Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
लॉकडाऊन नाही आता 2 दिवस जनता कर्फ्यू , तुकाराम मुंढेंचा नागपुरात निर्णय...Read More
LOKMAT.NEWS18.COM
लॉकडाऊन नाही आता 2 दिवस जनता कर्फ्यू , तुकाराम मुंढेंचा नागपुरात निर्णय...Read More
lokmat.news18.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पुण्यातील हडपसर मधील आजी ८५ व्या वर्षी रस्त्यावर लाठीकाठीचा खेळ करीत तीन दिवसात झाल्या स्टार..
WWW.YOUTUBE.COM
पुण्यातील हडपसर मधील आजी ८५ व्या वर्षी रस्त्यावर लाठीकाठीचा खेळ करीत तीन दिवसात झाल्या स्टार..
<p>पुणे पिंपरी :- लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आल्याने १४ नातवांचा सांभाळ करणाऱ्यासाठी रस्त्यावर लाठीकाठीचा खेळ करणाऱ्या ८५ वर्षाच्या आजीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अवघ्या तीन दिवसात त्या सोशल मीडियावर स्टार झाल्या. शांताबाई पवारअसं त्यांचं नाव असून त्या हडपसर येथे राहतात.</p> <p><p>शांताबाई पवार ( आजी ) ह्या हडपसर वैदवाडी गोसावी वस्ती येथे राहतात, त्यांचे चार मुले व सुना यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर १७ नातवाची जवाबदारी आली. त्यातील तीन मुलींचे त्यांनी काबाड कष्ट करून लग्नही केलं. आता सध्या त्या १४ नातवांचा सांभाळ करत आहेत. यामधील काही हडपसर येथील साधना विद्यालयात शिक्षण घेत आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खर्च आजी स्वतः करतात. मागील तीन महिन्या पासून करोनाचे संकट आले आणि हातावरचे पोट असलेल्या या कुटुंबाची उपासमारी सुरू झाली. अनेक दिवस पाच मुलीसह आजी उपाशी झोपल्या, मात्र त्यांच्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही.</p> <p><p>शेवटी लॉकडाऊन उठल्यानंतर आजीने रस्त्यावर उतरून काठी फिरवण्याची कला सादर करण्यास सुरुवात केली. ८५ वर्षीय आजीची ही अचंबित करणारी करामत पाहून नागरिकांचेही त्यांच्याकडे लक्ष वेधले गेले. अनेकांनी या आजीला सोशल मीडियावर व्हायरल करून केल्याने अवघ्या दोन तीन दिवसातच त्या सोशल मीडियावरील स्टार झाल्या. आजीची ही कला पाहून अभिनेते आणि पोलीस आयुक्त के. व्यंकटेश यांनीही त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली असून त्यांना मदत करणार असल्याचं सांगितलं. तसेच इतरांनीही या आजीसाठी पुढे येण्याचं आवाहन त्यांनी केलंय.</p> <p><p>तरुणपणी खेळ खेळून जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही. तेवढी सोशल मीडिया द्वारे मिळाली आहे. मात्र कौतुक व पुरस्काराने पोट भरत नाही. असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत, बालगंधर्व येथे माझ्या कलेचे कौतुक केले होते, मात्र या पुरस्कारकडे पाहून माझ्या कुटुंबाचे पोट भरेल असे मला वाटत नाही.</p> <p><p>कृपया मला मदत करा, माझ्या नातीना शिकवून मोठे करायचे आहे, असे शांताबाईंनी सांगितलं. माझी कला आवडली असेल तर मला मदत करा, असं त्या नागरिकांना हात जोडून विनंती करत आहेत.</p> <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तेलंगणातून उपचार्थ आलेल्या महिलेचा चंद्रपूर जिल्हयात कोरोनामुळे मृत्यू ...Read More
WANICITY.COM
तेलंगणातून उपचार्थ आलेल्या महिलेचा चंद्रपूर जिल्हयात कोरोनामुळे मृत्यू ...Read More
khabarkatta.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणीतील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी ला नागपूर येथे चोरी प्रकरणात अटक...Read More
WWW.LOKMAT.COM
वणीतील बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी ला नागपूर येथे चोरी प्रकरणात अटक...Read More
स्वत:ची खोटी ओळख दाखवून आणि बनावट धनादेश देऊन सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या आशुतोष महाजनला तहसील पोलिसांनी बुधवारी अटक केली. महाजन हा मूळचा वणी येथील रहिवासी आहे. तेथे बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो वणीतून फरार झाला. गेल्या सहा महिन्यांपासून यवतमाळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. वणीतून पळ काढल्यानंतर त्याने नागपुरातील महाल भागात आणि नंतर नंदनवनमध्ये लपूनछपून वास्तव्य सुरू केले होते.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील सतरा रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे, तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली सहा !
WANICITY.COM
शहरातील सतरा रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे, तालुक्यातील ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झाली सहा !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरात कोरोनाने कहर केला असून सातत्याने कोरोनाबाधित रुग्ण आढळत असल्याने शहरवासीयांबरोबरच प्रशासनही चिंतेत आले आहे. तेलीफैल परिसरातील आणखी एक युवक पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोना बाधितांची संख्या वाढून २४ झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून १७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे झाले आहेत. एका कोरोना बाधित महिलेच्या मृत्यूची नोंद झाली असून तालुक्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण सध्या सहा आहेत. <p><p>वणी तालुक्याची लोकसंख्या २ लाख १ हजार ४८७ एवढी असून १० वर्षाखालील मुले १५२४० आहेत तर ६० वर्षावरील व्यक्तींची संख्या १९६१२ एवढी आहे. तालुक्यात आजपावेतो २४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एका कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. १७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून तालुक्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली आहे. तालुक्यात सात प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले होते. सुरुवातीचे दोन प्रतिबंधित क्षेत्र मोकळे करण्यात आले असून पाच प्रतिबंधित क्षेत्र अद्यापही ऍक्टिव्ह आहेत. आता पर्यंत २६० व्यक्तींना (हायरिस्क) संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात येऊन ४५८ व्यक्तींना (लोरीस्क) होम क्वारंटाईन करण्यात आले. एकूण ४२९ व्यक्तींचे स्वाब घेण्यात आले तर ९७ व्यक्तींची रॅपिड टेस्ट काण्यात आली. सातही प्रतिबंधित क्षेत्रातील ५ हजार ४१७ व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील ६९८ गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्यात आली. शहर व तालुक्यातील प्रत्येक कंटेन्टमेंट झोन मधील नागरिकांच्या हालचालींवर प्रशासनाने अगदी बारकाईने लक्ष ठेवले. संशयितांचा शोध घेऊन त्यांचे नमुने तपासणी करीता पाठवले. प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले. परंतु नागरिकांचे योग्य सहकार्य न मिळाल्याने कोरोना आटोक्यात येण्याऐवजी वाढतच चालला आहे. शहरात वस्तूंची खरेदी करण्या करिता नागरिकांची चांगलीच गर्दी होत असून त्यामुळे कोरोना संक्रमणाला वाव मिळत आहे. त्याकरिता प्रशासनाने आता कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. <p><p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
महावितरण कार्यालयाचा गलथान कारभार. विद्यानगरी मधिल लाईट पोल अचानक कोसळले
WANICITY.COM
महावितरण कार्यालयाचा गलथान कारभार. विद्यानगरी मधिल लाईट पोल अचानक कोसळले
वणी शहर प्रतिनिधी:- *निलेश अ.चौधरी* <p> <p>विद्यानगरी वसाहत ही नांदेपेरा मार्गावर ,मागील 25 वर्षा पासुन ,अस्तित्वात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांचे वास्तव्य आहे. विद्यानगरी लगत ,असलेली काही घरांनकरीता लाईनची व्यवस्था करण्यासाठी मागील एक महिन्यात पोल टाकून विद्युत प्रवाह घेण्यात आला होता. परंतु आज सायंकाळी 7 च्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे वातावरण खराब नसतांन ,जिवंत विद्युतपुरवठा पोल सहीत जमिन दोस्त झाला. <p>ही घटना ईतकी भयंकर होती की ,यामध्ये विद्यानगरी मधील नागरीक हादरुण गेले. एक महिन्या अगोदर केलेले काम ईतके निकृष्ठ दर्जाचे होते. <p>या चालु विद्युत प्रवाह जमीन दोस्त झाला. <p>या मध्ये जिवित हानी झाली असती तर जवाबदार कोण??असा सवाल विद्यानगरी येथील नागरिक करीत आहे. या घडलेल्या प्रकाराबद्दल विद्यानगरी मधील नागरीक आंदोलनाच्या पवित्रात असल्याचे दिसुन येत आहे. अशा कामाची परवानगी कोणी दिली ?? <p>जिवित हाती झाल्यास जवाबदारी कोण घेईल ??या संदर्भात महावितरणा विरोधात आंदोलनाचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
बुधवारी दमदार बरसलेल्या पावसाच्या ओढ्याने बोरगावातील वृद्ध वाहून गेला !
WANICITY.COM
बुधवारी दमदार बरसलेल्या पावसाच्या ओढ्याने बोरगावातील वृद्ध वाहून गेला !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>पावसाळा सुरु झाल्यापासून बुधवारी २२ जुलैला शहरात दमदार पावसाने हजेरी लावली. कधी आळत पाळत हलक्या सरी यायच्या व क्षणार्धातच लुप्त व्हायच्या. त्यामुळे वातावरणातील उकिरडाही कमी व्हायचे नाव घेत नव्हता. काल पावसाचे उग्ररूप पाहायला मिळाले. विजेच्या कडकडाटासह धो धो पाऊस बरसला. बुधवारी दोन वाजता अचानक नभात ढग दाटून आले. व क्षणार्धात टपूऱ्या थेंबांचा पाऊस पडण्यास सुरुवात झाली. उकिरड्याने चिडाऊ लागलेल्या वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसाळ्याची ही शहरातील पहिलीच दमदार एन्ट्री होती. पहिल्यांदाच रस्त्यांवरून पाण्याचे लोट वाहतांना दिसत होते तर खाच खळगेही काही प्रमाणात भरले असल्याचे पाहायला मिळत होते. परंतु याच अतितीव्र स्वरूपाच्या पडलेल्या पावसाने डोंगरी भागातील पाय वाटांवर पाण्याचा ओघ वाढल्याने वाट काढतांना अंदाज चुकलेल्या एका वृद्धाचा वाहून गेल्याने मृत्यू झाल्याची घटना वणी कोरपना मार्गावरील बोरगाव येथे उघडकीस आली असून काल सायंकाळी हा वृद्ध उंचावरून वाहत येत झाडाझुडपांमध्ये मृत अवस्थेत आढळून आला. <p>बोरगाव येथील नारायण सीताराम काळे (७०) हा गुरे ढोरे चारण्याकरिता जंगलभागात गेला असता दुपारी अचानक जोरदार सुरु झाल्याने तो घराच्या वाटेने जनावरे घेऊन निघाला. पावसाने पायवाटाही जलमय झाल्या असल्याने रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने सदर वृद्ध पाण्याच्या तीव्र ओघाने वाहून गेला व नंतर त्याचा सायंकाळी झाडाझुडपात मृतदेह आढळून आला. गुरेढोरे चारण्याकरिता गेलेल्या वृद्धाचा पावसाच्या ओघात अनाहक बळी गेल्याने बोरगावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, तालुक्यातील रुग्णसंख्या झाली २४ !
WANICITY.COM
शहरातील आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, तालुक्यातील रुग्णसंख्या झाली २४ !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरात कोरोना विषाणूने कहर केला असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. तेलीफैल परिसरातील आज आणखी एका युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तेलीफैल परिसर कोरोना संक्रमणाचे केंद्र बिंदू बनतांना दिसत असून याठिकाणी नऊ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २४ वर पोहचला आहे. काल २२ जुलैला याच परिसरातील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान सेवाग्राम येथे मृत्यू झाला असून तालुक्यातील कोरोनाचा ती पहिला बळी ठरली आहे. दाटीवाटीच्या असलेल्या या परिसरात कोरोनाचे एकामागून एक रुग्ण आढळत असल्याने प्रशासन चांगलेच हादरले आहे. आज पॉझिटिव्ह आढळलेला युवक जत्रा मैदान परिसरातील एका सॉ मिलमध्ये काम करीत असल्याचे समजते. सॉ मिलमधील त्याच्या संपर्कात आलेल्या ५ ते ६ जणांना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून कुटुंबातील व परिसरातीलही व्यक्तींना कोविड केयर सेंटरमध्ये हलविले जात आहे. सतत रुग्णांची वाढ होत असल्याने शहरात कोरोना संक्रमणाचा चांगलाच धोका निर्माण झाला असून या आजारावर नियंत्रण मिळविण्याकरिता जिल्ह्यातील अन्य तालुक्यांप्रमाणेच वणी तालुक्यांतही संपूर्ण लॉकडाऊन करता येईल काय, यावरही विचार होणे आता गरजेचे झाले आहे. <p><p>शहरात कोरोनाचा विळखा वाढत असून या संसर्गजन्य आजाराने ग्रामीण भागातही आपले पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसाआड कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात नागरिकांचा मुक्त संचार होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. कोरोनाने तेलीफैल परिसर आपल्या कवेत घेतला असून याठिकाणी कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे, याच परिसरातून कोरोनाने मृत्यू झाल्याची तालुक्यात पहिली नोंद झाली आहे. तालुक्यात २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून ११ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात आता ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२ झाली आहे. शहरातील वाढती वर्दळ व नागरिकांचा मुक्त संचार यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढण्यास पोषक वातावरण मिळत असून शहरात आता कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोना नियंत्रणात राहावा याकरिता संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले असून अशाच प्रकारच्या नियोजनाची शहरात सुद्धा आवश्यकता असल्याचे आता नागरिकांमधून उघडपणे बोलल्या जात आहे. शहरात कोरोना भयावह रूप धारण करण्यापूर्वी कोरोनाचे संक्रमण रोखने आवश्यक असून त्याकरिता शहरातील नागरिकांच्या मुक्त संचारावर अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने यावर सकारात्मक विचार करून योग्य नियोजन करण्याची अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जिल्ह्यात 54 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 1 मृत्यू 17 जणांची कोरोनावर मात
WANICITY.COM
जिल्ह्यात 54 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 1 मृत्यू 17 जणांची कोरोनावर मात
यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात आज (दि.22) नव्याने तब्बल 54 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली आहे तर यवतमाळ शहरातील इस्लामपूरा भागातील 46 वर्षीय पुरूषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 17 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. <p>नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 54 जणांमध्ये 31 पुरुष व 23 महिला आहे. यात नेर शहरातील एक पुरुष, दिग्रस येथील तीन पुरूष व तीन महिला, पुसद येथील 13 पुरुष व नऊ महिला, कळंब येथील दोन पुरूष व दोन महिला, पांढरवकडा येथील 11 पुरूष व सहा महिला, यवतमाळ येथील एक महिला, तर दारव्हा येथील एक पुरूष व दोन महिलांचा महिलांचा समावेश आहे. <p>जिल्ह्यात मंगळवारपर्यंत 151 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात 54 जणांची भर पडल्याने हा आकडा 205 वर पोहचला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 17 जणांना सुट्टी झाल्यामुळे व 1 पॉझेटीव्ह रुगणाचा मृत्यू झाल्यामुळे ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 187 झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 117 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 70 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 648 झाली आहे. यापैकी 440 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात एकूण 21 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 77 जण भरती आहे. <p>शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 60 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत 10554 नमुने पाठविले असून यापैकी 10017 प्राप्त तर 537 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 9369 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. <p>यवतमाळ शहर व पांढरकवडा शहरात 25 जुलैपासून संपूर्ण लॉकडावून : जिल्ह्यात विशेषत: यवतमाळ शहर व पांढरवकडा शहरात कोरोनाबाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरील दोन्ही शहरात 25 जुलै पासून समोरचे सात दिवस संपुर्ण लॉकडावून करण्यात येणार आहे. यात दवाखाने व मेडिकल स्टोअर्स उघडे राहतील. 25 तारखेपासून सुरू होणाऱ्या या लॉकडावूनमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील तेलीफैल परिसरातील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू , सेवाग्राम येथे सुरु होता उपचार !
WANICITY.COM
शहरातील तेलीफैल परिसरातील कोरोना बाधित महिलेचा मृत्यू , सेवाग्राम येथे सुरु होता उपचार !
प्रशांत चंदनखेडे वणी:- <p><p>शहरातील तेलीफैल परिसरातील ६५ वर्षीय महिला सेवाग्राम येथे पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तेलीफैलात कोरोना बाधित रुग्णांची मालिकाच सुरु झाली. १० जुलैला सदर महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर १३ जुलै पासून तिची प्रकृती चांगलीच गंभीर झाली. आयसोलेशन विभागात व्हेंटिलेटरवर असतांनाच तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. त्यामुळे वनी तालुक्यात पहिल्या कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान काल राजूर येथील महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात २३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ११ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्याने तालुक्यात ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे. काल २१ जुलैला राजूर येथे पॉझिटिव्ह आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील २६ व्यक्तींना (हायरिस्क) संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले तर ९ व्यक्तींना (लोरीस्क) होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. शहर व तालुक्यातील जवळपास ८० व्यक्तींच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होणे बाकी असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. <p><p>शहरातील तेलीफैल परिसरातील ६५ वर्षीय महिला मागील काही दिवसांपासून शारीरिक व्याधींनी ग्रस्त होती. तिने काही दिवस शहरातील खाजगी दवाखान्यातही उपचार घेतले. परंतु तिला आराम होत नसल्याने येथील डॉक्टरांनी तिला चंद्रपूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये रेफर होण्याचा सल्ला दिला. पैशाचे नियोजन नसल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले. त्याठिकाणी प्रथम त्या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली. १० जुलैला चाचणी अहवाल प्राप्त होऊन ती त्यात पॉझिटिव्ह आढळून आली. त्यानंतर १३ जुलैपासून तिची प्रकृती चांगलीच खालावल्याने तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना विषाणूने मृत्युमुखी पडलेली ती तालुक्यातील पहिला रुग्ण ठरली आहे. त्या पॉझिटिव्ह महिलेच्या मृत्यूने तेलीफैल परिसर चांगलाच हादरला असून तालुक्यात कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाल्याने प्रशासनही चिंतेत पडले आहे. <p><p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
नागपूर : ब्ल्यू फिल्म दाखवून पती-पत्नीने केला मैत्रिणीवर बलात्कार...
WANICITY.COM
नागपूर : ब्ल्यू फिल्म दाखवून पती-पत्नीने केला मैत्रिणीवर बलात्कार...
esakal.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आमदार जोरगेवार यांना अवैध दारू विक्रेत्यांची धमकी, अश्या धमक्यांना घाबरणारा आमदार नाही - आमदार जोरगेवार...
WANICITY.COM
आमदार जोरगेवार यांना अवैध दारू विक्रेत्यांची धमकी, अश्या धमक्यांना घाबरणारा आमदार नाही - आमदार जोरगेवार...
news34.co.in
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सेतू केंद्रामध्ये वीज नसली की कामकाज बंद, दररोज वेळे आधीच केले जाते कामकाज बंद !
WANICITY.COM
सेतू केंद्रामध्ये वीज नसली की कामकाज बंद, दररोज वेळे आधीच केले जाते कामकाज बंद !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरातील तहसील कार्यालयाशी निगडित असलेल्या सेतू केंद्रावर महत्वपूर्ण दाखले काढण्याकरिता आवेदनपत्र सादर करून अपेडेव्हिट करतांना नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे कार्यालयीन कामकाजाच्या वेळातही कपात करण्यात आल्याने कमी वेळात दाखले काढतांना नागरिकांची चांगलीच दमछाक होत आहे. दोन वाजेपर्यंतचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. त्यातही सेतू केंद्रातील स्टाफ अर्धा तास आधीच कामकाज बंद करून नागरिकांशी हुज्जत घालून अरेरावीची भाषा करत वाद घालतांना दिसतात. मंगळवारला तर वीज पुरवठा खंडित झाल्याने दोन वाजेपर्यंत नागरिक तात्काडत बसले होते. शेवटी वीज न आल्याने त्यांना प्रतिज्ञापत्र परत करून दुसऱ्या दिवशी यायला सांगण्यात आले. सेतू केंद्रामध्ये साधे इन्व्हर्टरही नसल्याचे आढळून आले आहे. याबाबत तेथील स्टाफला विचारले असता इन्व्हर्टर दुरुस्तीकरिता देण्यात आल्याचे सांगण्यात आले. केंव्हा दिले याचे काहीही उत्तर त्यांच्या कडून मिळाले नाही. <p><p>याठिकाणी कायर येथील बराच शेतकरीवर्ग शेतीविषयक कर्जासंबंधीचे दाखले काढण्याकरिता आला होता. शेतीच्या कामाचा हंगाम सुरु असून हातची कामे सोडून शेतकरी दाखले काढण्यासाठी खेड्यापाड्यातून तहसील कार्यालयामध्ये येतात. परंतु त्यांना सेतू केंद्रामधील असुविधांचा सामना करावा लागत आहे. कंप्युटर ऑपरेटर स्टाफ थोड्या थोड्या गोष्टींकरिता कुणाशीही हुज्जत घालतांना दिसतो. आधीच चार तासांचा वेळ त्यातही अर्धातास आधीच कामकाज बंद करण्यात येत असल्याने त्याठिकाणी दाखल्यांसाठी आलेल्या नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे. बसचे टाईमिंग नाहीत, ऑटो वेळेवर मिळत नाही अशा परिस्थितीतही दाखले काढण्याकरिता खेड्यापाड्यातून लोकं येतात. पण त्यांना मिळतात फक्त समोरच्या तारखा. शैक्षणिक, शेतीविषयक व अन्य महत्वपूर्ण दाखले काढण्याकरिता आधी सेतू केंद्रात आवेदनपत्र सादर करावे करावे लागते. सेतू केंद्रात रोजंदारी स्टाफ असून त्यांची बोलण्याची भाषाही अगदीच उद्धट आहे. सर्व कामे बाजूला सारून दाखले काढण्याकरिता येणाऱ्या नागरिकांना कधी वीज नसल्याने तर कधी वेळे आधीच कामकाज बंद होत असल्याने चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोनाच्या काळात ग्रामीण महिलांनी केली 13 हजार परसबागेची निर्मिती! 405 टक्के उद्दिष्ट गाठून यवतमाळ जिल्हा राज्यात प्रथम
WANICITY.COM
कोरोनाच्या काळात ग्रामीण महिलांनी केली 13 हजार परसबागेची निर्मिती! 405 टक्के उद्दिष्ट गाठून यवतमाळ जिल्हा राज्...
<strong>यवतमाळ</strong> :- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद), कृतीसंगम अंतर्गत दि. 25 जून ते 15 जुलै 2020 या कालावधीत “माझी पोषण परसबाग विकसन मोहीम” हा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील गर्भवती, स्तनदा माता, बालके आणि किशोरवयीन मुली यांना आहारातून विविध मूलद्रव्ये, खनिजे, लोह आणि प्रथीने इत्यादी पोषकतत्वे मिळावे आणि त्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ व्हावी, म्हणून या मोहिमेंतर्गत पोषण परसबागांची निर्मिती करण्यात आली आहे.</h6> <p><h6> <p>यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही ग्रामीण महिलांनी 13 हजार 287 परसबागेची निर्मिती करुन महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळविला. तर वर्धा जिल्ह्याने 8 हजार 288 परसबागा तयार करून द्वितीय क्रमांक तर अमरावती जिल्ह्याने 6 हजार 217 परसबागांची निर्मिती करून तृतीय क्रमांकावर स्थान मिळविले.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये आहार, पोषण व स्वच्छता विषयक कार्यक्रम गत तीन वर्षांपासून राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात पोषणाची आणि आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी विशेषतः गरोदर माता, स्तनदा माता, 6 ते 24 महिने वयोगटातील बालके आणि किशोरवयीन मुली यांच्या आहारामध्ये नियमित स्वच्छ व जैविक पद्धतीने पिकविलेला ताजा भाजीपाला व फळे इ. चा समावेश व्हावा याकरीता प्रयत्न केले जात आहेत.सदर मोहिमेत तयार करण्यात आलेल्या परसबागांमुळे ग्रामीण भागातील कुटुंबाना घरच्या घरी भाजीपाला व फळे उपलब्ध झाली तसेच कुटुंबाचा भाजीपाला वरील खर्च देखील वाचला.<br /> <p>विशेष म्हणजे ‘माझी पोषण परसबाग विकासन मोहीम’ अंतर्गत जिल्ह्याला 3280 वैयक्तिक / सामुहिक परसबागा विकसीत करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यवतमाळ जिल्ह्याने मात्र 405 टक्के काम करून 13287 परसबागा विकसीत केल्या. याबाबत राज्याच्या उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांना पत्राद्वारे अभिनंदन कळविले आहे.<br /> <p>सदर मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुलकर्णी यांच्या मार्फत वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळे ही मोहीम यशस्वी झाल्याचे उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक नीरज नखाते, कृतीसंगमचे जिल्हा व्यवस्थापक सुजित क्षिरसागर यांनी सांगितले.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
तालुक्यातील राजूर ( कॉलरी) येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला
WANICITY.COM
तालुक्यातील राजूर ( कॉलरी) येथे कोरोना बाधित रुग्ण आढळला
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>कोरोनाने ग्रामीण भागातही पाय पसरण्यास सुरुवात केली असून वणी पासून ७ किमी अंतरावर असलेल्या राजूर (कॉलरी ) गावात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. पॉझिटिव्ह आढळलेली महिला आधीच आजारग्रस्त असून तिचे हार्टचे ऑपरेशन करण्यापूर्वी तिची नागपूर येथे कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात ती पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे वणी तालुक्याची रुग्ण संख्या आता २३ झाली आहे. <p>राजूर ( इजारा) येथील श्रीराम नगर येथे वास्तव्यास असलेली महिला राजूर (कॉलरी) येथील आपल्या कुटुंबाकडे १० दिवसांआधी राहायला आली होती. माहेरी आलेल्या या महिलेला हार्टची बिमारी असून त्यावर उपचार करण्याकरिता ती नागपूर येथील खाजगी दवाखान्यात १९ जुलैला भरती झाली. हार्टची शस्त्रक्रिया करावी लागत असल्याने आधी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात ती कोरोना बाधित आढळून आली. त्यामुळे ती दहा दिवसांपासून राहत असलेला राजूर (कॉलरी) परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला असून परिसराला सील करण्यात आले आहे. तसेच श्रीराम नगर मधील ती राहत असलेले घरही सील करण्यात आले आहे. तिच्या कुटुंबातील व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करण्यात येत आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तीमुळे शहरात कोरोनाचा शिरकाव झाला असून ग्रामीण भागातही कोरोना दाखल होतांना दिसत आहे. राजूर (कॉलरी) येथे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने राजूर बरोबरच आसपासच्या गावांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या २३ झाली आहे. त्यामुळे प्रशासनावरील तान चांगलाच वाढला आहे.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1639
1640
1641
1642
1643
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे