Warora News
लॉगिन
← मागे

बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Twitter पर हुआ साइबर हमला, कई जानी-मानी हस्तियों के ट्विटर अकाउंट हैक
WANICITY.COM
Twitter पर हुआ साइबर हमला, कई जानी-मानी हस्तियों के ट्विटर अकाउंट हैक
विश्व में तब अचानक हड़कंप मच गया जब अचानक कई बड़ी हस्तियों के हाई प्रोफाइल ट्विटर अकाउंट हैक कर लिए गए। इन हस्तियों के ट्विटर अकाउंट हैक करके बिटकॉइन की मांग की गई थी। हैकरों ने दुनिया के दिग्गज नेताओं, सेलेब्रिटी, मशहूर कारोबारी और कंपनियों के ट्विटर अकाउंट को हैक कर लिया है

माइक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर पर अब तक का सबसे बड़ा साइबर हमला हुआ है। अमेरिका सहित अन्य देशों के कई हाई प्रोफाइल ट्विटर अकाउंट हैक कर लिए गए। इसमें अमेरिकी नेता जो बिडन, टेसला के सीईओ एलन मस्क, माइक्रोसॉफ्ट के सहसंस्थापक बिल गेट्स और एपल के कई और अहम अकाउंट शामिल हैं।

ट्विटर हैंडल हैक करने के बाद इन अकाउंट से एक खास तरह के मैसेज पोस्ट किए गए। इनके अकाउंट से एक लिंक पोस्ट किया गया और बिटकॉइन मांगे गए। ट्विटर हैंडल हैक करके दावा किया गया कि लोगों को बिटकॉइन डबल करके वापस किए जाएंगे। पोस्ट किए जाने के चंद मिनट के भीतर ही ये ट्वीट डिलीट भी हो गए हैं।

हालांकि अभी तक यह पता नहीं चल पाया है कि आखिर किसने इन जानी-मानी हस्तियों के ट्विटर अकाउंटर को निशाना बनाया है वहीं, इस घटना के बाद ट्विटर ने कहा कि हमको ट्विटर अकाउंट हाईजैक होने की जानकारी है। फिलहाल हम मामले की जांच कर रहे हैं साथ ही इसको दुरुस्त करने के लिए कदम उठा रहे हैं।

हम जल्द ही सबको अपडेट देंगे। इसके अलावा ट्विटर के सीईओ जैक की ओर से भी ट्वीट कर कहा गया है कि हमारे लिए आज का दिन काफी मुश्किल भरा रहा है, जो हैकिंग हुई थी उसे अभी के लिए सुधार लिया गया है और आगे इसकी जांच जारी है।
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील सर्व १९ नमुन्यांचे अहवाल आले निगेटिव्ह, शहरविसीयांना मिळाला दिलासा !
WANICITY.COM
शहरातील सर्व १९ नमुन्यांचे अहवाल आले निगेटिव्ह, शहरविसीयांना मिळाला दिलासा !
प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात कोरोनाचा विळखा वाढत असतांनाच आज सहाव्या साखळीतील १९ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरवासीयांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या सर्वच नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे शोधकार्य सुरु असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या अठरा असून त्यापैकी ७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यःस्थितीत शहरातील ११ कोरोना बाधित रुग्णांवर यवतमाळ, नागपूर व सेवाग्राम येथे उपचार सुरु आहे. दरम्यान कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावर रोख लागावी म्हणून आज १५ जुलै पासून बाजारपेठेच्या वेळात बदल करण्यात येऊन सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत दुकाने खुली ठेवण्यासंदर्भात नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले. शहरातील वर्दळीवर नियंत्रण मिळविण्याकरिता बाजारपेठेची वेळ कमी करण्यात आली असली तरी १० ते २ या वेळात बाजारपेठेत चांगलीच वर्दळ दिसून आली. दोन वाजेपर्यंतची वेळ निर्धारित करण्यात आल्याने नागरिकांची खरेदीकरिता आणखीनच गर्दी दिसत होती. दुकाने बंद होण्याच्या काळजीने खरेदीकरिता त्यांची चांगलीच लगबग पाहायला मिळत होत. दुकाने बंद झाल्यानंतरही नागरिकांची रस्त्यांवर रेलचेल दिसून येत होती. शासनाने ७ वाजेपर्यंत वाढवलेली दुकानांची वेळ प्रशासनाने कोरोनाचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता पाच तासांनी कमी करून दुपारी २ वाजेपर्यंत निर्धारित केली आहे. तेच शहर, तीच बाजारपेठ व हीच जनता चार तास एकत्र वावरत असतांना ५ तास कमी केल्याने कोरोना कितपत नियंत्रणात राहील याकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. कोरोनाचे सतत रुग्ण आढळत असल्याने शहरवासियांमध्ये भीती निर्माण झाली असतांनाच प्रशासनही चिंतेत आले आहे. अशातच कोरोनाची रोखथाम करण्याकरिता कणखर नियोजनाची मागणी शहरातून होऊ लागली. कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता कडक निर्बंध लावण्याच्या जनतेच्या मागण्यांची दखल घेत पालकमंत्र्यांनी जील्हाधिकारी दालनात सर्वपक्षीय आमदारांची बैठक बोलावून प्रत्येक तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्या करीता कोणते नियोजन करता येईल याविषयी चर्चा करण्यात आली. काही तालुक्यात तर जनता कर्फ्यू सुरु आहे. मग उरलेल्या तालुक्यांमध्ये बाजारपेठांच्या वेळांचे तास कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार उर्वरित तालुक्यांमध्ये १० ते २ पर्यंत बाजारपेठेची वेळ निर्धारित करण्यात आली. त्यामुळे शहरातील वर्दळ कमी होऊन लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी होईल ही या निर्णयामागची अपेक्षा आहे. त्यानंतर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कोणत्या प्रकारचे निर्बंध लावता येतील याकडेही लक्ष देणे गरजेचे राहणार असून मौज मजेकरिता बाजारात फ़िरणाऱ्यांमुळे अनावश्यक गर्दी निर्माण होणार नाही याचीही दक्षता घ्यावी लागणार आहे. शेवटी शहरातुन कोरोनाला हद्दपार करण्याकरिता सर्वांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता असून हे एक टीमवर्क असल्याने सर्वांनीच आपापली जबाबदारी पार पडण्याची आवश्यकता आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर
WANICITY.COM
बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर
राज्य शिक्षण बोर्डाच्यावतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (१६ जुलै) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे, बोर्डाने बुधवारी ही घोषणा केली.

मंडळाच्या या अधिकृत वेबसाइटवर होणार निकाल जाहीर

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.ord

www.maharashtraeducation.com

www.mahresult.nic.in या वेबसाईटवर विद्यार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर आकडेवारी देखील उपलब्ध होईल. त्याचबरोबर www.mahahsscboard.in या वेबसाईटवर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होतील.

ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून बारावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषय़ांव्यतिरिक्त) गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे http://verifiation.mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाईटवरुन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

गुणपडताळणी आणि छायाप्रतींसाठी या तारखेपर्यंत अर्ज करता येणार

गुणपडताळणीसाठी शुक्रवार, १७ जुलै २०२० ते सोमवार, २७ जुलै २०२० पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

छायाप्रतीसाठी शुक्रवार, १७ जुलै २०२० ते बुधवार, ०५ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.

त्यासाठी ऑनलाइन स्वरुपातच शुल्कही भरता येईल.

लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा, चर्मकार संघटनांची मागणी !
WANICITY.COM
आंबेडकरी चळवळीच्या अस्मितेची तोडफोड करणाऱ्यांवर कडक कार्यवाही करा, चर्मकार संघटनांची मागणी !
प्रशांत चंदनखडे वणी :-

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह या निवास्थानावर ७ जुलैला समाजकंठकांनी तोडफोड केल्याच्या घटनेचा निषेध करून मौल्यवान वस्तूंची तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी व संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच चर्मकार समाजातील चप्पल व गटई कारागिरांना आर्थिक मदत देण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर दोन समाजकंठकांनी दगडफेक करून सीसीटीव्ही, खिडक्यांच्या काचा, कुंड्या व इतर मौल्यवान वस्तूंची तोडफोड केली. यात घरातील मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान त्यांनी पुस्तकांसाठी बांधले होते. जगभऱ्यातील आंबेडकरी अनुयायांचे ते प्रेरणास्थान असून त्याठिकाणी असंख्य अनुयायी भेटी देत असतात. अशा या प्रेरणादायी वास्तूची तोडफोड झाल्याने आंबेडकरी चळवळीवर प्रेम करणाऱ्या निष्ठावंत व्यक्तींच्या भावना दुखावल्या आहेत. ही अतिशय खेदजनक घटना असून बाबासाहेबांच्या विचारांची प्रताडना करणारी ही घटना आहे. त्यांच्या विचारांशी सांगड घालणाऱ्या बहुजन समाजाची मने दुखावणारी ही घटना आहे. राजगृहावर झालेली तोडफोड ही केवळ राजगृहावरील तोडफोड नसून वैचारिक दृष्टीकोन जोपासणाऱ्या प्रत्येक आंबेडकरी चळवळीची मोडतोड करण्याचा प्रयत्न आहे. अशा या निंदनीय घटनेचा चर्मकार संघटना निषेद करीत असून यातील दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करत आहे. त्याचप्रमाणे लॉकडाऊन काळात बंदचा फटका बसलेल्या चर्मकार समाजातील चप्पल व गटई कारागीरांना त्यांचा उदरनिर्वाह चालविण्याकरिता तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणीही चर्मकार संघटनांतर्फे उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील बाजारपेठे करिता सुधारित वेळापत्रक जाहीर, १० ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील दुकाने !
WANICITY.COM
शहरातील बाजारपेठे करिता सुधारित वेळापत्रक जाहीर, १० ते २ वाजेपर्यंत सुरु राहतील दुकाने !
प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोना संक्रमणाची गती तीव्र झाल्याने दिवसागणिक कोरोना बाधित रुग्ण आढळत असून बाधितांची संख्या उचांक गाठु लागली आहे. या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्याकरिता शहरात घ्यावयाच्या खबरदारी संदर्भात पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी दालनात सर्व पक्षीय आमदारांची कोरोना नियोजना संदर्भात आढावा बैठक बोलावून सर्वच विधानसभा क्षेत्रातील कोरोना विषयक परिस्थिती जाणून घेतांना झालेल्या चर्चेतून शहरातील बाजारपेठेचा वेळ कमी करून सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यावर शिक्का मोहर्तब झाल्याने आज तशा सूचना प्रशासना तर्फे व्यासायिकांना देण्यात आल्या आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालकमंत्र्यांनी १३ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व पक्षीय आमदारांची आढावा बैठक बोलावून प्रत्येक तालुक्यातील कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वांनी आपापल्या सूचना मांडल्यानंतर शहरातील वर्दळीवर अंकुश लावण्याकरिता बाजारपेठेचा निर्धारित वेळ कमी करून १० ते २ हे सुधारित वेळापत्रक शहराकरिता जाहीर करण्यात आले आहे. मेडिकल व दवाखाने नियमित वेळेनुसार सुरु राहील तसेच कृषी केंद्रांना सकाळी १० ते साय. ५ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. बँकेचे व्यवहारही १० ते २ या वेळातच सुरु राहतील. फिरत्या दूध विक्रेत्यांना सकाळी ७ ते दुपारी २ व साय. ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूध वाटप करता येईल. पेट्रोलपंपही सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार असून अत्यावश्यक सेवेतील वाहनांकरिता २४ तास सेवा देता येईल. मॉर्निंगवॉक, व्यायाम व सायकलिंग करीता सकाळी ६ ते ८ हि वेळ देण्यात आली आहे. गॅस सिलेंडर डिलिव्हरी बॉय व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी केंव्हाही जाण्यास मुभा देण्यात आली असून त्यांच्या जवळ संबंधित कार्यालयाचे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. या अस्थापनांव्यतेरिक्त सम्पुर्ण बाजारपेठ ही १० ते २ या सुधारित वेळे नुसार सुरु राहील. ठरवून दिलेल्या वेळेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासना तर्फे कळविण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
चंद्रपूर शहरात 17 ते 20 पर्यंत लॉकडाऊन
WANICITY.COM
चंद्रपूर शहरात 17 ते 20 पर्यंत लॉकडाऊन
Homeचंद्रपूरचंद्रपूर शहरात 17 ते 20 पर्यंत लॉकडाऊन
चंद्रपूर शहरात 17 ते 20 पर्यंत लॉकडाऊन
Manohar Dothpelli July 14, 2020

लग्न व समारंभावर बंधने आणण्यात येणार;
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांची माहिती

ग्रामीण भागातील नागरिकांनी 17 ते 20 जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये

चंद्रपूर,दि.14 जुलै: शहरांमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, येत्या 17 जुलै ते 20 जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्ण टाळेबंदी (लॉकडाऊन) केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असतील.ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातीत उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी 17 ते 20 जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये, चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.
आजच्या व्हिडिओ संदेशाच्याद्वारे बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणात राहणे बंधनकारक आहे. नागरिकांनी माहिती लपविल्यास तसेच प्रशासकीय कामात अडथळा आणल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक असल्यास बाहेर पडावे. मास्कचा वापर अनिवार्य असून योग्य पद्धतीने मास्क वापरले जावे. तसेच दैनंदिन काम करीत असतांना सुरक्षित अंतर ठेवून काम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यामध्ये लग्न समारंभामुळे बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लग्न व समारंभ करण्यासाठी अनेक बंधने टाकली जातील असे त्यांनी स्पष्ट केले.नागरिकांनी लग्न व अन्य समारंभाचे आयोजन काही काळासाठी पुढे ढकलावे असे आवाहनही त्यांनी केले.

चेक पोस्टवर तपासणी आणखी कठोर करण्यात आली आहे. तपासणीच्या वेळेस नाव, मोबाईल नंबर, पत्ता देणे अनिवार्य असणार आहे. जिल्ह्यामध्ये बाधितांवर योग्य उपचार केले जात असून सर्व वैद्यकीय सोयी सुविधा कोविड केअर सेंटर मध्ये पुरविल्या जात आहे.
जिल्ह्यात एकही बाधितांचा मृत्यू झालेला नाही ही बाब समाधानाची आहे. लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य विभागाला माहिती देऊन तपासणी करणे गरजेचे आहे.कोणतीही अडचण,तक्रार व माहिती द्यायची असल्यास टोल फ्रि क्रमांक 1077 किंवा 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आदिवासी समाजातील महिलेवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करा, आमदार भीमराव केराम यांचे निर्देश
WANICITY.COM
आदिवासी समाजातील महिलेवर झालेल्या अत्याचाराची चौकशी करा, आमदार भीमराव केराम यांचे निर्देश
प्रशांत चंदनखेडे वणी :-

पांढरकवडा तालुक्यातील गवराई (पोड) या गावातील अनुसूचित जमातीच्या महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणाची शीघ्र चौकशी करून आरोपीला तत्काळ अटक करावी तसेच त्याच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा व महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश किनवट माहूर विधानसभा क्षेत्राचे आमदार भीमराव केराम यांनी पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना ऑनलाईन पाठवलेल्या पत्रातून दिले आहेत.

कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन सुरु असून या काळात अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील महिला पुरुषांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली असून काही सदन समाजातील गुंड प्रवृत्तीचे लोक जातीयवादी मानसिकतेतून या प्रवर्गातील व्यक्तींवर अमानुष अत्याचार करीत आहे. कधी राजकीय वर्चस्वाचा आधार घेत तर कधी प्रतिष्ठेच्या गर्वात आंधळे होऊन हे असामाजिक प्रवृत्तीचे लोक दुबळ्या लोकांवर अत्याचार करीत असल्याने समाजात दुही निर्माण होत आहे. आदिवासी समाजातील महिला पुरुषांवर अत्याचार करून ते आपली सामाजिक प्रतिष्ठा गाजवतांना दिसत आहे. स्वतःच्या शेतशिवारात काम करणाऱ्या गवराई (पोड) येथील महिलेला तिच्याच शिवारात जाऊन तिचा विनयभंग करीत तिला ओढाताण करून अमानुष अत्याचार करणाऱ्या जातीयवादी मानसिकतेच्या सुमित अजय दोडके नामक व्यक्तीला तत्काळ अटक करण्यासंदर्भातील निर्देश आमदार भीमराव केराम यांनी यवतमाळ पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांना ऑनलाईन पाठवलेल्या पत्रातून दिले आहेत. या संदर्भात काही आदिवासी संघटनांनी आमदार केराम यांना निवेदने देऊन या प्रकरणातील आरोपीला अटक करून अट्रोसिटी दाखल करण्याची मागणी केली होती. पांढरकवडा तालुक्यातील गवराई (पोड) या अतिदुर्गम भागातील कोलाम आदिवासी समाजातील ही महिला शेतात काम करीत असतांना पांढरकवडा येथील सृजन संस्थाचालकाचा मुलगा सुमित अजय दोडके याने तिच्या शेतात जाऊन तिचा विनयभंग करीत तिला मारहाण केली. तसेच स्वतःच्या ताक्तीचे प्रदर्शन करीत आदिवासी समाजामध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करून स्वतः विरोधात तक्रार करण्याचे खुले आव्हान दिले. नेमकी हीच परिस्थिती त्या महिलेवर ओढवली आहे. तिची कैफियत कुणीही ऐकायला तयार नसून तिची साधी तक्रारही नोंदविल्या गेली नाही. महिलेची सारखी पोलीस स्टेशन मध्ये पायपीट सुरु असून तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्याकरिता या प्रकरणाकडे जातीने लक्ष घालून प्रकरणाची शीघ्र चौकशी करून आरोपीला तत्काळ अटक करावी तसेच त्याच्यावर अट्रोसिटी अंतर्गत कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार भीमराव केराम यांनी पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या पत्रातून दिले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जिल्ह्यात आज १४ जणांना कोरोनाची लागण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’झालेल्या २५ जणांना डिस्चार्ज ; अॅटिव्ह पॉझिटिव्ह संख्या १३९
WANICITY.COM
जिल्ह्यात आज १४ जणांना कोरोनाची लागण ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’झालेल्या २५ जणांना डिस्चार्ज ; अॅटिव्ह पॉझिटिव्...

यवतमाळ, :
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतांनाच मंगळवारी २५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ ठरलेल्या या २५ जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुट्टी देण्यात आल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर जिल्ह्यात आज नव्याने १४ पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. यापैकी आठ जणांचे नमुने प्रयोगशाळेत तर सहा जण रॅपिड ॲन्टीजन टेस्टद्वारे पॉझेटिव्ह आले आहेत.

आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या १४ नागरिकांमध्ये नऊ पुरुष आणि पाच महिला आहेत. यात पुसद शहरातील संभाजी नगर येथील एक महिला, राम नगर येथील एक पुरुष, रहमत नगर येथील दोन पुरुष, शांती नगर येथील एक महिला, उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील एक महिला, उमरखेड येथील एक महिला, घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील एक पुरुष, यवतमाळ शहरातील एकविरा चौक येथील एक पुरुष, यवतमाळ येथील एक पुरुष, दिग्रस येथील दोन पुरुष आणि दारव्हा येथील एक पुरुष व एक महिला पॉझेटिव्ह आहे.

जिल्ह्यात कालपर्यंत (दि.१४) १५० ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह होते. यात मंगळवारी १४ नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने हा आकडा १६४ झाला होता. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या २५ जणांना सुट्टी झाल्यामुळे सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या १३९ झाली आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ४७६ आहे. यापैकी ३२४ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत 13 मृत्युची नोंद आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने मंगळवारी ७५ नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत महाविद्यालयाने ७१९९ नमुने पाठविले असून यापैकी ७१५६ प्राप्त तर ४३ अप्राप्त आहेत. जिल्ह्यात ६६८० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोनाला वाढू देण्यास नका देऊ संधी, लागू कराना साहेब आता तरी संचारबंदी !
WANICITY.COM
कोरोनाला वाढू देण्यास नका देऊ संधी, लागू कराना साहेब आता तरी संचारबंदी !
प्रशांत चंदनखेडे वणी :-

कोरोनाच्या वाढत्या संक्रमनानं शहर हादरून गेलं आहे. एक एक म्हणता १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद शहरात झाली आहे. प्रत्येक दिवस कोरोनाची दहशत घेऊन उगवतो आहे व दहशतीतच मावळतो आहे. कोरोनाचं जाळं पसरतंच चाललंय तुटाचं नाव घेत नाही. एकामागून एक साखळ्या तयार होत आहेत. परिसर सील होत आहेत. एकाची बाधा दुसऱ्याला होत आहे. नियोजन दुबळं पडत आहे, आणखी कोणतं प्रायोजन करावं प्रशासन चिंतीत आहे, उद्या कोण पॉझिटिव्ह निघेल जनतेत धास्ती आहे, शहरात फक्त नी फक्त कोरोनाचीच चालती आहे. निवळेलं का ही साथ, घेता येईल का मोकळा श्वास जनता आता विचारात आहे, की होत राहील अशीच आकड्यांचीच बेरीज प्रश्न त्यांना पडत आहे. रुग्ण होते सात तेंव्हा जनता कर्फ्यू लावू म्हणे, एक दिवस लागला कर्फ्यू, वाद त्यांचे होते जुने, जनता होती राजी पण आडवी आली राजकारणे. कोरोनाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे, प्रशासनावरील तान वाढू लागला आहे. प्रतिबंधित क्षेत्र वाढून सहा झाली आहे. आरोग्य विभागही चिंतेत पडला आहे, एकीकडे शिवायला गेलं की दुसरीकडे उसवत असल्याने त्यांचीही चांगलीच भंबेरी उडत आहे. आशासेविकांच्या पायात पडघम पडले आहेत, संवेदनशील परिसरातील नागरिकांची तपासणी करणे त्यांचे डेली रुटिंग झाले आहे. कंटेन्टमेंट झोन वाढतच असल्याने त्यांची पायपिटही वाढत आहे. कोरोना सोबत जगण्याची त्यांनी मानसिकता तयार केली असली तरी शहर कोरोनमुक्त करण्याचे धेय्य त्यांनी उराशी बाळगले आहे. शहरातील प्रत्येक व्यक्तीला शहर कोरोना मुक्त व्हावे असे वाटत असतांना राजकारणी दिलजमाई का करून घेत नाही हा एकच प्रश्न नागरिकांच्या जहानात बसला आहे. कोरोनाचे राजकारण न करता कोरोनावर मात करण्या करीता राजकारण्यांनी एकत्र यावे हीच अपेक्षा जनतेमधून व्यक्त होत आहे. २९ जून ते ३ जुलै पर्यंत लागू करण्यात आलेला जनता कर्फ्यू राजकारणाला बळी चढला. शहरातील सर्वच स्तरातील नागरिकांनी स्वयंम निर्णय घेत जनहिताकरिता पुकारलेल्या जनता कर्फ्यूला राजकारणाचा रंग दिल्या गेल्याने एकाच दिवसात तो मागे घेण्याची नामुश्की आयोजकांवर आली. आणी ४ जुलैलाच कोरोनाची नवीन साखळी तयार झाली. आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ वर येऊन ठेपली आहे. "साहेब आता तरी शहरात जनता कर्फ्यू लावता का हो" अशी अहार्त हाक जनतेमधुन ऐकायला मिळत आहे.

जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात जनता कर्फ्यू लावण्यात आला व त्याचे काटेकोरपणे पालनही करण्यात आले. पांढरकवड्यामध्ये जेमतेम दोन रुग्ण आढळले असतांनाही जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. याठिकाणीही व्यावसायिक बाजारपेठ आहे. त्यांनीही लॉकडाऊनचे चटके सहन केले आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये तर १५ ते २० दिवसांपासून जनता कर्फ्यू सुरु आहे. तेथील नागरिकांचेही व्यवसाय उद्योग आहेत. केवळ वणी शहरातील व्यवसायांवरच अवकळा आली असे नाही प्रत्येकचं तालुक्यातील व्यवसायांना बंदचा फटका बसला आहे. तरीही इतर तालुक्यातील पुढाऱ्यांनी जणता कर्फ्यूला पाठिंबा दर्शवित ठरविलेल्या दिवसात कडकडीत बंद पाळला. वणी शहर याला अपवाद ठरले असून बंद मुळे व्यवसाय बाधित होईल या कारणास्तव नागरिक कोरोना बाधित झाले तरी पर्वा न करण्याचे पुढाऱ्यांनी ठामपणे ठरविले असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. पुढाऱ्यांच्या दुमताने प्रशासनही चिंतेत पडले असून त्यांनाही उपाययोजना करण्यास मोकळीक मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात आता "कोणता झेंडा घेऊ हाती" ही परिस्थिती निर्माण झाली असून राजकारणाच्या डावपेचात जनता विनाकारण पिसली जात आहे. शहर कोरोनामुक्त करण्याकरिता आधी कोरोनाची साखळी तोडने आवश्यक असून त्याकरिता शहरातील वर्दळ व दुकानांसमोरील रांगावर नियंत्रण मिळविने गरजेचे आहे. आणि त्याकरिताच जनता कर्फ्यू लागू करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे शहरात उघडपणे बोलल्या जात आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
‘गुगल’ची भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक
BLOG.GOOGLE
‘गुगल’ची भारतात ७५ हजार कोटींची गुंतवणूक
भारतीय डिजिटायझेशन फंडमध्ये गुगल जवळपास ७५ हजार कोटी रुपये म्हणजेच १० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. गुगल इंडियाचा वार्षिक कार्यक्रम ऑनलाइन पार पडला. यावेळी बोलताना गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी घोषणा केली की, पुढच्या ५-७ वर्षात गुगलकडून भारतात विविध क्षेत्रात १० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल. विशेष म्हणजे सोमवारी सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुंदर पिचई यांची व्हर्च्युअल बैठक झाली होती.

प्रत्येक भारतीयाला त्याच्या मातृभाषेत तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी गुगल काम करणार आहे. हिंदी, मराठी, तमिळ, पंजाबी अशा सर्व भाषांमध्ये गुगलकडून तंत्रज्ञान उपलब्ध करुन दिले जाईल. भारताच्या अत्यंत महत्त्वाच्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने आणि सेवा गुगलकडून तयार केले जातील. डिजिटल बदलावर भर असल्याने यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आरोग्य, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रातील सामाजिक कामांसाठी तंत्रज्ञान आणि आर्टिफिशिअल इंटिलिजन्सचा वापर केला जाईल.

भारतात आणि संपूर्ण जगात सध्या प्रत्येक जण अडचणीचा सामना करतोय याबाबत दुमत नाही. आपलं आरोग्य आणि आपली अर्थव्यवस्था यासमोरील दुहेरी आव्हानाने आपण कसे काम करतो आणि कसे जगतो यावर पुनर्विचार करायला भाग पाडले आहे. पण वेळेची आव्हानेच अनेकदा संधी म्हणून पुढे येतात. भारताने नाविन्यतेच्या लाटेचा फायदा करुन घ्यावा एवढेच आमचे ध्येय नाही, तर भारताने याचे नेतृत्त्व करावे, अशी प्रतिक्रिया सुंदर पिचई यांनी दिली.

भारतामध्ये वेगवेगळे प्रयोग सुरु असून त्याला इतर जगालाही फायदा होऊ शकतो. मात्र भारताचा डिजीटल प्रवास अद्यापही सुरुच आहे. अजूनही भारतामधील लाखो लोक स्वस्त इंटरनेटच्या सेवेपासून दूर आहेत. सर्वांसाठी व्हॉइस इनपूटची सेवा उपलब्ध करुन देण्यापासून ते सर्व भारतीय भाषांमध्ये कंप्युटींगचा पर्याय उपलब्ध करुन देण्यापर्यंत अनेक कामे बाकी आहेत. नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी याची गरज आहे. म्हणून आम्ही मागील काही वर्षांपासून वेगवगेळ्या माध्यमातून भारतामध्ये गुंतवणूक केली आहे, असे पिचई म्हणाले आहेत.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सावरला गावा जवळ केमिकल भरलेला ट्रक पल्टी
WANICITY.COM
सावरला गावा जवळ केमिकल भरलेला ट्रक पल्टी
प्रशांत चंदनखेडे वणी :-

नागपूर येथून शहरातील कोळसा खदाणींमध्ये ब्लास्टिंग करण्याकरिता वापरले जाणारे केमीकल घेऊन येणारा ट्रक सावरला टर्निंगवर पलटी झाल्याने ट्रक मधील केमिकल वाहून गेले असून ट्रक चालक किरकोळ जख्मी जाला आहे. रोडवरच ट्रक पलटी झाल्याने वणी वरोरा रोडवरील वाहतूक खोळंबली असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. सदर घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने ट्रक उचलण्याचे काम सुरु आहेत. पोलीस घटना स्थळावर हजर असून वाहणांना रस्त्याच्या कडेला रांगेत उभे केल्या जात आहे. अपघातामुळे दोन तासांपासून वणी वरोरा मार्ग बंद असल्याने वेळेत मालाची डिलेव्हरी पोहचती न होऊ शकल्याने वाहतूकदार चिंताग्रस्त दिसत होते.

नागपूरवरून शहरातील कोळसा खदानींमध्ये ब्लास्टिंग करीता वापरले जाणारे केमिकल घेऊन येणारा ट्रक क्रमांक MH ४० BG २५४२ सावरला टर्निंग जवळ पलटी झाल्याने त्यातील केमिकल वाहून गेले आहे. रस्त्यावरच ट्रक पलटी झाल्याने वणी वरोरा रोवरील वाहतुक पूर्णतः खोळंबली असून रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. ट्रकला रोडवरून बाजूला करण्याचे काम सुरु असून पोलीस घटना स्थळी तळ ठोकून आहे. दोन तासांपासून ट्रक उचलण्याचे काम सुरु असून वाहतुकीचा पार खोळंबा झाला आहे.

लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
सावरला गावा जवळ केमिकल भरलेला ट्रक पल्टी
WANICITY.COM
सावरला गावा जवळ केमिकल भरलेला ट्रक पल्टी
प्रशांत चंदनखेडे वणी :-

नागपूर येथून शहरातील कोळसा खदाणींमध्ये ब्लास्टिंग करण्याकरिता वापरले जाणारे केमीकल घेऊन येणारा ट्रक सावरला टर्निंगवर पलटी झाल्याने ट्रक मधील केमिकल वाहून गेले असून ट्रक चालक किरकोळ जख्मी जाला आहे. रोडवरच ट्रक पलटी झाल्याने वणी वरोरा रोडवरील वाहतूक खोळंबली असून रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. सदर घटना दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून जेसीबी व क्रेनच्या साहाय्याने ट्रक उचलण्याचे काम सुरु आहेत. पोलीस घटना स्थळावर हजर असून वाहणांना रस्त्याच्या कडेला रांगेत उभे केल्या जात आहे. अपघातामुळे दोन तासांपासून वणी वरोरा मार्ग बंद असल्याने वेळेत मालाची डिलेव्हरी पोहचती न होऊ शकल्याने वाहतूकदार चिंताग्रस्त दिसत होते.

नागपूरवरून शहरातील कोळसा खदानींमध्ये ब्लास्टिंग करीता वापरले जाणारे केमिकल घेऊन येणारा ट्रक क्रमांक MH ४० BG २५४२ सावरला टर्निंग जवळ पलटी झाल्याने त्यातील केमिकल वाहून गेले आहे. रस्त्यावरच ट्रक पलटी झाल्याने वणी वरोरा रोवरील वाहतुक पूर्णतः खोळंबली असून रस्त्यावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. ट्रकला रोडवरून बाजूला करण्याचे काम सुरु असून पोलीस घटना स्थळी तळ ठोकून आहे. दोन तासांपासून ट्रक उचलण्याचे काम सुरु असून वाहतुकीचा पार खोळंबा झाला आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरात आणखी तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली अठरा !
WANICITY.COM
शहरात आणखी तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली अठरा !
प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून आज आणखी ३ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या आता १८ झाली आहे. पॉझिटिव्ह निघालेले तीनही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्र सहा मधील बाधित महिलेच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पळसोनी येथील कोविड केंद्रातून त्यांना यवतमाळ येथे पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. शहरात दिवसा गणिक कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासन चांगलेच चिंतेत आले आहे. आज १० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ७ व्यक्ती निगेटिव्ह तर ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांचा आलेख वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १८ वर पोहचला आहे. ७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून निव्वळ बाधित रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे.

शहरात काल १२ जुलैला प्रतिबंधित क्षेत्र पाच मधील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनावरील तान वाढला असून शहरवासियांमधील भीतीही चांगलीच वाढली आहे. एकामागून एक पॉझिटिव्ह रुग्ण निघत असल्याने आरोग्य प्रशासन चांगलेच हादरले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सोयी सुविधा पुरवितांना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. संशयितांचे लोकेशन ट्रेस करून जास्तीत जास्त व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वणी भेटी दरम्यान दिल्या होत्या. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील अधिकाधिक व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान लवकर लागत आहे. शहर प्रशासन व आरोग्य प्रशासनाची प्रतिबंधित क्षेत्रावर करडी नजर असून तेथील नागरिकांची योग्य ती दक्षता घेतली जात आहे. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्याकरीता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरात आणखी तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली अठरा !
WANICITY.COM
शहरात आणखी तीन व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली अठरा !
प्रशांत चंदनखेडे वणी :-

शहरात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत असून आज आणखी ३ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या आता १८ झाली आहे. पॉझिटिव्ह निघालेले तीनही व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्र सहा मधील बाधित महिलेच्या संपर्कातील असल्याचे सांगण्यात येत आहे. पळसोनी येथील कोविड केंद्रातून त्यांना यवतमाळ येथे पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. शहरात दिवसा गणिक कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासन चांगलेच चिंतेत आले आहे. आज १० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ७ व्यक्ती निगेटिव्ह तर ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना बाधित रुग्णांचा आलेख वाढत असून पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा १८ वर पोहचला आहे. ७ रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले असून निव्वळ बाधित रुग्णांची संख्या आता ११ झाली आहे.

शहरात काल १२ जुलैला प्रतिबंधित क्षेत्र पाच मधील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनावरील तान वाढला असून शहरवासियांमधील भीतीही चांगलीच वाढली आहे. एकामागून एक पॉझिटिव्ह रुग्ण निघत असल्याने आरोग्य प्रशासन चांगलेच हादरले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सोयी सुविधा पुरवितांना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. संशयितांचे लोकेशन ट्रेस करून जास्तीत जास्त व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी वणी भेटी दरम्यान दिल्या होत्या. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील अधिकाधिक व्यक्तींचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात येत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांचे निदान लवकर लागत आहे. शहर प्रशासन व आरोग्य प्रशासनाची प्रतिबंधित क्षेत्रावर करडी नजर असून तेथील नागरिकांची योग्य ती दक्षता घेतली जात आहे. प्रशासन कोरोनाची साखळी तोडण्याकरीता शर्थीचे प्रयत्न करीत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आव्हान केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago

बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील आणखी एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या झाली पंधरा!
WANICITY.COM
शहरातील आणखी एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या झाली पंधरा!
प्रशांत चंदनखेडे वणी :-
शहरात कोरोनाचे संक्रमण वाढत असून आज आणखी एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या आता 15 झाली आहे. सात रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामूळे शहरातील ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 8 झाली आहे. पॉझिटीव्ह महिलेला पुढील उपचारा करीता यवतमाळ येथे पाठविण्यात आलेआहे. शहरात मागिल काही दिवसांत एका मागून एक कोरोना बाधित रुग्ण आढळत असल्याने प्रशासनावरील तान चांगलाच वाढला असून शहरवासीयांमध्येही कमालीची भिती निर्माण झाली आहे. 10 जूनला दोन व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह निघाल्या नंतर आज आणखी एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने शहरात कोरोना संक्रमणचा वेग वाढला असल्याचे जाणवत आहे. 22 जूनला पहिली कोरोना साखळी निर्माण झाल्या नंतर शहरात कोरोनाचे संक्रमण वाढून आज कोरोनाच्या सहा साखळ्या तयार झाल्या आहेत. कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत असून बाधितांचा आकडा 15 वर पोहचला आहे. शहरात कोरोनचा विळखा वाढत असल्याने प्रशासनही चिंतेत आले आहे. शहरातील कोरोनाच्या वाढत्त्या संक्रमनाणे एकीकडे प्रशासन हादरले आहे तर दुसरीकडे शहरवासीयांमध्ये चांगलीच भिती निर्माण झाली आहे. प्रशासन योग्य त्या उपाययोजना करीत असून नागरिकांनाही सतर्क राहण्याचेआव्हान करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1642
1643
1644
1645
1646
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर

Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल

Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा

Safari Share बटण खाली आहे