Warora News
लॉगिन
← मागे

बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने तेलीफैल परिसर हादरला !
WANICITY.COM
कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येने तेलीफैल परिसर हादरला !
प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात कोरोना या साथीच्या रोगाने उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली असून शरवासियांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी तेलीफैलातील दोन अल्पवयीन मुला मुलीला कोरोनाची लागण झाल्याने शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढून २२ झाली आहे. ११ रुग्ण कोरोनातुन पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे शहरात आता ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११ झाली आहे. सोमवाराला २९ पैकी २४ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात २२ निगटीव्ह तर दोन अहवाल पॉझिटिव्ह आले असून ५ अहवाल प्रलंबित आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन्ही १३ व १० वर्षे वयोगटातील मुला मुलीला पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या २३ व्यक्तींना (हाय रिस्क) संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले आहे तर २८ व्यक्तींना (लोरीस्क ) होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तेलीफैल परिसरात आता पर्यंत ८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा परिसर कोरोना संक्रमणाचे केंद्रबिंदू बनत असल्याचे सध्या तरी जाणवत आहे.तेलीफैलात तयार झालेल्या कोरोनाच्या दोन्ही साखळ्या तोडण्याकरिता प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. शहरातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता नगर परिषद व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक परिसरातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. प्रत्येकाची थर्मल स्कॅनिंग व ऑक्सिमीटरने तपासणी करण्यात येत आहे. सर्वेक्षणाकरिता ५२ पथके तयार करण्यात आली आहे. प्रशासन कोरोनाचे संक्रमण रोखण्याकरिता हरसंभव प्रयत्न करीत असून नागरिकांनीही योग्य सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता प्रशासन विविध उपाययोजनांचे प्रयोग करीत असून बाजारपेठेच्या वेळांत बदल करण्याबरोबरच घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

सेवाग्राम येथे पॉझिटिव्ह निघालेल्या तेलीफैल परिसरातील महिले पासून याठिकाणी कोरोनाची साखळी तयार झाली. १० जूलैला सेवाग्राम येथे ६५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर १३ जुलैला पॉझिटिव्ह महिलेच्या कुटुंबातील दोन पुरुष व एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. १६ जुलैला त्याच परिसरातील एक ७० वर्षीय वृद्ध पॉझिटिव्ह निघाला. लगेचच १७ जुलैला वृद्ध व्यक्तीच्या कुटुंबातील महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आणि काल २० जुलैला १३ वर्षीय मुलगा व १० वर्षीय बालिका कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने तेलीफैल परिसरात एकूण ८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा व एकमेकांशी आपुलकीची नाळ जुडून असणारा तेलीफैल चांगलाच हादरून गेला असून हसत्या खेळत्या परिसराचं आता उदासवाणं रूप पाहायला मिळत आहे. उद्या कोण पॉझिटिव्ह निघेल या विचाराने त्यांच्या मनात धडकी भरतांना दिसून येत आहे. परिसरातील प्रत्येक व्यक्ती कोरोनाच्या दहशतीत वावरतांना दिसत आहे. आता केंव्हा या साखळ्या तुटेल या चिंतेत ते दिवस कंठत आहेत.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
चिकन विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह, कुचना वसाहत सील
WANICITY.COM
चिकन विक्रेता कोरोना पॉझिटिव्ह, कुचना वसाहत सील
कुचना - माजरी पोलीस ठाण्याअंतर्गत कुचना वसाहतीच्या समोर असलेले एका ४३ वर्षीय चिकन विक्रेते कोरोना पॉजिटिव झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोरोना संक्रमित व्यक्तीचे कुचना वसाहतीच्या समोर चिकन चे दूकान आहेत. भाजीपाला आणि फळ सुद्धा विकत होता. सदर व्यक्ती उत्तरप्रदेशच्या कानपुर येथून १६ जुलै रोजी कुचना येथे आला.दरम्यान त्या व्यक्तीला होम कोरोंटाइन करण्यात आले. त्याचे नमूने घेवून चाचणी करिता पाठविण्यात आले होते दरम्यान सोमवारी संयकाळी ६ वाजताच्या दरम्यान त्याचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉजीटिव आले अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी संजय आसुटकर यानी दिली.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
नागरिकांनी जगविले १२ हजार चंदन वृक्ष
WANICITY.COM
नागरिकांनी जगविले १२ हजार चंदन वृक्ष
वरोरा : चार वर्षांपासून शहरातील हरित मित्र परिवाराने परिसरात चंदनवृक्ष लावण्याकरिता जनजागृती सुरू केली. वृक्षरोपणाचे महत्त्व ओळखून नागरिक व शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने १२ हजार चंदनाची वृक्ष अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यापूर्वी शहरात एकही चंदन वृक्ष नव्हता हे विशेष.

२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यानंतर चंदन वृक्षलागवडीबाबत जनजागृती सुरू केली. चंदन वृक्ष लावताना हरित मित्र परिसराचे सदस्य स्वत: जावून मदत करतात. चंदनाचे रोपटे लावताना त्याच्या सभोताल तुरीचे दाणे किंवा पपईचे बियाणे टाकले जाते. चंदन रोपटे काही दिवस स्वत: अन्न घेवू शकत नाही. त्यामुळे चंदन वृक्षाला सभोवताल तूर व पपईपासून अन्न घेण्यास मदत होते. सातत्याने जनजागृती केल्याने चार वर्षांत १२ हजार चंदनाचे वृक्ष जगले आहेत. काही झाडांची उंची ३५ फुटाहून अधिक झालीआहे. जिल्ह्याचे तापमान उष्ण असल्याने चंदन वृक्षाची वाढ झपाट्याने होते. काही शेतकºयांनी चंदन वृक्ष बांधावर लावले. त्यांचीही वाढ मोठ्या झपाट्याने झाल्याची माहिती हरित मित्र परिवाराच्या सदस्यांनी दिली.

१५ वर्षांनंतर होतो मोठा आर्थिक लाभ

चंदन वृक्षांचे वेळोवेळी संगोपन करण्याची गरज नाही. चंदनाचे रोपटे लावल्यानंतर दोन उन्हाळ्यात काळजी घेवून पाणी दिल्यास जिवंत राहते. वाढही झपाट्याने होते. १५ वर्षांनंतर मोठा आर्थिक लाभ होतो. संगोपनावर अधिक खर्च नसल्याने अनेक व्यक्ती चंदनाचे वृक्ष लावत आहे. वरोरा परिसरात येत्या काही दिवसात चंदन वृक्ष लागवडीचे क्षेत्र वाढणार आहे.शेतकऱ्यांनी चंदन वृक्ष शेतीच्या बांधावर लावून दोन वर्षे काळजी घेतल्यास मोठा आर्थिक लाभ होतो. बाजारात चंदन वृक्षाला मागणी आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीपेक्षा काळानुसार आज विचार बदलविण्याची गरज आहे.
- हरित मित्र, परिवार - वरोरा
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
२१ जुलै(मध्यरात्री) ते २८ जुलै पर्यंत पुसद दिग्रस मध्ये संचार बंदी लागू
POLITICSSPECIALLIVE.COM
२१ जुलै(मध्यरात्री) ते २८ जुलै पर्यंत पुसद दिग्रस मध्ये संचार बंदी लागू

पुसद

यवतमाळ फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) अन्वये यवतमाळ जिल्ह्यातील पुसद दिग्रस शहर आणि शहरालगतच्या परिसरात दिनांक २१ जुलै(मध्यरात्री) ते २८ जुलै २०२० च्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत आहे असा आदेश यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम. देवेन्द्र सिंह यांनी दिनांक २० जुलै २०२० रोजी पारित केले. या संचारबंदी मधून खालील बाबी आस्थापना व्यक्ती व समूहाला सूट राहील.

लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
…म्हणून नेटकरी करतायेत मिलिंद सोमणची कियारा आडवाणीसोबत तुलना
WANICITY.COM
…म्हणून नेटकरी करतायेत मिलिंद सोमणची कियारा आडवाणीसोबत तुलना
फिटनेस फ्रिक, आर्यन मॅन अशा विविध नावाने ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे मिलिंद सोमण. फिटनेमुळे आणि पत्नी अंकिता कोनवारमुळे सतत चर्चेत राहणारा मिलिंद सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. अनेक वेळा तो त्याच्या जीवनातील काही क्षण फोटो, व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अलिकडेच त्याने एक शर्टलेस फोटो शेअर केला असून सध्या या फोटोची चाहत्यांमध्ये विशेष चर्चा रंगली आहे. इतकचं नाही तर अनेकांनी त्याच्या या फोटोची तुलना कियारा अडवाणीच्या एका फोटोसोबत केली आहे.

मिलिंदने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक शर्टलेस फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो झाड्यांच्या पानांआड उभा असल्याचं दिसून येत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी या फोटोची तुलना डबू रत्नानीच्या मासिकासाठी कियारा आडवाणीने केलेल्या फोटोसोबत केली आहे. त्यामुळे सध्या त्याच्या या फोटोवर अनेक कमेंट्सचा पाऊस पडत आहे
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आजारी आईला पाहण्यासाठी 'तो' रुग्णालयाच्या इमारतीवर चढायचा अन्...;
WANICITY.COM
आजारी आईला पाहण्यासाठी 'तो' रुग्णालयाच्या इमारतीवर चढायचा अन्...;
जगभरात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यामळे नातेवाईकांना रुग्णालयात त्यांची भेट घेण्यासाठी जाता येत नाही. कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टंसिंग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रुग्णालयात खास कोरोना वॉर्ड तयार करण्यात आले असून काही वैद्यकिय कर्मचाऱ्यांनाच वॉर्डमध्ये प्रवेश आहे. याच दरम्यान एका मुलाचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या आईला पाहता यावं यासाठी एक मुलगा दररोज रुग्णालयाच्या इमारतीवर चढून खिडकीतून आईला पाहत असल्याचं फोटोमध्ये दिसत आहे.

एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र या दरम्यान तिच्या मुलाला रुग्णालयात जाण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे मुलगा दररोज रुग्णालयाच्या इमारतीवर चढून आपल्या आजारी आईच्या खिडकीपाशी जाऊन तिला पाहत असायचा. एका ट्विटर युजरने मुलाचे काही फोटो शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
दूध दर आंदोलनाला सुरुवात, स्वाभिमानीने फोडला दुधाचा टँकर; हजारो लीटर दूध सोडलं रस्त्यावर
WANICITY.COM
दूध दर आंदोलनाला सुरुवात, स्वाभिमानीने फोडला दुधाचा टँकर; हजारो लीटर दूध सोडलं रस्त्यावर
दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली असून ठिकठिकाणी सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची तीव्रता पहायला मिळत असून स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला असून हजारो लीटर दूध रस्त्यावर सोडलं. सांगली जिल्ह्यात पुणे-बंगळुरु महामार्गावरील येल्लूर फाट्याजवळ कार्यकर्त्यांनी गोकूळ दूध संघाचा टँकर फोडला. हा टँकर कोल्हापूर येथून मुंबईच्या दिशेने जात होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी मंगळवारी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी आहे. याशिवाय केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनास सुरुवात झाली आहे. नगरच्या अकोले तालुक्यातील अनेक गावात आंदोलन केलं जात असून दगडाला दुग्धाभिषेक घालत हमीभाव मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. तर नाशिकमधील चिंचखेड गावात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शिवमंदिरात दुग्धाभिषेक घालत आंदोलनास सुरुवात केली.

दूध खरेदीच्या प्रश्नावर आज बैठक
राज्यात गेल्या चार महिन्यांपासून ‘करोना‘मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याचे दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे अशी मागणी करत आहेत. त्यावर चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आली आहे. दुग्धविकासमंत्री सुनील के दार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला महानंद‘ चे अध्यक्ष, दूग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनेचे प्रमुख, तसेच राज्यभरातील दूध संघांचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
संयुक्त अरब अमीरात ने जापान से लॉन्च किया पहला मंगल मिशन
WANICITY.COM
संयुक्त अरब अमीरात ने जापान से लॉन्च किया पहला मंगल मिशन
संयुक्त अरब अमीरात (यूएई) का मंगल ग्रह के लिए पहला अंतरिक्ष मिशन सोमवार को जापान के तानेगाशिमा स्पेस सेंटर से लॉन्च हुआ। अरब स्पेस मिशन ने सोमवार को मंगल ग्रह के लिए अपने मार्स मिशन होप को लॉन्च कर दिया है।

संयुक्त अरब अमीरात (यूएई) के मंगल ग्रह के लिए ऐतिहासिक अंतरिक्ष मिशन में शामिल उपग्रह को जापान से छोड़ा गया है। होप नामक इस उपग्रह को तनेगाशिमा अंतरिक्ष केंद्र से एच2-ए नामक रॉकेट के ज़रिए भेजा गया है ख़राब मौसम के कारण इस अभियान को दो बार टालना पड़ा था।

यह भारतीय समयानुसार यह मिशन सुबह 3:28 बजे तानेगाशिमा स्पेस सेंटर से लॉन्च हुआ। संयुक्त राष्ट्र अमीरात पहला अरब मुल्क होगा, जिसने मंगल ग्रह पर अपनी दस्तक दी है। इस मिशन की लाइव फीड भी दिखाया गया। इस यान पर अरबी में 'अल-अमल' लिखा हुआ था।

इस उपग्रह के फ़रवरी 2021 तक मंगल तक पहुंचने की संभावना है। अमीरात का प्रोजेक्ट मंगल पर जाने वाले तीन प्रोजेक्ट में से एक है। इसमें चीन के ताइनवेन-1 और अमेरिका के मार्स 2020 भी शामिल हैं। 'HOPE' के मंगल की कक्षा में फरवरी, 2021 में पहुंचने की उम्मीद है।

इसके बाद यह एक मंगल वर्ष यानी 687 दिनों तक उसकी कक्षा में चक्कर लगाएगा। यूएई में इस प्रोजेक्ट को अरब के युवाओं के लिए प्रेरणा के स्रोत के रूप में देखा जा रहा है।
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
नागपुरात पती-पत्नीवर गोळीबार, परिसरात खळबळ
WANICITY.COM
नागपुरात पती-पत्नीवर गोळीबार, परिसरात खळबळ

नागपूर (कळमेश्वर) : जिल्ह्यातील कळमेश्वर येथील शिवाजी ग्राऊंड परिसरात सुधाकर खाडे यांच्या घरी भाड्याने राहणाऱ्या गणेश मेश्राम (32) व प्रियंका गणेश मेश्राम (28) या पती-पत्नीवर सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी गोळीबार केला.

यात गणेश मेश्राम यांच्या पोटाला गोळी लागली असून ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पत्नी प्रियंका हिला गोळी चाटून गेली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपींची संख्या सहा असल्याचे समजते. गोळीबारानंतर ते घटना स्थळावरून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.

लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरात कोरोना संसर्गाचा कहर, कोरोना रुग्णांची संख्या झाली २२
WANICITY.COM
शहरात कोरोना संसर्गाचा कहर, कोरोना रुग्णांची संख्या झाली २२
प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात कोरोनाने कहर केला असून दिवसाआड कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. सोमवारी तेलीफैल परिसरातील आणखी दोन व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने कोरोना बाधितांची संख्या २२ वर पोहोचली आहे. सध्या शहरात ११ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. उर्वरित ११ जण कोरोनामुक्त झाले तर ११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्र सहा (तेलीफैल) मधील रुग्णांची संख्या वाढत असून आता पर्यंत ८ पॉझिटिव्ह रुग्ण या परिसरात आढळले आहेत. या परिसरात कोरोनाचे संक्रमण वाढीस लागले असून याठिकाणी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. २२ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ११ जण कोरोनातून पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे शहरात सध्या ११ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने प्रशासनावरील तान वाढला आहे. सोमवारी दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने त्यांना उपचारा करीता यवतमाळ येथे हलविण्यात आले आहे. दोन्ही व्यक्ती तेलीफैल परिसरातील असल्याने या परिसरात कोरोना संक्रमणाचा चांगलाच धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचे सतत रुग्ण आढळत असल्याने प्रशासना बरोबरच नागरिकही चिंतेत पडले आहे. तथापि अनेक नागरिक संचारबंधीचे उल्लंघन करीत असल्याने प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे. दुपारी दोन वाजता नंतरही शहरातील काही परिसरात गर्दी दिसून येते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने प्रशासन सतर्क झाले आहे. मात्र नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. सर्दी, ताप, खोकला आदींची लक्षणे आढळल्यास स्वतःहून प्रशासनाला सहकार्य करावे तसेच लक्षणे आढळल्यास तातडीने रॅपिड टेस्ट तपासणी करण्याचे आव्हान उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी केले आहे. प्रशासनाच्या उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज निर्माण झाली आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
श्रावण मासी हर्ष मानसी शहरी वर्दळ वाटे चोहीकडे, कोरोनाची भीती कुना चिकन घेऊ द्याना आम्हा गडे !
WANICITY.COM
श्रावण मासी हर्ष मानसी शहरी वर्दळ वाटे चोहीकडे, कोरोनाची भीती कुना चिकन घेऊ द्याना आम्हा गडे !
प्रशांत चंदनखेडे वणी :-

श्रावण मास म्हटलं की ऊन सावल्यांचा खेळ, झाडे वेलींना नवीन पालवी फुटून सृष्टी अगदी हिरव्याकंच शालूत नटलेली दिसते. पावसाचीची रिमझिम सुरु असते. वातावरणात गारवा निर्माण झालेला असतो. खुल्या जागेत निसर्गनिर्मित झाडे डुलत असतात. गावखेड्यातही हिरवळ निर्माण होऊन शेत शिवरं हिरव्या नवलाईत स्वतःला न्याहाळतांना दिसतात. धरणीचं हिरवं रूप प्रत्येकालाच खुणावत असतं. जंगल घाटीत हिरवं आच्छादन पसरलेलं दिसतं. नदी नाले तुटुम्ब भरून वाहत असतात. झरण्याचं पडणारं पाणी मनाला मोहून टाकतं. अशा या आल्हादायक वातावरणात मन अगदी प्रसन्न होऊन निसर्गाशी एकरूप होतांनाच निसर्गाच्या सानिध्यात रमतांना दिसतं. तेंव्हा निसर्गाची सुंदरता वर्णन करणाऱ्या कवितांची अलगत आठवण मनाला शिवून जाते आणि काही स्मरणातील कवितांच्या ओळी डोळ्यासमोर तरंगू लागतात.धूसर झालेल्या शब्द कोशातील विरळ झालेल्या काही ओळी हळूच स्मरणात येतात. आणी अंतर्मनातून साजेशे बोल ऐकू ऐकू येतात " श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे " अशा या श्रावण मासाची गोडवी गाणाऱ्या कविता कुठे व दशकानुदशके समाजाला चिकटलेल्या परंपरा कुठे. श्रावण मासाला परंपरेची नाळ जुडली असल्याने कोरोनाच्या संकटातही रविवारचा बाजार मांस मटणाच्या खरेदीने गजबजून उठला होता. श्रावण महिन्यात मांस मटनाला शिवताही येत नसल्याने श्रावण महिना सुरु होण्याच्या एक दिवसा आधीच कुटुंबाला मनसोक्त मांस मटण खाऊ घालण्याकरिता चिकन मटणांच्या दुकानांवर नागरिकांनी चांगलाच विळखा घातला होता. श्रावण महिना लागण्या आधीचा शेवटचा दिवस चिकन मटणाच्या मेजवानीचे साजरा व्हावा म्हणून चिकन मटण शॉपवर अक्षरशः रीघ लागली हिती. प्रत्येक जीव चिकन मिळविण्यासाठी धडपडत होता. सव्वा महिना चिकन तोंडी लागणार नाही याची धक पकडून चिकन मटण शॉपवर नागरिकांनी आपला मोर्चा वळवला होता. गल्लीबोळातील प्रत्येक चिकन शॉपवर गर्दी ओसंडून वाहत होती. ग्राहकांची प्रतीक्षा करणाऱ्या दुकानदारांना आज ग्राहकांवर नियंत्रण ठेवणे कठीण होत होते. आज चिकन मटणांच्या दुकानांतील गर्दी पाहून सोशल डिस्टंसिंगची व्याख्या कशी मांडावी हेच कळत नव्हते. विनामास्क एकमेकांशी संवाद साधत काही लोक कोरोनालाच आव्हान देत होते. एरव्ही परिचयाच्या व्यक्तीशी बोलतांना नाकावरील रुमाल तोंडावर आल्यास धाक दपट करणारी यंत्रणा आज कुठेच आढळून आली नाही. शहरातील प्रत्येक चौकात जॅम लागत होते. लॉकडाऊनच्या काळात शहरातील वर्दळीचे उग्र रूप आज पाहायला मिळाले. बहुतांश शहर बांधव, दुकानदार व दुकानांतील कामगारवर्ग मास्कचा वापर न करता ऑन्ली टॉक करतांना दिसत होता. त्यांना टोकणारा व नियमांचे पाठ गिरवणारा यंत्रणेतील कोणताच शिपाई त्याठिकाणी आढळून येत नव्हता. कोरोनाच्या भीतीचा लवलेशही आज शहरात जाणवत नव्हता. पशु पक्षांवर कोरोनाचे संक्रमण झाल्याच्या अफवेने घाबराहट निर्माण होऊन चिकन दुकानांकडे पाठ फिरविणाऱ्या जनतेचे समाधान होताच त्यांनी चिकन दुकानांवर अक्षरशः धाबा बोलला. आज चिकन दुकानांवर उसळलेल्या गर्दीने दारू दुकानांवरील गार्दीचेही रेकार्ड तोडले. "प्रत्येकाचा एक दिवस येतो" ही म्हण अशीच प्रचलित झाली नाही. आजचा दिवस चिकन विक्रेत्यांना समर्पित राहिला. नागरिकांची आजची गर्दी पाहून कोंबड्याही चांगल्याच धास्तावल्या असेल. त्यांनाही कळून चुकले असेल की आज आपली काही खैर नाही. सोमवार पासून चिकन मटणाचे नावही तोंडावर येऊ न देणाऱ्या नागरिकांना दातात मांसाचा कणही अडकून राहणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. श्रावण महिन्यात सृष्टीला साज चढतो तसाच बाजाराचा आभास होत होता. धरणी जशी हिरव्या सौंदरियात न्हाऊन निघते तसच चिकन दुकानाचं सौंदर्य नागरिकांनी खुलवलं होतं. कोरोनावर मात करण्याकरिता इम्युनिटी पॉवर वाढवण्याचे आव्हान होत असतांना आज इम्युनिटी पॉवर वाढवण्याकरिता चिकन मटण खरेदी करणाऱ्यांचा कम्युनिटी पॉवर पाहायला मिळाला.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
इंटरनेटवरचा सर्वात पहिला फोटो आणि तो अपलोड होण्यामागची गोष्ट!! आज आपण इंटरनेटवर असंख्य फोटो पाहतो. पण इंटरनेटवर पहिला अपलोड झालेला फोटो कुठला होता हे तुम्हाला माहीत आहे का? तो फोटो आणि त्यासंबंधी...
WANICITY.COM
इंटरनेटवरचा सर्वात पहिला फोटो आणि तो अपलोड होण्यामागची गोष्ट!! आज आपण इंटरनेटवर असंख्य फोटो पाहतो. पण इंटरन...

काही मुलींचा पॅरडी पॉप ग्रुप होता. या ग्रुपचं नाव Les horrible cernettes होतं. हा एक कॉमेडी बँड होता. सर्न(CERN - European Organization for Nuclear Research) नावाची युरोपियन ऑटोमिक रिसर्च संस्था आहे. या संस्थेच्या काही माजी कर्मचाऱ्यांनी हा बँड सुरू केला होता.

स्वित्झर्लंडमधल्या जिनिव्हा इथं या सर्नचं कार्यालय आहे. या ऑफिसमध्ये सेक्रेटरी तसेच काही सायंटिस्टसच्या गर्लफ्रेंड असलेल्या या मुली होत्या. सिल्वानो डी गनारो या सर्नच्या कॉम्प्युटर विभागात ऍनालिस्ट असलेल्या गड्याने हा फोटो घेतला होता. त्याला त्यावेळी कदाचित माहीत देखील नसेल की हा फोटो इतिहास घडवणार आहे.

१९९२ साली वर्ल्ड वाईड वेबचा निर्माता टिम बर्नर्स ली, याने हा फोटो एडिट करून अपलोड करण्यापूर्वी gif म्हणून सेव्ह केला. अशा पद्धतीने हा फोटो इंटरनेटवर अपलोड झालेला पहिला फोटो बनला. त्यानंतर काय झाले हे तर सर्व जगानं पाह्यलंच आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह: आठ जणांना सुट्टी 10 कोरोनाबाधित रुग्णांची भर
WANICITY.COM
पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह: आठ जणांना सुट्टी 10 कोरोनाबाधित रुग्णांची भर

यवतमाळ, दि. 19 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात भरती असलेल्या आठ जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे आठही जण सुरवातीला पॉझेटिव्ह आले होते. उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात रविवारी दहा नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली.

आज (दि. 19) नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 10 जणांमध्ये सहा पुरुष आणि चार महिला आहेत. यात सर्वाधित आठ जण पुसद येथील आहेत. पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये पुसद शहरातील मधूकर नगर येथील एक पुरुष तसेच पुसद येथील चार पुरुष व तीन महिला, पांढरकवडा शहरातील मशीद वॉर्ड येथील एक पुरुष आणि आर्णि तालुक्यातील खेड येथील एका महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात शनिवारपर्यंत 157 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात आज (दि. 19) नवीन 10 पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने ही संख्या 167 वर पोहचली. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या आठ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 159 एवढी झाली आहे. यात विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतील चाचणीद्वारे 101 तर रॅपीड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आलेले 58 जण आहेत. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 558 झाली आहे. यापैकी 382 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 17 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 128 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी 84 नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने 9349 नमुने पाठविले असून यापैकी 9115 प्राप्त तर 234 अप्राप्त आहेत. जिल्ह्यात 8557 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
धक्कादायक..! गडचिरोलीत एकाच दिवशी राज्य राखीव दलाचे 72 जवान कोरोना पॉझिटिव्ह
WANICITY.COM
धक्कादायक..! गडचिरोलीत एकाच दिवशी राज्य राखीव दलाचे 72 जवान कोरोना पॉझिटिव्ह
गडचिरोली- जिल्ह्यात आज एकाच दिवशी राज्य राखीव दलाच्या 72 जवानांसह अन्य एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आजपर्यंतचा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा हा सर्वांत मोठा आकडा आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण 279 कोरोनाबाधितांमध्ये 205 रुग्ण हे पोलीस दलातील आहेत.
आज कोरोनाबाधित आढळलेले 72 जवान गडचिरोली येथे संस्थात्मक विलगीकरणात होते. तर पॉझिटिव्ह आढळलेला अन्य व्यक्ती हा मुंबईहून आलेला आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
राज्यातील शाळा ३ ऑगस्टपासून सुरू होणार – वडेट्टीवार
WANICITY.COM
राज्यातील शाळा ३ ऑगस्टपासून सुरू होणार – वडेट्टीवार
गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा ३ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांची आढावा बैठक घेतली, त्यात त्यांनी ही माहिती दिली. सध्याची स्थिती बघता ३ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात, तसेच शाळांना मास्क,सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीने पुरवाव्यात,असे निर्देशही त्यांनी दिले...
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1640
1641
1642
1643
1644
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर

Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल

Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा

Safari Share बटण खाली आहे