Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
युवतीची आत्महत्त्या : सोळा वर्षाच्या युवतीवर दोघांनी केला बलात्कार :♦ मृतक युवतीच्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी आरोपींना घेतले ताब्यात ...Read More
WWW.KHABARKATTA.COM
युवतीची आत्महत्त्या : सोळा वर्षाच्या युवतीवर दोघांनी केला बलात्कार :♦ मृतक युवतीच्या सुसाईड नोटवरून पोलिसांन...
khabarkatta.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
बल्लारपुरात गोळीबार : सुरज बहुरिया वर भर चौकात गोळीबार #gun firing at ballarpur
WWW.KHABARKATTA.COM
बल्लारपुरात गोळीबार : सुरज बहुरिया वर भर चौकात गोळीबार #gun firing at ballarpur
khabarkatta.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कॉम्पुटर ऑपरेटर पाहिजेत...(ऑनलाईन बँकिंग मणी ट्रान्स्फर चे knowledge अनिवार्य)
कॉम्पुटर ऑपरेटर पाहिजेत...(ऑनलाईन बँकिंग मणी ट्रान्स्फर चे knowledge अनिवार्य)
संपर्क - 9730292827
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मायबापहो आपल्या वयात येणाऱ्या मुलामुलींकडे लक्ष द्या !
मायबापहो आपल्या वयात येणाऱ्या मुलामुलींकडे लक्ष द्या !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>वयात येणाऱ्या पाल्यांकडे पालकांचे होणारे दुर्लक्ष त्यांच्या आयुष्याची दुर्गती करण्याचे कारण बनत असून पालक व पाल्यांमधील समन्वयाच्या अभावामुळे वयात येणारी मुले चुकीच्या मार्गाकडे भरकटतांना दिसत आहे. बालपणातील संगोपनाची जबाबदारी कशीबशी पार पडल्यानंतर मुले समजदार व्हायला लागली की जबाबदारी मुक्त झाल्यागत त्यांच्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केल्या जात असल्याने मुले चुकीच्या वळणावर जातांना दिसत आहे. मुले वयात येऊ लागली की त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते, परंतु रोजगार व नोकरीच्या निमित्ताने व्यस्थता दर्शवित कुटुंब प्रमुखांचा कुटुंबाशी संवाद साधल्या जात नसल्याने कुटुंबाची दुरावस्था होत असल्याचे अनेक उदाहरणे डोळ्यासमोर येत आहेत. रोजगार, नोकरी व व्यवसायात गुरफटल्या जाऊन कुटुंबासाठी जराही वेळ दिल्या जात नसल्याने मुले ध्येय चुकत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुले मोठी होऊ लागली की त्यांच्या प्रति आपली जिम्मेदारी संपली, ही पालकांची मानसिकता बनली असल्याने मुले आयुष्याचे मार्ग चुकतांना दिसत असून विशेषतः मुली मार्ग चुकून अंधकारमय वाटेकडे जातांना दिसत आहे. वयात येणाऱ्या मुलींकडे विशेष लक्ष देण्याऐवजी पालकांकडून त्यांच्यांशी साधा संवादही साधला जात नसल्याने त्यांच्यात नैराष्याची भावना निर्माण होऊन त्या कुणाच्याही भुलथापांना बळी पडतांना दिसत आहे. बालपण बोचरं असलं तरी वयात आल्यानंतर त्यांना मायेची उब देणे आवश्यक असते. मुली समजदार झाल्यानंतर त्यांची आस्थेने विचारपूस करून त्यांना योग्य संस्कार देणे आवश्यक असतांनाच त्यांच्यात आपुलकी निर्माण करून प्रेमळ मार्गदर्शन करण्याचीही तेवढीच आवश्यकता असते. त्यांना कुटुंबाकडून प्रेम मिळत नसल्याने त्या कुणाच्याही स्वार्थी प्रेमाचा शिकार बनत असल्याचे चित्र आज सर्वत्र पाहायला मिळत आहे. तेंव्हा मायबापहो आपल्या वयात येणाऱ्या मुला मुलींकडे लक्ष द्या! शाळा, कॉलेज, गल्ली मोहल्ल्यात अपप्रवृत्तीची गिधाड शिकारीच्या शोधात फिरत असतात, मायेनी तुटलेल्या व अत्यावश्यक गरजा पूर्ण होत नसलेल्या मुलींचा शोध घेऊन त्यांच्याशी जवळीक साधून, खोट्या प्रेमाची भुरळ घालून, आमिषे प्रलोभने देऊन त्यांना पूर्णतः ही गिधाडं आपल्या जाळ्यात ओढतात, मग या मुली कुटुंबाशीही फारकत घेण्याची तयारी दर्शवून कुटुंबा विरुद्धच बंड करायला तयार होतात. तेंव्हा पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलींना विश्वासात घेऊन आपल्या व्यस्त कामातून वेळ काढून त्यांच्याशी संवाद साधने नितांत गरजेचे आहे. <p><p>पालकांचे कुटुंबाकडे होत असलेले दुर्लक्ष व मुलांचे न होणारे योग्य संगोपन यातून मुलांची होणारी उपेक्षा मुलांचे मार्ग चुकण्यास कारणीभूत ठरत आहे. कौटम्बिक कलह, व्यसनाधीनता, व्यभिचारी प्रवृत्ती, गरजांची न होणारी पूर्तता, चिडचिडी प्रवृत्ती, शुल्लक कारणांवरून होणारे वाद, न साधणारा सुसंवाद, समन्वयाचा अभाव या सर्व बाबी मुलांच्या अधोगतीचे कारण बनत असतात. या सर्व बाबी बालपणापासूनच त्यांच्या मनावर रुजल्या जातात. मग त्यांच्यावर योग्य संस्कार होत नसल्याने व कुटुंबाचे प्रेम मिळत नसल्याने तरुण पिढी असंगताशी संगत करून आयुष्याचा खराबा करतांना दिसत आहे. शाळा कॉलेजांमध्ये जाणाऱ्या हुशार देखण्या मुली क्षणिक प्रेमाला बळी पडून अपप्रवृतीच्या टवाळखोर तरुणांच्या नांदी लागून आयुष्याची राखरांगोळी करून घेतांना दिसत आहे. कुटुंबाकडून पूर्ण न होणाऱ्या अवास्तविक गरजा व इतरांसारखे राहणीमान अंगिकारण्याची ओढ याही गोष्टी मुलींना चुकीच्या मार्गाकडे नेण्यास कारणीभूत ठरत आहे. टवाळखोर व टार्गट मुलांकडून सारखा पिच्छा पुरविण्यात येऊन तसेच आपले स्वार्थी प्रेम त्यांना पटवून देण्यास जीवाचा आटापिटा करण्यात येऊन त्यांना महागड्या भेट वस्तूंची भुरळ घालण्यात येत असल्याने त्या अलगद त्यांच्या जाळ्यात अडकल्या जातात. तर काही मुली त्यांचा विरोध करून थकल्यानंतर व घरातील परिस्थिती त्यांची तक्रार करण्यायोग्य नसल्यानं नाईलाजास्तव या टवाळखोरांच्या तकलादू प्रेमांना बळी पडतांना दिसत आहे. काही अपप्रवृतीच्या तरुणांनी तर मुलींना जाळ्यात ओढून त्यांची दलालांमार्फत विक्री करण्याचा धंदाच सुरु केला आहे. आपल्या खोट्या प्रेमाची मोहिनी टाकल्यानंतर मुली मुठीत आल्या की, काही मुलींचा गैरफायदा घेण्यात येतो तर काही मुलींची सर्रास विक्री केली जाते. शिक्षणात रममाण असणाऱ्या मुली मार्ग भटकून या टार्गट मुलांच्या भूलथापांना बळी पडून कुटुंबाशी बंड करून पळून जाऊन अकाली संसारिक जीवन ओढवून घेतात. त्यानंतर डोळ्यावरची प्रेमाची झालर ओसरली की संसाराचे चटके झोम्बू लागतात व प्रियकर पती म्हणून किती योग्य आहे, याची प्रचिती आयुष्य उध्वस्त झाल्यावर मुलींना येते. मोबाईल इंटरनेट वरून पसरविले जाणारे प्रेमाचे संदेश व टीव्ही मालिकांमधून दाखविले जाणारे स्त्री पुरुषांच्या प्रेमसंबंधाचे भडक दृश्य पाहून नटिंसारखं आयुष्य जगण्याच्या नादात नंतर मुलींची चांगलीच फरफट होतांना दिसते. जीवनात चुकीचे पाऊल उचलल्यानंतर काही मुलींना घर नशीब होते तर काही मुलींना प्रियकररुपी पतीचे अत्याचार सहन करून नशिबाला कोसत जीवन कंठावे लागते. त्यानंतर काही मुली जीवनातूनच मुक्त होण्या इतपत निर्णय घेतात तर काहींना हे प्रियकररूपी राक्षस जीवनातून संपविण्याचा प्रयत्न करतात. कित्येक मुलींना प्रेमसंबंधातून आपले जीव गमवावे लागले. शहर व तालुक्यातही शाळा, कॉलेज, गली मोहल्ल्यातील मुली या टार्गट मुलांच्या अत्याचाराला बळी पडल्या आहेत. फूस लावून पळवून नेल्यानंतर काही मुलींचा शोध लागतो तर काही मुली पळऊन नेण्याच्या बेतात असतांना पोलिसांच्या सतर्कतेमुळे बचावल्या जातात. पोलीस नेहमी मुलामुलींच्या प्रेमसंबंधाविषयी अथवा त्यांच्या पळून जाण्याच्या बेताविषयी माहिती ठेऊ शकत नाही, तेंव्हा मायबापहो आपल्या वयात येणाऱ्या मुलामुलींना योग्यरीत्या जोपासा, त्यांची काळजी घ्या, त्यांना आपुलकी प्रेम द्या, त्यांच्याशी सुसंवाद साधा, त्यांची विश्वासात घेऊन आस्थेने विचारपूस करा. तुमच्या योग्य मार्गदर्शनानेच आजची वयात येणारी मुलं उद्याचे जिम्मेदार नागरिक बनतील.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहराची कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल, ३९ पैकी ३२ रुग्ण बरे तर ४४ अहवाल निगेटिव्ह !
शहराची कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल, ३९ पैकी ३२ रुग्ण बरे तर ४४ अहवाल निगेटिव्ह !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>वणी शहर व तालुक्यातील कोरोना संक्रमणाची लाट ओसरू लागली असून रुग्ण वाढीवर तूर्तास ब्रेक लागला असल्याने शहरवासियांमध्ये समाधान पाहायला मिळत असून प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास टाकल्याचे दिसून येत आहे. शहरातील तेलीफैल परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनाची डोकेदुखीही वाढली असतांनाच प्रशासनाने फार्मुला बी तयार करून या परिसरावर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केल्याने सध्यातरी परिस्थिती नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातीलही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या गावांमध्ये योग्य उपाययोजना केल्यामुळे रुग्णवाढीवर नियंत्रण मिळविता आले. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक असून आणखी ७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६ वर आली आहे. <p><p>शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांनाच ग्रामीण भागातही कोरोनाच जाळं तयार होऊ लागल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढू लागली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही नियोजनात्मक उपाययोजना करतांना प्रशासनाची चांगलीच धावपळ होत होती. अशाही परिस्थिती गोंधळून न जाता प्रशासनाने फार्मुला बी तयार करून कोरोना प्रतिबंधित क्षेत्रावर बारीक नजर ठेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेर पोलिसांचा पहारा कडक करून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेऊन योग्य त्या उपाययोजना केल्याने शहर व तालुक्यातील परिस्थिती नियंत्रणात राहिली आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३९ असून त्यातील ३२ रुग्ण कोरोनातून ठणठणीत बरे झाले तर एका महिलेचा मृत्यू झाल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६ वर आली आहे. आज ४४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून पूर्ण निगेटिव्ह आले आहेत. अजून ३०३ नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. तालुक्यात ४ कंटेन्टमेंट झोन ऍक्टिव्ह आहेत. त्यापैकी शहरात एक तर ग्रामीण भागात ३ कंटेन्टमेंट झोन आहेत. सहा ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी तीन कोविड केयर सेंटरमध्ये तर तीन यवतमाळ येथे उपचार घेत आहेत. शहर व तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून शहरात शेवटचा रुग्ण १ ऑस्टला तेलिफैलात आढळला होता. तर ग्रामीण भागात २ ऑगस्टला घोन्सा येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला होता. त्यानंतर कोरोना बाधितांचा आकडा ३९ वर स्थिरावला आहे. प्रशासनाच्या एकूणच नियोजनबद्ध पद्धतीमुळे कोरोनाची संख्या सुरुवातीपासूनच नियंत्रणात राहिली आहे. कोरोनाचा उद्रेक अद्याप तरी शहरात झालेला नसून याचे श्रेय शहर प्रशासन, आरोग्य प्रशासन व नगरपरिषद प्रशासन यांच्या समयसूचक कार्यप्रणालीला जाते. या तीनही प्रशासनांनी शहर व तालुक्यातील कोरोनाची योग्य परिस्थिती हाताळून वेगवेगळे उपाययोजनात्मक प्रयोग केल्याने कोरोना संक्रमणाला उग्ररूप धारण करता आले नाही. त्याचे एकूणच समाधान शहरवासीयांच्या चेहऱ्यांवर झळकत आहे. आता कोरोनमुक्त शहर होण्याची वाट जनता बघत असून त्यांची स्वप्नपूर्ती होण्याकरिता तीन पाऊल पुढे सरकने बाकी राहिले आहे. प्रशासनाने वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन केल्याने शहर कोरोनामुक्त होण्याकडे वाटचाल करीत असून नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आव्हान उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मुरधोनी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
मुरधोनी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>तालुक्यातील मुरधोनी येथील एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ५ ऑगस्टला सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली आहे. संजय भाऊराव पारखी (४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याने राहत्या घरातील आड्याला गळफास लावून आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर पार्थिव शरीर कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. मृतकाचा मावसभाऊ पंढरीनाथ वामन आवारी (४७) याने पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
देशी दारू दुकानातील चोरी प्रकरणी नऊ आरोपींना अटक, पोलिसांनी अतिशीघ्र लावला छडा !
देशी दारू दुकानातील चोरी प्रकरणी नऊ आरोपींना अटक, पोलिसांनी अतिशीघ्र लावला छडा !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरातील तेलीफैल परिसरातील रुग्णालया जवळ असलेल्या सतीश भय्यालाल दानव यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानातून १६ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान देशी दारूच्या ४० पेट्या (१९२० नग) चोरीला गेल्याची तक्रार २ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली. तक्रार दाखल होताच डी बी पथकाने तपासचक्रे फिरवून अतिशीघ्र या चोरी प्रकरणाचा छडा लावून ९ आरोपींना अटक करून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. तसेच त्यांच्याकडून ६ लाख ५० हजार ५६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दुकानात काम करणारा अतिविश्वासू कर्मचारीच या चोरीचा मास्टर माईंड निघाल्याने व्यावसायिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. <p><p>स्थानिक तेलीफैल परिसरातील ग्रामीण रुग्णालयाजवळ असलेल्या एस.बी. दानव देशी दारू दुकानातून १६ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान देशी दारूच्या ४० पेट्या (१९२० नाग) चोरीला गेल्याची तक्रार पांढरी डोमाजी मेश्राम (५६) रा. रंगनाथ नगर यांनी पोलीस स्टेशनला नोंदविली. तक्रार दाखल होताच डी बी पथकाने तपासाची सूत्रे हाती घेऊन अतिशीघ्र या चोरी प्रकरणाचा छडा लावून नऊ आरोपींना जेरबंद केले आहे. शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर लगाम लावत गुन्हेगारांना पोलिसी हिसका दाखवण्याबरोबरच शहरातील वातावरण शांततामय ठेवण्याचा पोलिसांनी नेहमी प्रयत्न केला आहे. लॉकडाऊन काळात कोरोना योध्यांची भूमिका बजावतांना कोरोनाची परिस्थिती हाताळण्याबरोबरच शहरातील गुन्हेगारीही नियंत्रणात ठेवण्याचा पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. चोरी प्रकरण असो की अवैधधंदे असो की मग गली मोहल्ल्यात भरणारा जुगार असो या सर्व अप प्रवृत्तींना फोफावू न देता पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवरत गुन्हेगारांना पोलीस स्टेशनची हवा चाखविली आहे. या चोरी प्रकरणाचाही नेहमीच्याच अंदाजात अतिशीघ्र छडा लावून आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये गणेश भूमण्णा संगतीवार (३४) रा. दामलेंफैल वणी, उमेश उत्तम मडावी (२९) रा. रंगारीपुरा, भारत उर्फ पिंटू दुर्गन्ना रामगिरवार (३४) गायकवाड फैल, राजू मारोती अलीवार (२१) रा. गायकवाड फैल, अमर रामलाल कनकुंटलवार (३०) रा. दामलेफैल, हरीश उर्फ टिक्का संजय रायपुरे (१९) रा. दामलेफैल, रामेश्वर मनोहर साळुंखे (३२) रा. गोकुल नगर, पवन गणेश मेश्राम (२५) रा. रंगनाथ नगर, राकेश ज्योतीराम किन्नाके (२०) रा. खरबडा मोहल्ला, यांचा समावेश असून त्यांच्याकडून देशी दारूच्या २५ पेट्या (१८० मिलीचे १२०० नग शिश्या) अंदाजे किंमत ६० हजार ४६४ रुपये, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, टाटा सुमो क्रमांक MH २३ E ८८१६, लोखंडी रॉड असा एकूण ६ लाख ५० हजार ५६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांच्यावर भादंविच्या कलम ४५७,३८० ३८१, ४११,१८८,२६९, व सहकलम ३,४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच भारत उर्फ पिंटू दुर्गन्ना रामगिरवार, रामेश्वर मनोहर साळुंके, राजू मारोती अलीवार, अमर रामलाल कनकुंटलवार, हरीश उर्फ टिक्का संजय रायपुरे यांना यांना तुरंगात पाठवण्याचा आदेश झाला असून बाकी आरोपींना पोलीस कोठडी मिळाली आहे. <p><p>सदर कारवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे पंकज उंबरकर यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अनलॉक की प्रक्रिया के तहत आज से जिम और योग संस्थान खुल रहे हैंं
अनलॉक की प्रक्रिया के तहत आज से जिम और योग संस्थान खुल रहे हैंं
देश में अनलॉक की प्रक्रिया के तहत आज से जिम और योग संस्थान खुल रहे हैंं। हालाकि कुछ नियमों का सख्ती से पालन करना होगा। <p> <p>इसके लिए केंद्रीय स्वास्थ्य मंत्रालय ने दिशा-निर्देश जारी किए हैं। हालांकि, स्पा, स्टीम बॉथ और स्वीमिंग पूल पहले की तरह ही बंद रहेंगे। इन निर्देशों के मुताबिक जो योग संस्थान और जिम खोले जा रहे हैं वहां सामाजिक दूरी का विशेष ख्याल रखा जाना है। मशीनों और अन्य चीजों को पर्याप्त दूरी पर रखा जना है। <p> <p>परिसर में आने और जाने के अलग-अलग रास्तों का इस्तेमाल और क्यू मैनेजमेंट सिस्टम का इस्तेमाल के साथ कम से कम 6 फुट की दूरी का ध्यान रखना जरुरी है। भुगतान के लिए बिना संपर्क वाली प्रणाली, सभी एसी के तापमान 24-30 डिग्री के बीच, ताजी हवा आने के लिए व्यवस्था और फिटनेस रूम और क्लास के सेशन के दौरान 15-30 मिनट का अंतराल होना चाहिए जरुरी है। <p> <p>हालाकि कंटेंमेंट जोन में आने वाले योग संस्थान और जिम बंद रहेंगे। वहीं मुंबई में भी अनलॉक की प्रक्रिया जारी है। बीएमसी ने 'मिशन स्टार्ट अगेन' के तहत चरणबद्ध अनलॉकिंग शुरू करने के लिए मॉल, बाज़ार और दुकानों को सुबह 9 बजे से शाम 7 बजे तक खोलने की अनुमति दे दी है। हालांकि थिएटर और रेस्तरां बंद रहेंगे।
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
गाडी विकणे आहे मॉडेल 2011
गाडी विकणे आहे मॉडेल 2011
संपर्क - 9767672102
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
-
-
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची लगबग
गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची लगबग
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>अमरावती बोर्डाचे १२ विच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून महाविद्यालयांमधून गुणपत्रिकेचे वाटप करणे सुरु झाले असल्याने आज ४ ऑगस्टला शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयाबाहेर एकच लगबग पाहायला मिळत होती. कोरोना लॉकडाऊनमुळे परीक्षांचे निकाल फारच उशिरा लागल्याने पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता विध्यार्थ्यानी गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती. एकतर परीक्षांचे निकाल वेळाने लागले दुसरीकडे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेल्याने विद्यर्थी चिंतेत पडले आहे. पुढील अभ्यासक्रमाचे सत्र केंव्हा सुरु होईल याची निश्चिती नसली तरी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने ऑनलाईन फॉर्म भरतांना विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट पर्यंत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या घेण्यात आलेल्या परीक्षांच्या गुणपत्रिकांचे वाटप लो.टी. महाविद्यालयामधून करण्यात येणार आहे. <p><p>कोरोनामुळे शिक्षणाचा पार खोळंबा झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे काही विषयांचे पेपर बाद झाले तर कित्येक पदवी परीक्षाच बाद करण्यात आल्या. पदवी परीक्षांचा वाद रंगत असून युजीसी परीक्षा घेण्यावर ठाम आहे तर शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जोखीम पत्करायला तयार नसल्याने हा वाद आता न्यायालयापर्यंत गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. लॉकडाऊन लागू होण्याआधी १२ विच्या परीक्षा संपल्या होत्या तर १० विचा भूगोलाचा पेपर राहिला होता. अखेर भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येऊन सरासरी मार्क देण्याचे ठरले. या सर्व घडामोडीत विद्यर्थ्यांचं लक्ष लागलं होतं ते निकालाकडे, परंतु निकालाच्या तारखा बदलत गेल्याने विद्यर्थी हैराण झाले असतांनाच अखेर निकालाचा शुभ मुहूर्त सापडला व विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता १२ विच्या परीक्षांचे गुणपत्रिका वितरण सुरु झाले आहे. शहरात ४ ते ६ ऑगस्ट पर्यंत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या घेण्यात आलेल्या परीक्षांचे गुणपत्रिका वितरण सुरु राहणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे चांगलेच शैक्षणिक नुकसान झाले असून यशाचे शिखर गाठून उज्वल भविष्याची पायाबांधणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर निराशेचे सावट पाहायला मिळत आहे. नवे शैक्षणिक पर्व केंव्हा सुरु होईल याची शाश्वती नसली तरी विविध अभ्यासक्रमांकरिता ऑनलाईन प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यानंतर ऑनलाईन वर्गही सुरु होईल. पण ज्या पालकांनी पोटाला चिमटे घेऊन पोट तिडकीने शिकविले अशा विद्यर्थ्यांना काही कारणास्तव ऑनलाईन शिक्षण मिळू न शकल्यास त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. शेवटी सर्वच क्षेत्रावर कोरोनाने प्रभाव टाकला असून देशातील एकूणच परिस्थिती बिकट झालेली पाहायला मिळत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची लगबग
गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची लगबग
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>अमरावती बोर्डाचे १२ विच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून महाविद्यालयांमधून गुणपत्रिकेचे वाटप करणे सुरु झाले असल्याने आज ४ ऑगस्टला शहरातील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयाबाहेर एकच लगबग पाहायला मिळत होती. कोरोना लॉकडाऊनमुळे परीक्षांचे निकाल फारच उशिरा लागल्याने पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिता विध्यार्थ्यानी गुणपत्रिका मिळविण्याकरिता महाविद्यालयाबाहेर एकच गर्दी केली होती. एकतर परीक्षांचे निकाल वेळाने लागले दुसरीकडे प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेल्याने विद्यर्थी चिंतेत पडले आहे. पुढील अभ्यासक्रमाचे सत्र केंव्हा सुरु होईल याची निश्चिती नसली तरी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाल्याने ऑनलाईन फॉर्म भरतांना विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. ४ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट पर्यंत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या घेण्यात आलेल्या परीक्षांच्या गुणपत्रिकांचे वाटप लो.टी. महाविद्यालयामधून करण्यात येणार आहे. <p>कोरोनामुळे शिक्षणाचा पार खोळंबा झाला असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे काही विषयांचे पेपर बाद झाले तर कित्येक पदवी परीक्षाच बाद करण्यात आल्या. पदवी परीक्षांचा वाद रंगत असून युजीसी परीक्षा घेण्यावर ठाम आहे तर शासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत जोखीम पत्करायला तयार नसल्याने हा वाद आता न्यायालयापर्यंत गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. लॉकडाऊन लागू होण्याआधी १२ विच्या परीक्षा संपल्या होत्या तर १० विचा भूगोलाचा पेपर राहिला होता. अखेर भूगोलाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येऊन सरासरी मार्क देण्याचे ठरले. या सर्व घडामोडीत विद्यर्थ्यांचं लक्ष लागलं होतं ते निकालाकडे, परंतु निकालाच्या तारखा बदलत गेल्याने विद्यर्थी हैराण झाले असतांनाच अखेर निकालाचा शुभ मुहूर्त सापडला व विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. आता १२ विच्या परीक्षांचे गुणपत्रिका वितरण सुरु झाले आहे. शहरात ४ ते ६ ऑगस्ट पर्यंत विज्ञान, कला व वाणिज्य शाखेच्या घेण्यात आलेल्या परीक्षांचे गुणपत्रिका वितरण सुरु राहणार आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे चांगलेच शैक्षणिक नुकसान झाले असून यशाचे शिखर गाठून उज्वल भविष्याची पायाबांधणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर निराशेचे सावट पाहायला मिळत आहे. नवे शैक्षणिक पर्व केंव्हा सुरु होईल याची शाश्वती नसली तरी विविध अभ्यासक्रमांकरिता ऑनलाईन प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यानंतर ऑनलाईन वर्गही सुरु होईल. पण ज्या पालकांनी पोटाला चिमटे घेऊन पोट तिडकीने शिकविले अशा विद्यर्थ्यांना काही कारणास्तव ऑनलाईन शिक्षण मिळू न शकल्यास त्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. शेवटी सर्वच क्षेत्रावर कोरोनाने प्रभाव टाकला असून देशातील एकूणच परिस्थिती बिकट झालेली पाहायला मिळत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
विद्युत कार्यालयात वीजबिल भरण्याकरिता एकच खिडकी असल्याने लागते लांबलचक रांग
विद्युत कार्यालयात वीजबिल भरण्याकरिता एकच खिडकी असल्याने लागते लांबलचक रांग
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>कोरोनाच्या या संकट काळात चार महिण्यांची अवाढव्य रक्कमेची वीजबिले घरोघरी धडकल्याने सामान्य जनता आर्थिक विवंचनेत अडकली गेली असली तरी ५० टक्के जनतेने एकदाचे वीजबिल भरून मोकळे होण्याची तयारी दरविल्याने विद्युत कार्यकलायातील विजबिल भरना कक्षा बाहेर बिल भरणाऱ्यांची दररोज लांबलचक रांग लागतांना दिसत आहे. विद्युत विभागाने नागरिकांना वीजबिल भरतांना सुलभता व्हावी याकरिता शहरात ठिकठिकाणी कंत्राटी तत्वावर वीजबिल केंद्र सुरु करून दिली. तसेच पोस्ट व काही बॅंकांमध्येही वीजबिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु कोरोना लॉकडाऊन पासून सर्व ई वीजबिल केंद्रे बंद झाली असून वर्दळ निर्माण होईल म्हणून पोस्ट व बँकांनीही वीजबिल स्वीकारणे बंद केले. लॉकडाऊन शिथिल होताच पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवरील ई वीजबिल केंद्र सुरु झाले खरे पण व्यासायिकाच पॉझिटिव्ह निघाल्याने तेही महिन्याभरापासून बंद आहे. त्यामुळे वीजबिल भरण्याकरिता विद्युत कार्यालय हाच एकमेव पर्याय नागरिकांसमोर उरल्याने येथे वीजबिज भरणाऱ्यांची चांगलीच गर्दी उसळतांना दिसते. शहरवासीयांना वीजबिल भरण्याकरिता विद्युत विभागाने एकच खिडकी उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी वीजबिल भरण्याकरिता उसळणारी गर्दी बघता आणखी एक खिडकी उपलब्ध करून देण्याची नितांत आवश्यकता असतांना विद्युत विभाग याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. आता तर वीजबिल भरणा कक्षाला लिंक फेलचाही आजार जडला आहे. आज १२.३० वाजताच्या दरम्यान लिंक फेल झाल्याने वीजबिल भरणाऱ्यांचे चांगलेच हाल झाले. कित्येक तास ताटकळत रांगेत उभे राहिल्यानंतरही लिंक न आल्याने वीज ग्राहकांना निराश होऊन घरी परतावे लागल्याने नागरिक चांगलेच चिडले होते. <p><p>कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने व्यवसाय,उद्योग, कंपन्या व कारखाने फिजिकल डिस्टंसिंगच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांच्या नोकऱ्या व रोजगार हिरावला गेले. बेरोजगारीच्या खाईत जनता लोटली गेली. रोज मजूरिची कामेही बंद पडली. गाव शहरात बेरोजगारीची छाया गडद झाली. संपूर्ण देशात बेरोजगारीची लाट पसरली. घरातून बाहेर निघण्यावर बंधने लावण्यात आली. कोई रोडपे ना निकाल अशा जाहिराती करण्यात आल्या. घर मे ही रहणा, बहार है कोरोना अशा प्रकारची जनजागृती करून लोकांना घरीच राहण्यास प्रवृत्त केल्या गेले. अजूनही कोरोनाची दहशत कमी झाली नसून कित्येक शहरे प्रतिबंधित क्षेत्रांनी झाकल्या गेली आहे. अद्यापही परिस्थिती पूर्व पदावर आली नसून प्रत्येक जीव जगण्यासाठी संघर्ष करीत असतांना अवाढव्य रक्कमेची वीजबिले सामान्य नागरिकांच्या माथी मारून शासनाने सामान्य नागरिकांचे कंबरडेच मोडले आहे. विद्युत कार्यालयाचे उमरठे झिजवून थकल्यानंतर शासन काही दया करेल व वीजबिल कपात करण्यासंदर्भात काही ठोस निर्णय घेईल, या भोळ्या आशेवर सामान्य जनता शासनाच्या निर्णयाकडे नजरा टिकवून बसली आहे. कोरोनाच्या या संकट काळात सरकार आपल्या पाठीशी आहे, अशा प्रकारे आजही जनतेची बोळवण करण्यात येत असून कोणतीही ठोस मदत अद्यापही शासनाकडून मिळालेली नाही. तरीही संकटाच्या या काळात जगण्याचं बळ निर्माण करत असतांना वीजबिलाचं आर्थिक बर्डन लादून सामान्य नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण केलं आहे. अशा या संकट समयी त्यांचे आर्थिक प्रश्न सोडण्या ऐवजी त्यांच्यावर आर्थिक दंड थोपटणे कितपत योग्य ठरेल यावर चिंतन व्हायला हवे. <p><p>५० टक्के जनता याही परिस्थितीत वीजबिल भरून मोकळे होण्याच्या तयारीत असतांना त्यांना विद्युत कार्यालयातील वीजबिल कक्षाच्या असुविधेचा सामना करावा लागत आहे. वीजबिल भरण्याकरिता एकच खिडकी उपलब्ध असून वीजबिल भरण्या करिता नागरिकांची लांबच लांब रांग लागलेली असते. त्यातल्यात्यात अधामधात लिंक फेलची समस्या निर्माण होत असल्याने नागरिक चांगलेच वैतागले आहेत. घंटो लाईनमध्ये उभे राहून लिंक न आल्याने परत जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये कमालीची चीड निर्माण होत असून विद्युत विभाग मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहे. वीजबिल भरतांना एकाच खिडकीवर ग्राहकांची अति गर्दी होत असून वीजबिल भरण्याकरिता आणखी एक खिडकी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. <p><p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
विविहीतेची विषारी द्रव्य प्रश्न करून आत्महत्या
विविहीतेची विषारी द्रव्य प्रश्न करून आत्महत्या
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>एका चोवीस वर्षीशीय विवाहितेने राहत्या घरी विषारी द्रव्य प्रशासन करून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली असून तिला वणी ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगून मृदेहाचे शवविच्छेदन केल्या नंतर पार्थिव शरीर कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. <p>मारेगाव तालुक्यातील नेत (वरुड) गावातील सोनाली रमेश विधाते (२४) या विवाहितेने घरीच विषारी द्रव्य प्राशन केल्याने तिला वणी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास तिने विषारी द्रव्य प्रश्न केल्याचे सांगण्यात आले आहे. लग्न झाल्यानंतर पाच ते सहा वर्षाच्या संसारातच अशा प्रकारचे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल तिने उचलल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दाम्पत्याला एक छोटे मुलं आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरात विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कार्यवाही
शहरात विनाकारण रस्त्यांवरून फिरणाऱ्यांवर पोलिसांची धडक कार्यवाही
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून या साथीच्या आजाराने ग्रामीण भागातही शिरकाव केल्याने तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढून ३९ वर पोहचला आहे. या आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे नियोजन केल्या जात असून आधी १० ते २ वाजेपर्यंत असलेली बाजारपेठेची वेळ बदलवून सकाळी ६ ते साय. ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. बाजारपेठेत नागरिकांची उडणारी झुंबड कोरोना संक्रमणाचे कारण बानू नये म्हणून बाजारपेठेची वेळ वाढविण्यात आली आहे. असे असले तरी शहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नसल्याचे पाहून वाहतूक पोलिसांनी आज ५ वाजतानंतर विनाकारण शहरात फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. या कार्यवाहीमुळे शहरात विनाकारण गिरक्या मरणाऱ्यांवर चांगलाच चाप बसला असून वेळेनंतर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांकडून दंड वसूल करण्यात आल्याने त्यांच्यात चांगलीच धडकी भरली आहे. वाहतूक पोलिसांनी आज केलेल्या धडक कार्यवाहीने विकारान रस्त्यांवरून गिरक्या मरणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले असून यानंतर अकारण रस्त्यांवर वर्दळ करून रोडची शोभा वाढविणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे आज पोलिसांनी आपल्या कार्यवाहीतून स्पष्ट केले आहे. शहरात एकीकडे कोरोनाचे संक्रमण वाढत असतांना दुसरीकडे काही हौसी प्रवृत्तीचे लोक विनाकारण शहरात गर्दी करत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास अडथळे निर्माण होत आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरून विनाकारण गिरक्या मरणाऱ्यांवर वचक निर्माण व्हावा म्हणून आज धडक कार्यवाहीचे पोलिसांनी दर्शन घडवून दिले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1633
1634
1635
1636
1637
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे