सदर युवकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पायाचे ऑपरेशन करण्याचा सल्ला देऊन डॉक्टरांनी जख्मी युवकाला चंद्रपूर येथे रेफर करण्यास सांगितले आहे. बंडू माधव टिकट (३०) रा. बोर्डा असे या जख्मी युवकाचे नाव असून गंगाधर गोविंदा राऊत (५०) रा. बोर्डा या इसमाने त्याच्यावर हल्ला केल्याचे समजते. <p><p>मद्याचे व्यसन जडलेल्या गंगाधर याने दारूच्या नशेत बंडू याच्याशी विनाकारण वाद घालून याच्यावर सुरीने हल्ला चढवला. गंगाधर याने पोटावर सुरीचे वार करतांना हातावर वार झेलून स्वतःचा बचाव करतांना बंडू याच्या पायावर सुरीचा घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला. स्वतःला वाचविण्याचा प्रयत्नात त्याच्या पोटावर व छातीवरही सुरीचे हलके घाव झाले आहेत. हल्लेखोर व जख्मी एकाच गावातील रहिवासी असून गंगाधर हा नेहमी बंडू याच्याशी विनाकारण वाद घालत असल्याचे समजते. घराशेजारी असलेल्या पानठेल्याजवळ बसून असलेल्या बंडूवर गंगाधरने अकारण वाद घालून सुरीने घाव घातल्याने तो गंभीर जख्मी झाला आहे. त्याच्या भावाने पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली असून वृत्त लिहेस्तोर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. पोलीस सदर इसमाला अटक करण्याकरिता गेले असता तो फरार असल्याचे समजते. पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
लॉकडाऊन काळातील वीजबिले कमी करण्याबाबत अद्यापही कोणताच निर्णय नाही !
लॉकडाऊन काळातील वीजबिले कमी करण्याबाबत अद्यापही कोणताच निर्णय नाही !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>कोरोना लॉकडाउनच्या काळात चार भीतीत कोंडल्या गेलेल्या जनतेवर विद्युत विभागाची अवकृपा होऊन त्यांच्यावर अवाढव्य लादलेल्या वीजबिलांवर अद्यापही कोणताच तोडगा न निघाल्याने नागरिक चिंतेत आले असून वीजबिल भरण्याकरिता पैशाची जुळवाजुळव करतांना नागरिकांची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. वीज कार्यालयातील अधिकारीवर्गाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर मिळत नसून वीजबिल अगदी योग्य आहे ते तुम्हाला भरावेच लागेल हा एकाच राग ते आलापतांना दिसत आहे. भरमसाठ वीजबिलांचे तीन टप्पे पाडून देण्याची ते भाषा करत असून रोजमजुरीने तुटलेला मजूरवर्ग चांगलाच अडचणीत आला आहे. आवाक्याबाहेरच्या विबिलांचा एक टप्पाही भरण्याकरिता पैशाचे नियोजन नसल्याने कुणी कर्ज घेतांना दिसत आहे तर कुणी घरातील दागिने मोडून वीजबिल भरण्याकरिता पैशाची जुळवणूक करीत आहे. तर पैशाच्या जुळवणुकीचे कोणतेच पर्याय नसलेल्या व्यक्ती,आता काय शरीराचे अवयव विकून वीजबिल भरावे काय, ही आगतिक्ता व्यक्त करीत आहे. लॉकडाऊन काळात रोजगारांपासून वंचित राहिल्याने पदरी बांधलेला पैसाही घरखर्चात वळता झाल्याने आर्थिक विवंचनेत अडकलेल्या सामान्य जनतेला शासनाकडून मदतीची अपेक्षा असतांना अवाढव्य वीजबिलांची खैरात मिळाल्याने सामान्य जनता पुरतीच हादरून गेली आहे. लॉकडाऊन काळातील वीजबिल कपात होईल या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे जनता टक लावून बसली आहे. <p><p>देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर २२ मार्च पासून देशात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले. जीवनावश्यक दुकानांच्या व्यतरिक्त संपूर्ण व्यावसायिक बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. सोशल डिस्टनसिंगच्या कारणास्तव उद्योग, कारखाने व कंपन्याही बंद ठेवण्यात आल्या. पाच लोकांपेक्षा जास्त लोकं एकत्र येणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात आली. त्यामुळे रोजमजुरी व रोजगार पूर्णतः हिरावल्या गेले. छोटेमोठे व्यवसाय बंद पडले. खाजगी नोकऱ्यांवरून लोकांना काढण्यात आले. परंपरागत व्यवसाय बंद पडले. हंगामी व्यवसायाची तर पूर्णतः वाट लागली. लॉकडाऊन वाढत गेल्याने हंगामी व्यवसायाचा हंगामच निघून गेल्याने व्यासायिकांचे चांगलेच आर्थिक नुकसान झाले तर काही व्यावसायिकांवर उदरनिर्वाहाचे संकट कोसळले. लॉकडाउनच्या काळात घरातून बाहेर पडण्यावर पूर्णतः निर्बंध लादले गेंल्याने जनता चार भिंतीत कैद झाली. रोजमजुरी, रोजगार व नोकऱ्या हिरावल्याने कौटुंबिक उदरनिर्वाहाचे प्रश्न पडले असतांनाच अवाढव्य रकमेची वीजबिले माथी मारण्यात आल्याने नागरिक चांगलेच बुचकाळ्यात पडले आहेत. ज्यांनी ऑनलाईन वीजबिले भरली ते ही एकत्रित आलेल्या वीजबिलांची रक्कम पाहून चक्रावले आहेत. जून महिन्यात अंदाजान वीजबिल देण्यात आले ते ही पाच ते सात हजारांच्या वरूनच आले तर जुलै महिन्यात रिडींग नुसार वीजबिले देण्यात आली ती ही १० हजारांच्या वरूनच आली. मार्च ते जून महिन्यापर्यंतची वीजबिले २० हजारांच्या घरात आली. लॉकडाऊन मधील वीजबिले व अन्य करांमध्ये सूट देण्याऐवजी आवाजवी वीजबिले देऊन नागरिकांची लूट करण्यात येत असल्याची भावना शहरवासियांमध्ये निर्माण झाली असून याकडे लोकप्रतिनिधी तसेच राजकीय व सामाजिक पुढाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे. लॉकडाऊन काळातील वीजबिल कपात करून सामान्य नागरिकांवरील आर्थिक बर्डन कमी करण्याची मागणी जनतेमधून होत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
परतीच्या वाटेवर असलेल्या कोरोनाचा तालुक्यात मुक्काम वाढला !
परतीच्या वाटेवर असलेल्या कोरोनाचा तालुक्यात मुक्काम वाढला !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>कोरोना या वैश्विक महामारीने संपूर्ण देश हादरवून सोडला असतांनाच हा आजार जिल्हा पातळीवरून आता गाव खेड्यांपर्यंतही पोहचू लागला आहे. शहरांबरोबरच गाव खेड्यातील जीवनमानही या आजाराने प्रभावित केले आहे. गुण्यागोविंदाने नांदणारी गाव खेड्यातील संस्कृती दहशतीच्या वातावरणात आली आहे. कोरोनाने शहर व तालुक्यात लुकाछुपीचा खेळ सुरु केला असून अदृश्य होत असतांनाच तो अचानक डोके वर काढून बेसावध जनतेला पछाडत आहे. आधी पॉझिटिव्ह हा शब्द व्यक्तीमधील उत्साह वाढविण्याकरिता किंवा नैराशेच्या सावटात वावरणाऱ्या व्यक्तीचे मनोबल वाढविण्याकरिता वापरला जायचा. परंतु आता पॉझिटिव्ह हा शब्द कानावर पडला की थरकाप सुटून अंगावर काटे येतात. पॉझिटिव्ह या शब्दाचा अख्खा अर्थच बदलून गेला आहे. आता बी पॉझिटिव्ह महटले की, कुणी व्यक्ती पॉझिटिव्ह आली काय अशी विचारणा होते. कोरोनाने जीवन जगण्याची व्याख्याच बदलून टाकली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यांवर नैराशेचे वादळ घोंगावतांना दिसत आहे. कधी जाईल हा कोरोना, कधी येईल जीवन पूर्व पदावर या विवंचनेत जीवनमान सुरु असतांना जनतेचा भ्रमनिरासच होतांना दिसत आहे. कारण हा आजार बळावतच चालला असून या आजारावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न कुचकामी ठरत आहे. कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असतांना एकाएक ६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात कोरोनाचा मुक्काम वाढला आहे. कोरोना संक्रमणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या तेलीफैल परिसरातील साखळी खंडित झाल्याचे वाटत असतांनाच या परिसरात दवाखाना असलेला डॉक्टर पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे कोरोनाची नव्याने साखळी तयार झाली. अंत्यसंस्कारात सहभागी झालेल्या महिलेने घोन्सा येथे आमंत्रित केलेला कोरोना वाढून आणखी चार व्यक्तींना या विषाणूची लागण झाली आहे. तर गणेशपूर येथे पॉझिटिव्ह आलेल्या महिलेने नवीन कोरोनाची साखळी तयार केली आहे. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढून ४७ वर पोहचली आहे तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली आहे. १० ऑगष्टला नागपूर येथे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाचा मृत्यू झाला तर २२ जुलैला सेवाग्राम येथे पॉझिटिव्ह निघालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने तालुक्यात दोन कोरोना बळींची नोंद झाली. ३८ रुग्ण कोरोनावर मात करण्यात यशस्वी झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. सात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु असून सहा कोविड केयर सेंटरमध्ये तर एक व्यक्ती यवतमाळ शासकीय रुग्णालयात भरती आहे. तालुक्यात एकूण सात कंटेनमेंट झोन झाले असून २ शहरात तर ५ ग्रामीण भागात आहेत. एकूण ४२ व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात भरती आहेत. ११ ऑगस्टला एकूण २७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले, त्यात ५ पॉझिटिव्ह तर २२ अहवाल निगेटिव्ह आले. त्याचप्रमाणे १० रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्यापैकी ९ निगेटिव्ह तर एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. आतापर्यंत ३०२ अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या आहेत. ८५ नमुन्यांचे अहवाल येणे अजून बाकी आहे. कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असतांना एकच पाऊल पुढे थकणे बाकी होते, परंतु काल एकाएकी ६ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. तर नागरिकांच्या मनातही भीतीने घर केले आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यात सहा पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, रुग्ण संख्या झाली 47
WANICITY.COM
तालुक्यात सहा पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, रुग्ण संख्या झाली 47
शहरातुन कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर असतांना आज तेलीफैल परिसरात दवाखाना असलेल्या डॉक्टरांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.तसेच घोन्सा येथील 4 तर गणेशपूर येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने आज एकाच दिवशी 6 पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने तालुक्यात परत एकदा भितिचे वातावरण निर्मान झाले आहे. कोरोना संक्रमणाचे केंद्रबिन्दू ठरलेल्या तेलीफेल परिसरात 10 दिवसानंतर पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधीतांची संख्या 47 झाली असून ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सात झाली आहे. <p><p>शहर व तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होऊन तालुक्याची कोरोनामुक्तिकडे वाटचाल सुरू असतांना आज तेलीफैल परिसरात दवाखाना असलेला डॉक्टर पॉझिटीव्ह आल्याने या परिसरात नव्याने कोरोनाची साखळी तयार झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच ग्रामीण भागातही एकाच वेळी पाच रूग्ण आढळल्याने तालुक्यात भितीचे वातावरण निर्मान झाले आहे. काल निगेटीव्ह टु पॉझिटीव्ह आलेल्या तरुणाचा नागपुर येथे मृत्यू झाला होता. तर आज तेलीफैल परिसरातील डॉक्टर पॉझिटीव्ह आल्याने शहरातही परत एकदा भितिचे सावट पसरले आहे. तालुक्यात आज एकुण 6 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने कोरोना बाधितांचा आकडा 47 वर पोहचला असून ऐक्टिव पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 7 झाली आहे. नागरिकांनी सावधानी बाळगन्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
प्रियकराच्या मदतीने सावत्र आईने केला मुलाचा खून...Read More
WWW.LOKMAT.COM
प्रियकराच्या मदतीने सावत्र आईने केला मुलाचा खून...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
खून प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून मिळाला जामीन
खून प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून मिळाला जामीन
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहरातील योगेश गहुकर खून प्रकरणातील आरोपी सुशांत पुनवटकर याला नागपूर हायकोर्टाने जमीन मंजूर केला आहे. मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपी सुशांत याला सत्र नायालयाने जामीन नाकारला होता. त्यानंतर सुशांतने ऍड. मीर नगमान अली यांच्यामार्फत नागपूर खंडपीठात जामिन मिळण्याकरिता याचिका दाखल केली. बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी सुशांतचा नियमित जामीन मंजूर केला आहे. <p>शहरातील योगेश गहुकर हा १ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी घरून बाहेर पडला तो सायंकाळ पर्यंत घरी परतला नसल्याने घरची मंडळी चिंतेत आली. सायंकाळी वडिलांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. यादरम्यान २ नोव्हेंबरला मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याच्या मृतदेह आढळून आला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२,२०१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. तपासा दरम्यान योगेशने राजेश रामकृष्ण भोंगळे याच्या कडून काही रक्कम उसनवारीने घेतल्याचे निष्पन्न झाले. योगेश रक्कम परत करण्यास टाळाटाळ करी असल्याने राजेश भोंगळे याने सुशांत पुनवटकर याच्या मदतीने योगेशची मनधरणी करून त्याला मारेगाव हद्दीत नेले व तेथे दुपट्ट्याने गळा आवळून त्याचा खून केला. पोलिसांनी दोघांनाही खुनाच्या आरोपाखाली अटक केली. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सुशांतने ऍड. मीर नगमान अली यांच्या मार्फत नागपूर खंडपीठात जमानत याचिका दाखल केली. बचाव पक्षाच्या वकिलाने या खून प्रकरणाचा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असा युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठाने सुशांत पुनवटकर या आरोपीचा नियमित जामीन मंजूर केला आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
खून प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून मिळाला जामीन
खून प्रकरणातील आरोपीला हायकोर्टातून मिळाला जामीन
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहरातील योगेश गहुकर खून प्रकरणातील आरोपी सुशांत पुनवटकर याला नागपूर हायकोर्टाने जमीन मंजूर केला आहे. मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपी सुशांत याला सत्र नायालयाने जामीन नाकारला होता. त्यानंतर सुशांतने ऍड. मीर नगमान अली यांच्यामार्फत नागपूर खंडपीठात जामिन मिळण्याकरिता याचिका दाखल केली. बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांनी सुशांतचा नियमित जामीन मंजूर केला आहे. <p>शहरातील योगेश गहुकर हा १ नोव्हेंबर २०१९ ला सकाळी घरून बाहेर पडला तो सायंकाळ पर्यंत घरी परतला नसल्याने घरची मंडळी चिंतेत आली. सायंकाळी वडिलांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण तो होऊ शकला नाही. यादरम्यान २ नोव्हेंबरला मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत त्याच्या मृतदेह आढळून आला. वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२,२०१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. तपासा दरम्यान योगेशने राजेश रामकृष्ण भोंगळे याच्या कडून काही रक्कम उसनवारीने घेतल्याचे निष्पन्न झाले. योगेश रक्कम परत करण्यास टाळाटाळ करी असल्याने राजेश भोंगळे याने सुशांत पुनवटकर याच्या मदतीने योगेशची मनधरणी करून त्याला मारेगाव हद्दीत नेले व तेथे दुपट्ट्याने गळा आवळून त्याचा खून केला. पोलिसांनी दोघांनाही खुनाच्या आरोपाखाली अटक केली. सत्र न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सुशांतने ऍड. मीर नगमान अली यांच्या मार्फत नागपूर खंडपीठात जमानत याचिका दाखल केली. बचाव पक्षाच्या वकिलाने या खून प्रकरणाचा प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही असा युक्तिवाद केला. दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला यांच्या खंडपीठाने सुशांत पुनवटकर या आरोपीचा नियमित जामीन मंजूर केला आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुका कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर, एकच उरला ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण !
तालुका कोरोनामुक्त होण्याच्या वाटेवर, एकच उरला ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून मागील आठ दिवसांपासून शहर व तालुक्यात कुणालाही कोरोनाची लागण न झाल्याने कोरोनाची साखळी तोडण्यात प्रशासनाला यश आल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे. तालुक्यातील चिखलगाव हद्दीत येणाऱ्या मंगलम पार्क येथील २० वर्षीय तरुणाचा नागपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून २५ जुलै पासून तो शासकीय रुग्णालयात भरती होता. त्याठिकाणी त्याची कोरोना चाचणी केली असता अहवाल निगेटिव्ह आला. नंतर त्याला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचार सुरु असतांना आणखी त्या तरुणाची ८ ऑगस्टला रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असता तो पॉझिटिव्ह आढळून आला व १० ऑगस्टला त्याचा मृत्यू झाल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. त्याच्या संपर्कातील सर्वच लोकांचे अहवाल मात्र निगेटिव्ह आले आहेत. तालुक्यातील चिखलगांव येथील पॉझिटिव्ह तरुणाच्या मृत्यूने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ झाली असून मृतांची संख्या दोन झाली आहे. तालुक्यातील आज आणखी एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आता एकच उरला आहे. <p><p>कोरोना या साथीच्या रोगाने सर्वत्र थैमान घातले असतांना तालुक्यात मात्र प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे कोरोनाची साथ बरीच आटोक्यात आली आहे. मागील आठ दिवसांपासून शहर व तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने कोरोनाची साखळी तुटली असल्याचे सध्या तरी जाणवत आहे. शहर व तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर रोख लागल्याने शहरविसीयांमध्ये समाधान पाहायला मिळत असून प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास टाकला आहे. चिखलगाव येथील मंगलम पार्क मध्ये राहणारा २० वर्षीय तरुण २५ जुलै पासून शासकीय रुग्णालयात भर्ती होता. त्याठिकाणी त्याची कोरोना टेस्ट केली असता ती निगेटिव्ह आली. त्यानंतर त्याला नागपूर येथीलच खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असतांना ८ ऑगस्टला त्याची रॅपिड अँटीजेन द्वारे कोरोना तपासणी केली असता त्यात तो पॉझिटिव्ह आढळून आला. त्यानंतर १० ऑगस्टला उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील कोरोना बळींची संख्या दोन झाली असून १० जुलैला सेवाग्राम येथे पॉझिटिव्ह निघालेल्या तेलीफैलातील महिलेचा उपचारादरम्यान २२ जुलैला मृत्यू झाला होता. तालुक्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४१ झाली असून ३८ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आता एकच उरला आहे. आज ९२ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून सर्वच निगेटिव्ह आले आहेत. ११२ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. आज ४४ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या त्याचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता पर्यंत एकूण २९२ रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूणच शहर व तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून तालुका कोरोनामुक्त होण्याच्या एक पाऊल दूर आहे. नागरिकांनी सावधानी बाळगून कोरोनाला पसरू न देण्यास सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे. <p><p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणी तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर, आणखी तीन रुग्ण झाले कोरोनातून बरे !
वणी तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर, आणखी तीन रुग्ण झाले कोरोनातून बरे !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यातील कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यात प्रशासन यशस्वी झाल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे. शहरातील तेलीफैलात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने आधीच प्रशासन चिंतेत आले असतांना ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण आढळू लागल्याने प्रशासनावरील तान चांगलाच वाढतांना दिसून आला. अशाही परिस्थितीत प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळवत शहर व तालुक्याला कोरोना मुक्तीच्या वाटेवर आणून सोडले आहे. तालुक्यातील आणखी तीन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता दोन झाली आहे. तालुक्यातील ४० कोरोना बाधित रुग्णांपैकी ३७ रुग्ण कोरोनमुक्त झाले असून एका महिलेचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन वर आली आहे. <p>शहर व तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून तालुक्यातून कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने परिस्थिती हाताळल्याने कोरोनावर नियंत्रण मिळविता आले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाने विविध उपाययोजनात्मक प्रयोग केले. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्याकरिता प्रशासनाने वेगळाच फार्मुला तयार करून कंटेनमेंट झोनवर बारकाईने लक्ष ठेवले. कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित केल्याने रुग्ण वाढीस आळा बसला असून कोरोनाची साथ निवळू लागली आहे. ४० रुग्णांपैकी ३७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. आज आणखी ५८ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच ३२ रॅपिड अँटीजेन चाचणीचे रिपोर्टही निगेटिव्ह आले आहेत. मागील चार दिवसात २४८ अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या आहेत. २२१ नमुन्यांचे अहवाल येणे अजून बाकी आहे. सध्यस्थितीत २८ व्यक्तींना कोविड केयर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. दोन ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये काल यवतमाळ येथे पॉझिटिव्ह आढळलेला एक व्यक्ती तर घोन्सा येथील एका महिलेचा समावेश आहे. दोन रुग्णांपैकी एकावर कोविड केयर सेंटरमध्ये तर एकावर यवतमाळ येथे उपचार सुरु आहे. तालुका कोरोनमुक्त होण्याच्या वाटेवर असून नागरिकांनी कोरोनाला समूळ नष्ट करण्याकरिता सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मुकुटबन येथील सिमेंट कंपनीतील आणखी चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली आठ !
मुकुटबन येथील सिमेंट कंपनीतील आणखी चौघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली आठ !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल या सिमेंट प्लांट मधील परप्रांतीय मजुरांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले असून आज आणखी ४ परप्रांतीय मजुरांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या ८ झाली आहे. तर ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली आहे. <p>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने लोकांच्या एकत्रीकरणातून संसर्ग वाढू नये म्हणून उद्योग व्यवसायासह कंपन्याही बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे रोजगार हिरावला गेल्याने उदरनिर्वाहाचे संकट निर्माण होऊन आर्थिक विवंचनेत अडकलेले परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात आपापल्या राज्यात परतले. परप्रांतीयांचे लोंढेच्या लोंढे मिळेल त्या साधनाने एरव्ही पायदळही आपापल्या राज्यांकडे जाऊ लागले. त्यांची अधीरता पाहून शासनाने त्यांना त्यांच्या स्वराज्यात पाठविण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करून दिली. या सर्व घडामोडीत कित्येकवेळा कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होऊन शासन व प्रशासनाला परप्रांतीयांवर नियंत्रण मिळवितांना कमालीचा त्रास सहन करावा लागला. परंतु आता संचारबंदीचे नियम शिथिल झाल्याने व कंपन्यांना परप्रांतीय मजुरांची आवश्यक्ता भासू लागल्याने परप्रांतीय मजुरांना आमंत्रित केल्या जात असून कंपन्या व उद्योजकांमार्फत त्यांच्या येण्याची व्यवस्थाही केल्या जात आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूरांचे शहर व तालुक्यातील कंपन्यांमध्ये आगमन होऊ लागले असून त्यांची योग्य दक्षता न घेतल्यास ते कोरोनाचे संक्रमण वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात. २६ जुलैला रिलायन्स सिमेंट कंपनीत परप्रांतातून आलेले मजूर क्वारंटाईन असतांना ३० जुलैला त्यांच्यातील ३ मजुरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. तर आज आणखी ४ उत्तर परदेशातील मजुरांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात भीती संचारली आहे. परराज्यातून आलेल्या लोकांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने एकीकडे प्रशासन चिंतेत आले आहे तर दुसरीकडे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. शहरातील युवकांची रोजगारासाठी भटकंती सुरु आहे तर परप्रांतीयांना आमंत्रित करून कोरोनाची उत्पत्ती वाढविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे. आरसीसीपीएल या सिमेंट कंपनीतील आज आणखी ४ मजूर पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८ झाली असून ३ जुलैला एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली आहे. आरोग्य अधिकारी आपल्या पथकासह त्याठिकाणी दाखल झाले असून रुग्णांना पुढील उपचारा करिता यवतमाळ येथे पाठविण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना त्याच ठिकाणी क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नागरिकांनी सावधानी बाळगण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
दुकान कामगार, भाजीविक्रेते यांचीही कोरोना चाचणी करा; केंद्राचे राज्यांना आदेश
WWW.LOKMAT.COM
दुकान कामगार, भाजीविक्रेते यांचीही कोरोना चाचणी करा; केंद्राचे राज्यांना आदेश
<p>नवी दिल्ली : किराणा मालाच्या दुकानातील कर्मचारी, भाजी, फळविक्रेते यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर एक टक्क्यापर्यंत खाली आणण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे.<br><br>या लोकांपैकी जे कोरोनाग्रस्त असतील त्यांच्यामुळे या संसगार्चा फैलाव आणखी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी प्राधान्याने करण्यात यावी, असे सरकारने म्हटले आहे...<br>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील दोन रुग्ण कोरोनातुन बरे झाले तर काल एका व्यक्तीला झाली कोरोनाची लागण !
शहरातील दोन रुग्ण कोरोनातुन बरे झाले तर काल एका व्यक्तीला झाली कोरोनाची लागण !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची गती मंदावली असून रुग्णसंख्या वाढीला खीळ बसली आहे. तालुक्यातील कोरोनाची लाट ओसरू लागली असून आणखी दोन रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. काल मोनिनपुऱ्यातील जिल्हा कारागृहात क्वारंटाईन असलेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४० झाली असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ५ झाली आहे. ४० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्हा तुरुंगात तपासणी दरम्यान पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली असून परिवारातील सर्वच सदस्य निगेटिव्ह निघाले आहेत. पॉझिटिव्ह व्यक्ती २१ जुलै पासून यवतमाळ तुरुंगात असल्याने तसेच त्याचा परिवाराशी व परिसराशी मागील १७ दिवसांपासून कोणताही संबंध न आल्याने परिसराला कंटेन्टमेंट झोन घोषित करण्यात आले नसल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी दिली आहे. <p>स्थानिक मोमीनपुऱ्यातील पॉझिटिव्ह आढळलेला व्यक्ती २६ जूनला दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणातील आरोपी असून जामीन न मिळाल्याने त्याला व अन्य २९ जणांना तुरुंगवासात पाठविण्यात आले होते. सदर व्यक्ती गंभीर जख्मी असल्याने त्याला आधी चंद्रपूर येथे उपचार्थ दाखल करण्यात आले होते. नंतर २१ जुलैला त्याला यवतमाळ जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. तुरुंगवासात क्वारंटाईन असतांना तपासणी दरम्यान त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. तो मागील १७ दिवसांपासून यवतमाळ जिल्हा कारागृहात असल्याने प्रशासनाने मोमीनपुरा परिसरातील तो राहात असलेला भाग सील न करता त्याच्या कुटुंबातील व्यक्तींची रॅपिड अँटीजेन चाचणी केली. त्यात परिवारातील सर्वच सदस्य निगेटिव्ह आढळून आले. शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून तेलीफैलात हौदोस घातलेल्या कोरोना संक्रमणालाही लगाम लागल्याचे पाहायला मिळत आहे. मागील तीन दिवसात २१६ रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या असून सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मागील तीन दिवसांत ९४ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले असून २७९ नमुन्यांचे अहवाल अप्राप्त आहेत. सध्या स्थितीत ४३ व्यक्ती संस्थात्मक विलीगीकरणात भर्ती आहेत. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४० झाली असून त्यापैकी ३४ रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत तर एका महिलेचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ झाली आहे. तीन रुग्ण कोविड केयर सेंटरला तर दोन रुग्ण यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल आहेत. चार कंटेनमेंट झोन ऍक्टिव्ह असून एक शहरात तर तीन ग्रामीण भागात आहे. एकूणच शहर व तालुक्यातील कोरोनाची दहशत कमी झाली असून परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचे जाणवत आहे. शहर कोरोनमुक्त होण्याच्या वाटेवर असून आजच्या रुग्णाला पकडून दोन रुग्ण कोरोनमुक्त होणे बाकी राहिले आहे. प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्या करिता शर्थीचे प्रयत्न चालविले असून नागरिकांनीही योग्य सहकार्य करण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वर्धा जिल्ह्यात अपहरण करुन ७ वर्षीय चिमुरडीवर सामुहिक अत्याचार ...Read More
WWW.LOKMAT.COM
वर्धा जिल्ह्यात अपहरण करुन ७ वर्षीय चिमुरडीवर सामुहिक अत्याचार ...Read More
lokmat.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
झाडाची फांदी तोडून बाजूला करतांना क्रेनच घरावर उलटली
झाडाची फांदी तोडून बाजूला करतांना क्रेनच घरावर उलटली
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p><p>घराच्या बाजूला असलेल्या झाडाची फांदी तोडून बाजूला करत असतांना क्रेनचा तोल जाऊन झाडाच्या फांदीसह क्रेनही घरावर उलटल्याने घराचे मोठे नुकसान झाल्याची घटना दीपक चौपाटी परिसरात नुकतीच घडली आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून मोठी वित्त हानी झाली आहे. <p><p><p>दिपक चौपाटी परिसरातील प्रवीण रामावत यांच्या घराच्या बाजूला असलेले वडाचे झाड विस्तीर्ण होऊन झाडीची अवाढव्य फांदी घरासमोर आल्याने ती तोडून क्रेनच्या साहाय्याने बाजूला करीत असतांना क्रेनचे संतुलन गेल्याने क्रेन फांदीसह घरावर उलटली. फंदीचे वजन क्रेनच्या वजन क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने संतुलन जाऊन क्रेन फांदीला बाजूने करतांनाच फांदीसह घरावर पलटी झाली. यात घराची रूम क्षतिग्रस्त झाल्याने रामावत यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून क्रेनचेही चांगलेच नुकसान झाले आहे. यात घरातील कोणतीही व्यक्ती अथवा ड्रॉयव्हरला शारीरिक इजा झाली नसल्याचे समजते. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1632
1633
1634
1635
1636
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे