Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
म.आसिफ शेख आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्काराने सन्मानित होणार...
WANICITY.COM
म.आसिफ शेख आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्काराने सन्मानित होणार...
. <p>पुरस्कार जाहिर :- पत्रकारिता क्षेत्रातील विविध कार्याची दखल..... <p>वणी : सुरज चाटे <p> न्युज मिडीया पत्रकार असोसिएशन चे अध्यक्ष <p>म.आसीफ शरीफ शेख हे गेल्या 20 वर्षा पासुन पञकारीता क्षेत्रात आहे. यात त्यांचे सतत अतुलनीय कार्य सुरु आहे. या काळात सा.विदेशी चंडिका, सा.नुमाईदगी, दै.देशोन्नती, दै. मतदार तसेच दै. लोकमत समाचार व दैनिक लोकमत या वृत्तपत्रात त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या लेखणीतून जनतेची भूमिका न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने मांडली आहे. याच कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्काराकरिता वरणी लागली आहे. <p> आसिफभाई यांना नागपुर ईथे महाराष्ट्र पञकार गौरव पुरस्कार २०१४, माहाराष्ट्र पञकार भुषन गौरव पुरस्कार २०१६, लोकमत तर्फे नागपूर येथे पुरस्कार २०१७-२०१८, देशोन्नती तर्फे २००६- २००७ जिल्ह्यातील वुत्त संकलन, व २००७ -२००८ मध्ये जिल्हात व्रुत्त संकलन पुरस्कार, २००८-२००९ मध्ये अमरावती विभागात सर्वात जास्त वृत्त संकलन केल्याने त्याना पुरस्कार अकोला येथे दैनिक देशोन्नती चे चीफ एडिटर प्रकाश पोहरे यांचे हस्ते देऊन सत्कार करण्यात आले, प्रेस वेल्फेयर असोसिएशन वणी तर्फे २०१५ रोजी समस्या बदल लिखाना केल्या ने सन्मान, सामाजिक सेवे मध्ये ऊत्कृष्ट कार्याबद्दल २०१९ रोजी सत्कार नागपुर येथे झाला, सच्चर समिती आंदोलना मध्ये व्रुत्त संकलन २००८ स्मुतीचीन्ह व प्रशस्ती पञ, भारतीय मुस्लीम परिषद तफे २००७ समाजाला जागृत केल्या बदल सन्मान पञ, ६ वें अ.भा.मुस्लिम बहुजन बहुभाषिक साहित्य संमेलनात सन्मान पञ, २००५-२००७ रोजी सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मध्ये सहकार्य केल्या बद्दल सन्मानपञ, २००५ मध्ये भष्ट्राचार निर्मुलन समीती( अन्ना हजारे प्रेरीत)समाजीक कामे केली, वणी पोलीस स्टेशन तर्फे दुर्गा ऊत्सव समिती मध्ये कार्य ऊत्कुष्ठ सवेक्शन केल्या बद्दल २०१० रोजी गौरव चिन्ह व सत्कार प्रशस्तीपत्र देऊन सत्कार, राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे गणेश व दुगाऊत्सव मध्ये परीक्शन केल्या बदल २०१२ रोजी प्रशस्तीपत्र व गैरव चिन्ह प्रदान केले. यानी आपल्या लेखानातुन शहराच्या अनेक समस्या मांडल्या, यासोबतच यानी सामाजिक क्षेञामध्ये कामे करून गोर गरीब, निराधार महिला, शेतकरी, <p> आदिवासी, दलीत, अल्पसंख्याक यांच्या तळागाळातील समस्या त्यांनी आपल्या लेखणीद्वारे मांडल्या आहेत. या सर्व कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन 2020 मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मानकरी निवड करण्यात आली असुन त्यांना लवकरच राज्यस्तरीय आदर्श पत्रकार दर्पणरत्न पुरस्कार 2020 प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराकरीता निवड झाल्याबद्दल म.आसिफ शेख यांचे सर्वत्र कौतुक होत असुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोल इंडियाच्या खाजगीकारणा विरोधात कोळसा मजूर संघटनांनी पुकारला संप
WANICITY.COM
कोल इंडियाच्या खाजगीकारणा विरोधात कोळसा मजूर संघटनांनी पुकारला संप
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>कोळसा खदानींचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात कोळसा मजूर संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपात वेकोली वणी नॉर्थ क्षेत्रातील पाचही संघटना सहभागी झाल्या असून २ जून ते ४ जून पर्यंत खदानींमधील कामे बंद राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे. वेकोलिच्या एचएमएस, आयटक, बीएएमएस, इंटक व सिटू या मजूर संघटनांनी एकत्रित येऊन संयुक्त मोर्चा वणी नॉर्थ क्षेत्र हे संघटन उभारून या संपात सहभाग दर्शविला आहे. <p>केंद्र शासनाने कोळसा खदानींचे खाजगीकरण करण्याचे धोरण अवलंबिले असून यासंदर्भात ३० जूनला कोळसा मंत्रालयाच्या सचिवांसोबत चार कोळसा मजूर संघटनांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. या बैठकीत बीएमएस, एचएमएस, एआईटीयू, व सीआईटीयू या चार संघटना सहभागी झाल्या. केंद्रीय ट्रेड युनियनतर्फे बी.के. रॉय, रमेन्द्र कुमार, नाथूलाल पाण्डेय व रामानंद यांनी कोळसा मंत्रालयातील सचिवांशी कोळसा खदानींच्या करण्यात येत असलेल्या खाजगी करणाबाबत चर्चा केली. यामध्ये सचिवांनी केंद्र शासनाच्या बाजूने एकतर्फा युक्तिवाद करून २०१४ पासून निरंतर कोळशाच्या आयातीत वाढ होत असल्याचे कारण पुढे केले. परंतु संघटनांनी या आधीही खाजगीकरणाचा प्रयत्न झाला असल्याचे सांगतानाच शासनाचे कमर्शियल कोल उत्खनन करण्याचे उद्दिष्ट कधीच सफल होणार नसल्याचे सांगितले. १९७३ मध्ये कोळसा उदयोगाचे राष्ट्रीयकरण झाले. तेंव्हा राष्ट्रीयकरणाच्यावेळी जी परिस्थिती खदानींची होती त्याहीपेक्षा वाईट स्थितीत कोल इंडियाला आणण्याचा शासनाने प्रयत्न चालवला आहे. उत्खनन करणे खाजगी कंपन्यांच्या आवाक्याबाहेरचे असून टाटा सारखी सक्षम कंपनी कोळशाचे उत्खनन करण्यास असफल राहिली आहे. मग अन्य कंपन्यांचे काय घेऊन बसला आहात, असा प्रश्न चर्चे दरम्यान नाथूलाल पाण्डेय यांनी उपस्थित केला. या अगोदरही सर्व संघटनांनी एकत्रितपणे कोल इंडियाच्या खाजगीकरणा विरुद्ध तसेच कोल ब्लॉकच्या कमर्शियल लिलावा विरुद्ध संप पुकारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु त्यावेळी शासनाने युनियनशी चर्चा केल्याशिवाय खाजगीकरना बद्दल कोणतेही पाऊल उचलण्यात येणार नसल्याचा शब्द दिला होता. परंतु निर्णयावर ठाम न राहता केंद्र शासनाने कोल ब्लॉकचे कमर्शियल लिलाव करण्याचा एकतर्फा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मजूर संघटना व कोळसा कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. कोरोना लॉकडाउनच्या आडून खाजगीकरणाचा डाव खेळल्या गेल्याने कोळसा कर्मचाऱ्यांमध्ये भीती सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेंव्हा कोळसा कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध संप पुकारण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिला नव्हता. केंद्र शासन खाजगीकरणाचा निर्णय मागे घेण्यास गंभीर दिसत नाही. एक महिन्यांपासून आसाम कोलफिल्डच्या खदानी बंद आहेत. केंद्र शासन याबाबत कोणताही तोडगा काढण्याच्या तयारीत दिसत नाही. याकरिता आधी कोल ब्लॉकचा कमर्शियल लिलाव रद्द करा नंतरच युनियन कोणतीही चर्चा करण्यास राजी असेल अशी भूमिकाही कोळसा मजूर संघटनांनी घेतली आहे. देशाला आवश्यक्तेनूसार कोळशाचे उत्पादन करून देण्यास कोल इंडिया सक्षम असल्याचेही सचिवांना पटवून देण्याचा नाथूलाल पाण्डेय यांनी प्रयत्न केला. कोळसा मंत्रालयाच्या सचिवांनी संप मागे घेण्याची किंवा एक दिवसांचा संप पाळण्याची अपील केली आहे. तसेच कोल इंडियाच्या चेयरमेंनी सुद्धा संप मागे घेण्याची अपील केली. परंतु राष्ट्रीय मजूर संघटनांनी कोळसा मंत्र्यांबरोबर उच्च स्तरीय बैठक घेण्याचा मानस व्यक्त केला असून तशी मागणीही केली आहे. कोळसा मंत्रालयातील सचिवांनी बैठकी संदर्भात कोळसा मंत्र्यांकडे बोलणी करणार असल्याचे सांगितल्याने शेवटी व्हिडीओ कान्फरन्सच्या बैठकीतून कोणताही तोडगा निघाला नसल्याने संप पुकारण्यात आला असल्याचे कोळसा मजूर युनियनचे नाथूलाल पाण्डेय यांच्या प्रसिद्धी पत्रकातून कळले आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
यवतमाळ जिल्ह्यात ८ पॉझेटिव्ह रुग्णांची भर...तिघांना मिळाला डिस्चार्ज...
WANICITY.COM
यवतमाळ जिल्ह्यात ८ पॉझेटिव्ह रुग्णांची भर...तिघांना मिळाला डिस्चार्ज...
<p>यवतमाळ, दि. 02 : जिल्ह्यात आज दि. 2 दिवसभरात 8 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली. तर ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या तीन जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 63 झाली आहे.</p> <p><p><p><br>गुरुवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या आठ जणांमध्ये सहा पुरूष तर दोन महिला आहे. यात यवतमाळ शहरातील दोन पुरूष, दारव्हा येथील दोन पुरूष, पुसद येथील दोन पुरूष, दिग्रस येथील एक महिला आणि आर्णी येथील एका महिलेचा समावेष आहे.</p> <p><p> <p><p><p><br>जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 298 वर पोहचली आहे. यापैकी तब्बल 226 जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयासोलेशन वार्डात सद्यस्थितीत 85 जण भरती आहे.</p> <p><p> <p><p><p><br>वैद्यकीय महाविद्यालयाने गुरूवारी 42 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरुवातीपासून आतापर्यंत 5149 नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले असून यापैकी 4952 प्राप्त तर 197 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 4654 नमुने निगेटिव्ह आले आहेत.<br>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणीतील ए टी एम वर सुद्धा सॅनिटायझर ची गरज?..... कोण येई कसा कोण जाणतो? :- लागलेल्या रांगा ठरू शकतात धोक्याची घंटा....?..
WANICITY.COM
वणीतील ए टी एम वर सुद्धा सॅनिटायझर ची गरज?..... कोण येई कसा कोण जाणतो? :- लागलेल्या रांगा ठरू शकतात धोक्याची...
<p>वणी :- सुरज चाटे <p> जगभरात सध्या कोरोणाने चांगलाच हाहाकार माजवला असल्याने संपूर्ण जग भीतीमय वातावरणात आहे त्यापासून बचावण्याकरीता सोशल डिस्टनसिंगचा, सॅनिटायझर व स्वतःची काळजी घेणे हेच उत्तम उपाय असून आता सध्या वेळापत्रकात काही प्रमाणात बदल झाला असल्याने नागरिकांनी आपला मोर्चा पैसे कढण्याकरिता एटीएम कडे वाढविला आहे. त्या ठिकाणी कधी कधी लागलेल्या रांगा सुद्धा धोक्याची घंटा ठरू शकते तिथे संबंधित ए टी एम तथा बँकेकडून सॅनिटायझर व आदी सुरक्षित राहण्यायोग्य उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे कारण कोण येई कसा कोण जाणतो? असाच काहीसा प्रकार या कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत निर्माण झाला असल्याने संबंधितांनी यांवर विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. <p> वणी ही आसपासच्या खेळयां पाळ्या वरील लोकांची मुख्य बाजारपेठ असल्याने विविध महत्वाच्या कामानिमित्त वणी गाठावी लागते. सध्या कोरोनाचे संकट जगभरात असून त्याचे पडसाद वणीत सुद्धा पडले आहे. वणीत कोरोना रुग्णांचा आकडा सात वर गेल्याने वणीतील नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली होती मात्र आता आकडा स्थिर आहे त्यात प्रशासन जोमाने कामाला लागले असले तरी आपली जबाबदारी आपण सुद्धा पार पाडणे महत्वाचे झाले आहे. दिवसागणिक ए टी एम सारख्या ठिकाणी नागरिकांची गर्दी पहावयास मिळते मात्र ए टी एम वर येणारा व्यक्ती कुठून येतो, कसा येतो? याचे मात्र भान नाही बँकेत सर्व सोयी उपलब्ध केल्या सॅनिटायझर, मास्क, tempratureस्क्रिनिंग मशीन आदी पण काही प्रमाणात का होईना प्रत्येक ए टी एम वर सॅनिटायझर तरी ठेवणे महत्वाचे झाले आहे प्रत्येक व्यक्ती आपल्या सोबत आवश्यक त्या सॅनिटायझर चा वापर करीत नसतो त्यामुळे संबंधित बँक ए टी एम कडून याची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
लाईक
कमेंट
शेअर
w
wanicity
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
२० लाखांपेक्षा जास्त लोकांनी वापरलेलं ॲप चक्क नांदेड जिल्हातल्या देगलूरच्या पोराने तयार केलंय !!
WANICITY.COM
२० लाखांपेक्षा जास्त लोकांनी वापरलेलं ॲप चक्क नांदेड जिल्हातल्या देगलूरच्या पोराने तयार केलंय !!
तुम्ही खाताबुक ह्या ऍपबद्दल ऐकलंय का? त्याची जाहिरात तरी नक्की पाहिली असेल. नसलं यारी हरकत नाही. हे दुकानदारांना आणि छोट्या व्यावसायिकांना हिशोब ठेवायला मदत करणारं ॲप आहे. त्यातल्यात्यात उधारी वसूल करण्यासाठी याचा खासच वापर होतो. आज आम्ही खाताबुकच्या जन्माची कहाणी तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत. कहाणी भव्यदिव्य नाही पण अविश्वसनीय आणि प्रेरणादायी नक्कीच आहे. बरेचदा लोक आपल्या नाकर्तेपणासाठी परिस्थिती, भवताल आणि कितीतरी गोष्टींना दोष देतात, पण ही खाताबुकची गोष्ट वाचून तुम्हांला कळेल की इच्छा असेल, तर मार्ग नक्कीच निघतो. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरला. <p> <p>महाराष्ट्र-तेलंगणा आणि कर्नाटकाच्या सीमेजवळ वसलेलं देगलूर हे मुख्यतः शेती व्यवसाय असलेलं शहर आहे. पण त्याचसोबत ते आजूबाजूच्या वस्तीसाठी व्यापाराचंही केंद्र आहे. आपल्या आजच्या कथेचे मूळ हे इथल्या एका इलेक्ट्रिक सामानाच्या दुकानात आहे. या कथेचा नायक आहे वैभव कल्पे. वैभवचे वडील एक इलेक्ट्रिक सामानाचे दुकान चालवायचे. त्यांना साधा हिशोब ठेवताना होणारा त्रास, त्यातही लोकांकडून पैसे वसुली करताना होणारा मनस्ताप वैभव जवळून बघत होता आणि त्यावर त्याने उपाय काढायचे ठरवले. <p> <p>आपल्या वडिलांना दुकानात मदत करत असतानाच त्यानं इंटरनेटवरून अँड्रॉइड ऍप कसे बनवायचे हे शिकायला सूरवात केली. त्याने या प्रयोगातून आपल्या वडिलांसाठी एक हिशोब ठेवणारे ऍप तयार केले. या ऍपचा डेटा मोबाईलमध्येच ठेवला जायचा. याला साधा सर्व्हरही नव्हता. त्याचं रुपडं अगदी साधारण होतं. पण साधं असलं तरी हे ऍप आपलं काम चोख करत होतं. २०१६ ऑक्टोबरमध्ये हे ऍप प्ले स्टोरवर टाकण्यात आलं. पुढे दोन वर्षांत म्हणजे ऑक्टोबर २०१८ पर्यंत तब्बल ६०,००० दुकानदार हे ऍप वापरत होते आणि इथेच आपल्या कहाणीचा ट्विस्ट येतो. <p> <p>आपल्याला आता देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत यावं लागेल. आपल्या स्टोरीतला दुसरा हिरो आहे रवीश नरेश. पूर्वी Hosuing.com चा को-फाऊंडर असलेला रवीश मुंबईत kyte.ai नावाची स्टार्टअप चालवत होता. त्याची नजर खाताबुकवर पडली. त्यांच्या लक्षात आलं हे ऍप एखाद्या कंपनीने नाही, तर एका व्यक्तीने बनवलं आहे. त्यांने वैभवला ई-मेल पाठवला. <p> <p>या काळात वैभव आपल्या आयुष्यात खूष होता. त्यानं वडिलांचे दुकान पुढे चालवायचं ठरवलं होतं. त्याच्या लग्नची बोलणीही चालू होती. त्याला खाताबुकसाठी अनेक ईमेल येत असत. त्यात lightspeed ventures मोठ्या वेंचर कॅपिटल कंपनीनेही त्याला संपर्क केला होता. रवीश नरेश यांनी वारंवार त्याला संपर्क केला आणि मुंबईमध्ये पहिल्या भेटीसाठी त्याला तयार केलं. <p> <p>वैभवमधल्या जिद्द आणि चिकाटीचा रवीश यांना चांगला अंदाज होता. म्हणूनच तर फक्त ऍप विकत न घेता त्यांनी वैभवला मुंबईला येऊन रवीश यांची टीम जॉईन करण्यास भाग पाडले. रविशच्या टीमने खातबुक पुन्हा एकदा सुरवातीपासून तयार केलं आणि बाजारात आणलं. त्या पहिल्या ६०,००० वापरकर्त्यांची खाताबुकला व्हायरल होण्यास फार मदत झाली. <p> <p>आजच्या घडीला खाताबुक भारतात साधारण २० लाख दुकानदार वापरतात. ५० लाखापेक्षा अधिक लोकांनी हे ऍप डाऊनलोड केलं आहे. भारतातल्या असंघटित क्षेत्राला डिजिटल बनविण्यात यांचा वाटा नाकारता येणार नाही. अजूनही खाताबुकसमोर अनेक आव्हानं आहेत. पण त्यांचा आजवरचा प्रवास हा नक्कीच रंजक आहे. <p> <p>आज वैभव हा खाताबुकच्या मध्यवर्ती टीमचा भाग आहे. त्याच्यामधल्या जिद्दीचं खाताबुक हे उत्तम उदाहरण आहे. देगलूरसारख्या छोट्या शहरात राहून, इंटरनेटवर अँड्रॉइड प्रोग्रामिंग शिकवून बनवलेलं ऍप ते २० लाख दुकानदार वापरणारे ऍप हा प्रवास आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना आटोक्यात आला आहे, ३२ नंतर ११ ही चाचणी अहवाल आले निगेटिव्ह
WANICITY.COM
कोरोना आटोक्यात आला आहे, ३२ नंतर ११ ही चाचणी अहवाल आले निगेटिव्ह
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p><p><p>शहरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानंतर योग्य परिस्थिती हाताळल्याने कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यास प्रशासन यशस्वी ठरले असून २८ जून पासून एकाही व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह न आल्याने कोरोना आटोक्यात आल्याचे सध्यातरी जाणवत आहे. काल ३२ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर आज ११ नमुन्यांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने कोरोनाची साखळी तुटतांना दिसत आहे. आज आणखी १७ संशयितांचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले असून दररोज २० नमुन्यांचे टार्गेट गृहीत धरण्यात आले आहे. बाधित व्यक्तींच्या संपर्कातील लोकांचा युद्ध पातळीवर शोध घेतल्या जात आहे. जे व्यक्ती कोरोना बाधितांच्या संपर्कात आले असतील किंवा ज्यांना कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणे जाणवत असतील तसेच जे ६० वर्षे वयोगटातील असून ज्यांना आधीच विविध आजार जडले आहेत त्यांनी स्वतःहून समोर येऊन आपली तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे जे व्यक्ती नाव जाहीर होण्याच्या भीतीपोटी दडून असतील व ज्यांनी कॉरंटाईन होण्याच्या धास्तीने स्वतःबद्दल माहिती दडवून ठेवली असेल त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून निर्भीड होऊन समोर यावे व स्वतःच्या चाचण्या करून घ्याव्या. त्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल व त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नसल्याचे उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी स्पष्ट केले आहे. <p><p><p><p>शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्या पासून येथील परिस्थितीवर विशेष लक्ष ठेऊन असलेल्या प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतल्याने रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिली आहे. कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर सील करण्याबरोबरच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना ट्रेस करून त्यांना विलीगीकरण कक्षात हलवून, लो रिस्क व हाय रिस्क असे दोन भाग पाडून हाय रिस्क व्यक्तींचे नमुने वेळीच तपासणीकरिता पाठविल्याने रुग्णांचे निदान लागत गेले.त्याचप्रमाणे रुग्ण आढळलेल्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करून संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपास मोहीम राबवून विशेष दक्षता घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात राहीली. आरोग्य विभाग व आशा सेविकांचे पथक प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घरी जाऊन त्यांच्या आरोग्या विषयी व त्यांच्या संपर्काविषयी माहिती जाणून घेत असून कंटेन झोन मधील प्रत्येकाचे स्कॅनिंग करण्यात येऊन त्या परिसराला वेळोवेळी सॅनिटायझर करण्यात आले. तेथील प्रत्येक व्यक्तीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले आहे. संशयित आढळल्यास त्याचे स्वाब घेऊन तपासणी करीता पाठविण्यात आले. लो रिस्क व्यक्तींना सात दिवस कॉरंटाईन तर हाय रिस्क व्यक्तींना चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरही ७ दिवस आणखी कॉरंटाईनमध्ये ठेवण्यात येत असल्याने त्यांच्यातील संक्रमणाच्या मर्यादा लक्षात येत असल्याचे सांगण्यात आले. कोरोना बाधित रुग्णांच्या अतिसंपर्कातील व्यक्तींच्या चाचणी अहवालावरून कोरोनाची संक्रमण क्षमता लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्याने कोरोना नियंत्रित ठेवण्यास प्रशासनाला यश आले. आशा सेविकांचे नऊ पथक कंटेन झोन मध्ये कार्यरत असून तिन्ही कंटेन झोन मधील १७६४ व्यक्तींची त्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येते. तसेच महावीर भवन, जगन्नाथबाबा परिसर व सेवानगर येथे मोबाईल फिवर क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. जेष्ठ नागरिकांनी त्यातल्यात्यात मधुमेह व उच्चदाब अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी स्वतःहून तपासण्या करून घ्याव्यात. कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्यास किंवा त्याविषयी माहिती द्यायची झाल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा. त्यांना कॉरंटाईन न करता फक्त त्यांचे नमुने घेतले जाईल. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील किंवा बाहेरून आलेल्या व्यक्तींनी स्वतः विषयी किंवा आपल्यातील लक्षणा विषयी माहिती दडवून ठेवली असल्यास ती प्रशासनाला उघडपणे सांगावी. त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न करता त्यांचे नाव गुपित ठेवण्यात येईल. ग्रामीण रुग्णालयात सर्दी खोकल्याच्या उपचारासाठी आलेल्या रुग्णांचीही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांच्यातील गंभीरता ओळखून त्यांच्या नोंदी घेण्यात येत असल्याचेही उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या या लढाईत प्रशासन आपल्या सोबत असून कोरोनाला समूळ नष्ट करण्याकरिता नागरिकांनी स्वतःहून आपल्या तपासण्या करवून घ्याव्या व शहराला कोरोनमुक्त करण्यास सहकार्य करावे. असे आव्हानही एसडीओ शरद जावळे यांनी केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अँड. सुरज महारतळे यांना कृषीरत्न पुरस्कार जाहीर.....
WANICITY.COM
अँड. सुरज महारतळे यांना कृषीरत्न पुरस्कार जाहीर.....
<p>वकिली करीत सांभाळली शेतीची धुरा :- नवयुवक शेतकऱ्यांना मिळणार संजीवनी .... <p>वणी :- सुरज चाटे <p> दिवसागणिक नवीन युवकांच मन शेतीकडे फार कमी वळताना दिसते मात्र वकिली व्यवसाय करीत असताना कृषी क्षेत्रात कार्य करणारे अँड. सुरज वामन महारतळे यांना मुंबई इथे मनुष्यबळ विकास अकादमी " राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासंमेलन २०२० या कार्यक्रमात " महाराष्ट्र राज्य कृषिरत्न पुरस्कार २०२०" जाहीर झाला असल्याने त्यांनी नवनिर्वाचित शेती करणाऱ्या युवकांना जणू संजीवनीच निर्माण केल्याचे दिसत आहे. <p> २०१९-२०२० या वर्षात अँड. सुरज महारतळे यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेतीला फाटा देत आधुनिक शेती या क्षेत्रात काम करून युवकांना प्रेरणा निर्माण केली. त्या माध्यमातून त्यांनी कमी जागेत जास्त उत्पादन कसे करावे हा यशस्वी प्रयोग करून दाखवला. त्यात अर्ध्या एकरा मध्ये ईझरील या पद्धतीने पॉलीहाऊस तयार करून तिथून त्यांनी लाखो चे उत्पादन घेतले होते. <p> त्या अनुषंगाने येत्या संप्टेंबर महिन्यात मुंबई इथे होत असलेल्या राज्यस्तरीय गुणिजन गौरव महासमेलंन २०२० या कार्यक्रमात सन्मानचिन्ह, गौरवपदक, मानपत्र, महावस्त्र बॅच, गौरवमूर्ती मानाचा फेटा देऊन महाराष्ट्र राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या सत्काराने नवनिर्वाचित शेतकरी युवकांना यातून प्रेरणा मिळणार आहे हे मात्र नक्कीच.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वेकोलिच्या नागपूर हेड क्वाटर येथून बदलून आलेले मुख्यमहाप्रबंधक कॉरंटाईन राहतील काय ?
WANICITY.COM
वेकोलिच्या नागपूर हेड क्वाटर येथून बदलून आलेले मुख्यमहाप्रबंधक कॉरंटाईन राहतील काय ?
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p><p>वणी नॉर्थ क्षेत्राचे मुख्य महाप्रबंधक आर.के. सिंग यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने त्यांच्या जागी नागपूर येथील वेकोलिच्या मुख्य कार्यालयातील आय .डी. झंक्यानी यांनी कार्यभार स्वीकारला असून येथे रुजू झाल्यानंतर त्यांनी तीन खदानींची प्रत्यक्ष पाहणी केल्याचे समजते. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या नागपूर जिल्ह्यातून वणी येथे कार्यान्वित होण्याआधी स्थानिक आरोग्य विभागाला कळवून १४ दिवस कॉरंटाईन राहणे बंधनकारक असतांना महाप्रबंधकांनी वेकोलिच्या सहकारी कर्मचाऱ्यांसह खदानींचा दौरा केल्याने तेथील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. <p><p><p>वेकोलिच्या वणी नॉर्थ क्षेत्राचे मुख्यमहाप्रबंधक आर.के. सिंग यांच्या एकूणच वादग्रस्त कार्यकाळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडट्टीवार यांनी वेकोलि प्रशासनाकडे त्यांच्या अकर्तव्यदक्षते बद्दल तक्रारी केल्याने त्यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नागपूर येथील वेकोलिच्या मुख्य कार्यालयातील आय .डी. झंक्यानी यांची नियुक्ती झाली. कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या नागपूर शहरातून वणीला आल्यानंतर येथील आरोग्य विभागाशी संपर्क साधून खबरदारीचा भाग म्हणून १४ दिवस कॉरंटाईन राहणे आवश्यक असतांना साहेबांनी आल्याआल्या उकनी, जुनाड व घोणसा खदानींचा दौरा केल्याचे समजते. नागपूर येथे १४७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद असून दिवसागणिक त्याठिकाणी रुग्ण आढळत असल्याने त्याठिकाणावरून आलेल्या व्यक्तीकडून धोका संभवू शकतो. शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने येथील नागरिक भीतीच्या सावटात वावरत असून प्रतिबंधित क्षेत्रातील काळजी वाहतांना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. त्यामुळे बाहेरून आलेल्या व्यक्तींबाबत प्रशासन कोणतीही जोखीम पत्कारू शकत नाही. परजिल्ह्यातून आलेल्या त्यातल्यात्यात हॉसस्पॉट झोन मधून आलेल्या व्यक्तींना कॉरंटाईनचा कालावधी पूर्ण न करता इतर व्यक्तींमध्ये वावरण्यास खुली सूट देणे नंतर प्रशासनाच्याच अंगलट येऊ शकते. याचा साक्षात्कार मुंबई कनेक्शनने घडवलाच आहे. मुंबई तेथून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोना पसरल्याने शहरात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यातच बाहेरून आलेल्या या अधिकारी दर्जाच्या व्यक्तीने अशाप्रकारच्या लापर्वाहीने वागणे आता पचनी पडण्यासारखे नाही. नागपूर वरून आल्यानंतर याठिकाणचा कार्यभार स्वीकारून कर्तव्यातील अनेकांच्या संपर्कात येऊन मुक्त संचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना मोकळीक असणे म्हणजे ज्यांनी १४ दिवसांचा कॉरंटाईन पूर्ण केला त्यांच्यावर अन्याय केल्यासारखे होईल. त्यामुळे कोणत्याही दर्जाचा व्यक्ती परजिल्ह्यातून आल्यास त्याला इतरांप्रमाणेच १४ दिवसांच्या कॉरंटाईनमध्ये ठेवावे अशा प्रतिक्रिया खदानींमध्ये कर्तव्य बजावत असलेल्या इतर कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोविड केंद्रातील ३२ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह, रुग्णसंख्या सातवर कायम !
WANICITY.COM
कोविड केंद्रातील ३२ व्यक्तींचे कोरोना अहवाल निगेटिव्ह, रुग्णसंख्या सातवर कायम !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना खबरदारीचा उपाय म्हणून संस्थात्मक विलीगीकरणात ठेऊन त्यांचे नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३२ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ११ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी असून ४६ व्यक्ती सध्यास्थितीत कोविड केयर सेंटरमध्ये आहेत. पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आणखी व्यक्तींचे शोध घेणे सुरु असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. <p>शहरात २० जूनला दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढल्यानंतर अल्पावधीतच नातेसंबंधातील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यांच्या जवळीक लोकांचे नमुने घेतले असता २३ जूनला आणखी संबंधातील दोन व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या. त्यानंतर २४ जूनला दुकानात काम करणारा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाला. त्यानंतर दोन दिवस एकही रुग्ण न आढळल्याने कोरोना नियंत्रणात आल्याचे वाटत असतांनाच २७ जूनला त्यांच्या कडे काम करणाऱ्याच एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली. २८ जून पासून आज ३० जून पर्यंत एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह न आल्याने प्रशासनाबरोबरच जनतेतही समाधान पाहायला मिळत आहे. शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ असून प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
पाच दिवसांचा जनता कर्फ्यू एकाच दिवसात करण्यात आला रद्द
WANICITY.COM
पाच दिवसांचा जनता कर्फ्यू एकाच दिवसात करण्यात आला रद्द
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p><p> कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतांना या आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन २७ जूनला रेष्टहाऊस येथे झालेल्या सर्वपक्षीय सभेत जनता कर्फ्यू पाळण्याचा घेण्यात आलेला निर्णय आज २९ जूनला आयोजित करण्यात आलेल्या सर्व पक्षीय सभेत रद्द करण्यात आला आहे. छोट्या व्यापाऱ्यांचे हित जोपासत हा निर्णय मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी यातील राज कारण काय आहे हे समजण्या पलीकडचे आहे. उस्त्फुर्त प्रतिसाद मिळूनही जनता कर्फ्यू का मागे घ्यावा लागला हा संशोधनाचा विषय बनला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये जनता कर्फ्यू पाळल्या गेला. सर्वांची त्याला संमतीही मिळाली पण शहरात सर्वानुमते जाहीर करण्यात आलेला जणता कर्फ्यू प्रतिसाद मिळाल्या नंतरही मागे घ्यावा लागला ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. <p><p><p>शहरात २० जून पासून २७ जून पर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ झाली. त्यामुळे प्रशासनाबरोबरच जनताही चिंतेत पडली. प्रशासनाने कोरोनाची साखळी तोडण्या करीता हर संभव प्रयत्न व उपाययोजना केल्या. प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक घर पिंजून काढत संशयित व्यक्तींना कॉरंटाईन करून परिसरातील लोकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. आरोग्य विभागाने आशा सेविकांच्या माध्यमातून या सर्व उपाय योजना राबविल्या. प्रशासनाला प्रतिबंधित क्षेत्रात सेवा पुरवितांना नागरिकांच्या वर्दळीचा त्रास होऊ नये व वर्दळीतून कोरोनाचे संक्रमण वाढू नये या उदात्त हेतूने काही सुज्ञ नागरिकांनी एकत्रित येऊन कोरोनाची ही साखळी तोडण्या करिता जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविले. पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर ही करण्यात आला. आज २९ जून पासून सुरु झालेल्या जनता कर्फ्यूला उत्तम प्रतिसादही मिळाला. मग कुठे माशी शिंकली काय माहित एकाच दिवसांत हा कर्फ्यू रद्द करावा लागला. लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांचा विचार करून हा जनता कर्फ्यू रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले असले तरी यातील गोम काही वेगळीच असल्याचे शहरात बोलले जात आहे. नहिलेपे दहिल्याची राजनीती याठिकाणी सुरु असल्याचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. कोरोना सारखे संवेदनशील विषय हाताळतांनाही राजनीती होत असेल तर त्याचे पडसाद नंतर सर्वांनाच भोगावे लागणार आहे. कोरोनाच्या या महामारीतून जणता अजूनही मुक्त झालेली नाही. या महामारीने रोजच कुणाचा न कुणाचा बळी जात आहे. अवघ्या विश्वाला हादरवून सोडणाऱ्या या महामारीला अगदी सहजतेनं घेणं म्हणजे स्वतःचं व इतरांचं जीवन धोक्यात घालण्यासारखं आहे. सर सलामत तर पगडी हजार, या विचारवंतांच्या विचारांशी नाळ जोडून कोरोना पासून दोन हात दूर राहण्याचा संकल्प केंव्हाही केलेला बरा. कोरोनाच्या काळातही नशा भागविण्याकरिता लांबचलांब रांगा लागत असल्याने या आजाराची काळजी मिटल्याचा प्रत्यय येतो. मद्यपींच्या या उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत दारू विक्रेते जास्तीत जास्त नफा कमविण्याचा प्रयत्न करतात. दारू साठी लागलेल्या रांगेत कोण कोणाच्या संपर्कातला असतो, याचीही खात्री नसते. त्यामुळे शहरातील वर्दळीवर काही काळ नियंत्रण राहावे व कोरोनाची निर्माण झालेली साखळी तुटावी याकरिता सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून सर्वानुमते जनता कर्फ्यू पाळण्याचा घेण्यात आलेला निर्णय अखेर एका दिवसातच मागे घेण्यात आला. त्यामुळे जनताही संभ्रमात पडली आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Tik-Tok सह चीनच्या ५९ ऍप्प वर बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय
WANICITY.COM
Tik-Tok सह चीनच्या ५९ ऍप्प वर बंदी, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मोदी सरकारने Tik-Tok सह चीनच्या ५९ ऍप्पवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि चीनमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोदी सरकारने हे पाऊल उचलले आहे. शेअर इट, युसी ब्राऊझर् यासारख्या चीनच्या ५९ अँप वरही बंदी घालण्यात आली आहे . <p> FULL LIST OF CHINESE APPS BANNED BY GOVT: <p>1. TikTok <p>2. Shareit <p>3. Kwai <p>4. UC Browser <p>5. Baidu map <p>6. Shein <p>7. Clash of Kings <p>8. DU battery saver <p>9. Helo <p>10. Likee <p>11. YouCam makeup <p>12. Mi Community <p>13. CM Browers <p>14. Virus Cleaner <p>15. APUS Browser <p>16. ROMWE <p>17. Club Factory <p>18. Newsdog <p>19. Beutry Plus <p>20. WeChat <p>21. UC News <p>22. QQ Mail <p>23. Weibo <p>24. Xender <p>25. QQ Music <p>26. QQ Newsfeed <p>27. Bigo Live <p>28. SelfieCity <p>29. Mail Master <p>30. Parallel Space 31. Mi Video Call – Xiaomi <p>32. WeSync <p>33. ES File Explorer <p>34. Viva Video – QU Video Inc <p>35. Meitu <p>36. Vigo Video <p>37. New Video Status <p>38. DU Recorder <p>39. Vault- Hide <p>40. Cache Cleaner DU App studio <p>41. DU Cleaner <p>42. DU Browser <p>43. Hago Play With New Friends <p>44. Cam Scanner <p>45. Clean Master – Cheetah Mobile <p>46. Wonder Camera <p>47. Photo Wonder <p>48. QQ Player <p>49. We Meet <p>50. Sweet Selfie <p>51. Baidu Translate <p>52. Vmate <p>53. QQ International <p>54. QQ Security Center <p>55. QQ Launcher <p>56. U Video <p>57. V fly Status Video <p>58. Mobile Legends <p>59. DU Privacy
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील जनता कर्फ्यूला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, व्यापारी संघटनांनी दर्शविला पाठिंबा
WANICITY.COM
शहरातील जनता कर्फ्यूला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद, व्यापारी संघटनांनी दर्शविला पाठिंबा
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरात आज २९ जूनपासून घोषित करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या जनता कर्फ्यूला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला असून बोटावर मोजण्या इतक्या दुकानांव्यतेरिक्त शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेऊन व्यावसायिकांनी जनता कर्फ्यूला आपला पाठिंबा दर्शविला आहे. <p><p>जनता कर्फ्यू संदर्भात शहरात दोन वेगवेगळ्या बैठकी घेण्यात आल्या. पहिल्या बैठकीत आमदार, नगराध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, व्यापारी संगठनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत शहरात पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यावर एकमत होऊन २९ जूनपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी सायंकाळी खासदार बाळू धानोरकर यांनी प्रशासनासोबत बैठक घेऊन शहरातील कोणत्याही व्यावसायिकांवर बंद थोपवू नये अशा सूचना देतांनाच ज्यांना व्यवसाय सुरु ठेवायचे असतील त्यांनी व्यवसाय सुरु ठेवावे असे जाहीर केले. त्यानंतर आज २९ जूनला शहरातील बोटावर मोजण्या एवढीच दुकाने सुरु होती. तर संपूर्ण व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेऊन व्यापारी संघटनांनी जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दवाखाने, औषधी दुकाने, कृषी केंद्र याव्यतेरिक्त शहरातील छोटी मोठी मोजकीच दुकाने सुरु होती. शहरातील सुरु असलेल्या दुकानांपैकी विशेष आकर्षण ठरली ती बियरबार व दारू विक्रेत्यांची दुकाने. राज्याला महसूल उपलब्ध करून देण्यात अग्रेसर असलेले बियरबार व वाईनशॉप आजही बऱ्यापैकी सुरु होते. जनतेने विधानसभा व लोकसभेवर निवडून पाठविलेल्या जनप्रतिनिधींनी जनता कर्फ्यू बाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्याने जनताही बुचकाळ्यात पडली आहे. कोरोनाच्या या काळात संपूर्ण राज्य उपाययोजनांवर भर देत असतांना छोट्याश्या या वणी शहरात लोकप्रतिनिधींमध्ये दुमत जाणवत असल्याने जनतेसह प्रशासनही विचारात पडले आहे. पाहता पाहता रुग्णाची संख्या सात वर पोहचली असून प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची काळजी घेतांना व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतांना प्रशासनाची एकीकडे दमछाक होत आहे तर दुसरीकडे लोकप्रतिनिधींचा तालमेल जुळत नसल्याने प्रशासनही विचारात पडले आहे. <p><p>शहरात आज टिळक चौकातील चार ते पाच हातगाडीवरील फळ विक्रेते, टिळक चौक ते विराणी फंक्शन हॉल रोडवरील मोबाईल शॉपी, फूट वेयर, ऑटोमोबाईल, अंड्याचे ठोक दुकान सुरु होते. तसेच इंदिराचौकातील बियरबार, सुजाता टॉकीज परिसरातील वाईन शॉप, तीन बियरबार, चिकनची दुकाने, टिळक चौक ते टागोर चौक रोडवरील स्टेशनरीजची दुकाने, फोटो स्टुडिओ, सलून, नांदेपेरा रोडवरील बियरबार व मॉल, वणी यवतमाळ रोडवरील ४ ते ५ बियरबार, देशी दारू दुकान, सिंधी कॉलनी परिसरातील बियरबार, गांधी चौकातील काही फ्रुट विक्रेते, किराणा दुकान, सुपरबाजार, दीपक टॉकीज परिसरातील बियरबार, वाघदरा जवळील देशी दारू दुकान या व्यतरिक्त शहरातील संपूर्ण बाजारपेठ जनता कर्फ्यूचे पालन करून बंद ठेवण्यात आली. काही व्यावसायिकांनी इतरांची दुकाने सुरु असल्याचे पाहून ११ वाजेनंतर दुकाने उघडली तर काहींनी ११ वाजता नंतर दुकाने बंद केली. केशकर्तनालये सुरु करण्यास शासनाने २८ जून पासून मंजुरात दिली असतांना केवळ कटिंग करण्याला मंजुरी मिळाल्याने नाराज असलेल्या केशकर्तकांनी २८ जूनला दुकाने बंदच ठेऊन शासनाच्या निर्णयाविषयी रोष व्यक्त केला. परंतु आज २९ जूनला शहरातील महाराष्ट्र बॅंकेसमोरील केशकर्तनालय सुरु झाल्याने केशकर्तकांनी तडजोड केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता सलून व्यावसायिकांचा पोटापाण्याचा तर नागरिकांचा डोक्याच्या केसांचा प्रश्न मिटला आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Jio Care Digital Specialist - Only Marathi Speaking Candidates Work From Home
WANICITY.COM
Jio Care Digital Specialist - Only Marathi Speaking Candidates Work From Home
<strong>Job description</strong> <p>Personality Traits: <p>Need to be a Graduate / two years experiences / If the member is thru IJP then these conditions don't apply. . <p>Ability to perform multiple tasks and adjust quickly in short timeframes with limited direct supervision <p>Ability to build rapport with others and create a team environment <p>Strong communication, motivational , time management skills , Ability to work flexible hours (all shifts) <p>Ability to audit calls and coach for performance <p>Ability to analyse quality scores and operational matrices and create Plan of Action with measurable changes within timelines <p>Competencies : <p>Customer Service Orientation , Written / Oral Communication skills , Planning & Organizing , Problem Solving , Leadership skills & Team Work . <p>Key Responsibilities: <p>Responsible for smooth and efficient day-to-operations within their team . The objectives of this role is to drive qualitative performance effectiveness and superior customer experience of his Team. Responsible to coach assigned advisors on observed areas for improvement with respect to product, process, soft skills and communication <p>Metrics & Performance Management <p>Operational : Should achieve ASA, AHT, Schedule Adherence, Attendance & Login hour's target for the team <p>Quality : Ensure team achieves FCR, C-SAT & Quality monitoring targets <p>People : Responsible for employee morale, absenteeism & attrition <p>Operations <p>Audit calls on a daily basis for team and provide feedback <p>Take 2nd level Escalated calls assist the team with customer complaints, where necessary <p>Be an SME for his team , ease his/her Team of any queries. <p>Keep a close track on FCR and critical call parameters on Operational & Quality scores . Review/coach Advisors on the same <p>Daily Briefing on changes and issues that affect customers or the team, or ensure that staff has accessed to this information <p>Encourage and implement best practice across the team <p>Managing staff breaks <p>People <p>Managing Team Performance by monitoring of CSEs and providing instantaneous feedback <p>Complete administrative functions such as maintaining attendance, addressing disciplinary issues etc <p>Track and monitor adherence and roster <p>Ensure team is clear on quality and service performance expectations, and are striving to exceed these expectations <p>Use the performance information to provide positive reinforcement of behaviour or skill <p>Use information provided by the quality team to provide feedback to individual CSE <p>Organizational <p>Provide assistance to other work units when required, particularly in the management of queues <p>Identify ways to improve skill issues that face the team as a whole, and action accordingly <p>Participate in Company wide projects/assignments, which could include working on curriculum updates/revisions <p> <p>Required Candidate profile <p> <p>Work from Home <p>Minimum 2 years call center experience. <p>Must be a graduate <p>12th Pass <p>Hindi + Marathi language mandatory <p>Candidate need to have 5.5 inch screen mobile phone with 3 GB RAM <p>Good internet connectivity of 5 MBPS speed (can watch videos easily from place of work in youtube without buffering) <p>Work from home work environment <p>Perks and Benefits <p> <p>PF ESIC Bonus <p> <p> <p><strong>Contact Person</strong> <p> <p>Ujjal Sengupta <p>Email :- ujjal.sengupta@ril.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जनता कर्फ्यू पाच दिवसांचा, नागरिकांनी वस्तूंचा साठा केला पाच महिन्यांचा ! शहरात खरेदी करिता नागरिकांनी केली एकच गर्दी
WANICITY.COM
जनता कर्फ्यू पाच दिवसांचा, नागरिकांनी वस्तूंचा साठा केला पाच महिन्यांचा ! शहरात खरेदी करिता नागरिकांनी के...
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरात काल २७ जूनला एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेच्या निवासस्थानासभोतालचा परिसर सील करण्यात येऊन त्या महिलेच्या संपर्कातील ३२ व्यक्तींचे (हायरिस्क} नमुने घेण्यात आले आहे. आतापर्यंत कोविड सेंटरमध्ये १०१ लोकांना हलविण्यात आले. त्यापैकी ९९ व्यक्तींचे स्वाब घेण्यात आले. ७० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ६४ व्यक्ती निगेटिव्ह तर ४ व्यकीतींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. २ व्यक्तींचे नमुने परत तपासणी करीता पाठविण्यात आले. ३५ निगेटिव्ह व्यक्तींना कोविड केंद्रातून सुट्टी देण्यात आली. ४९ व्यक्ती सध्यास्थितीत कोविड केयर सेंटर मध्ये असून १२ व्यक्तींना वैद्यकीय कारणास्तव होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्या महिलेच्या संपर्कातील इतरही व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेणे सुरु आहे. <p><p> शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ वर पोहचली असल्याने शहरात उद्या २९ जूनपासून ५ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारात आज खरेदी करीता नागरिकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याकरिता दुकानांमध्ये नागरिक अक्षरशः तुटून पडले होते. प्रत्येक दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड पाहायला मिळत होती. कालपर्यंत ग्राहकांच्या प्रतीक्षेत राहणाऱ्या दुकानांमध्येही नागरिकांची गर्दी ओसंडून वाहत होती. भाजीपाल्याचा तर आज दुष्काळ पाहायला मिळत होता. १ वाजेपर्यंतच अर्ध्याधिक भाजीपाल्यांची विक्री झाल्याने वेळेआधीच भाजीपाल्यांची दुकाने बंद होतांना दिसली. शहरात भाजीपाल्यासह प्रत्येक वस्तूंचे भाव आज वढारले होते. अंडे, मांस मच्छी पासून तर मद्य विक्रेत्यांपर्यंत सर्वांनीच चांगलीच भाव वाढ केल्याने जनतेची आज चांगलीचं लूट झाली. एका दोन दिवसा आधी मद्याच्या ७५० मी.ली. बॉटलवर ४० ते ६० रुपये छापिव किमतीपेक्षा जास्त घेणाऱ्या विक्रेत्यांनी आज अचानक १५० रुपयांची घसघशीत मार्जिन ठेवली. दारू विक्रेत्याकडे लांबच लांब रांग लागल्याने सोशल डिस्टंगसिंगचा पार फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत होते. पाच पन्नास लोकं एकत्रित आल्याचा गवगवा नेहमी होत असतांना मद्याच्या दुकानात लागलेली शेकडोची रांग ते ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर , याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. एका दिवसात जिनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले, भाव विचारताच तोंडात बोटे टाकणारा सर्वसामान्य माणूस वस्तू न खरेदी करताच घराकडे जातांना दिसत होता. बहुतांश विक्रेत्यांनी अक्षरशः नागरिकांची आज लूट केली. कोरोनाच्या भितीतही कर्फ्यूची जास्त काळजी वाटल्याने नागरिकांनीही बाजार अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला. त्यामुळे विक्रेत्यांचेही चांगलेच फावले. काही नागरिक तर किमतीही न विचारता फक्त वस्तू खरेदी करण्यावरच बार देत होते. गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर वेळोवेळी जाम लागत होते. एकूणच जनता कर्फ्यूने जनताच काळजीत आल्याचे पाहायला मिळत होते. पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जनतेला ५ महिन्यांचा वाटत होता कि काय, अशा प्रकारे लोक बाजारावर तुटून पडले. त्याच्यात नागरिकांच्या खिशातून अतिरिक्त पैसा गेला व विक्रेत्यांच्या खिशांचे वजन वाढले. आज कोरोनाची जराही भीती नागरिकांमध्ये जाणवत नव्हती. जो तो खरेदी करण्याच्या लगबगीत सोशल डिस्टंगसिंगचेही उल्लंघन करतांना दिसत होता. एकंदर आज कर्फ्यूच्या काळजीने नागरिकांनी घरांमध्ये चांगलाच वस्तूंचा साठा केल्याचे यावरून लक्षात येते.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जनता कर्फ्यू पाच दिवसांचा, नागरिकांनी वस्तूंचा साठा केला पाच महिन्यांचा ! शहरात खरेदी करिता नागरिकांनी केली एकच गर्दी
WANICITY.COM
जनता कर्फ्यू पाच दिवसांचा, नागरिकांनी वस्तूंचा साठा केला पाच महिन्यांचा ! शहरात खरेदी करिता नागरिकांनी के...
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहरात काल २७ जूनला एका महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या महिलेच्या निवासस्थानासभोतालचा परिसर सील करण्यात येऊन त्या महिलेच्या संपर्कातील ३२ व्यक्तींचे (हायरिस्क} नमुने घेण्यात आले आहे. आतापर्यंत कोविड सेंटरमध्ये १०१ लोकांना हलविण्यात आले. त्यापैकी ९९ व्यक्तींचे स्वाब घेण्यात आले. ७० नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून ६४ व्यक्ती निगेटिव्ह तर ४ व्यकीतींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. २ व्यक्तींचे नमुने परत तपासणी करीता पाठविण्यात आले. ३५ निगेटिव्ह व्यक्तींना कोविड केंद्रातून सुट्टी देण्यात आली. ४९ व्यक्ती सध्यास्थितीत कोविड केयर सेंटर मध्ये असून १२ व्यक्तींना वैद्यकीय कारणास्तव होम कॉरंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्या महिलेच्या संपर्कातील इतरही व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेणे सुरु आहे. <p> शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ वर पोहचली असल्याने शहरात उद्या २९ जूनपासून ५ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. त्यामुळे बाजारात आज खरेदी करीता नागरिकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. जीवनावश्यक व दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्याकरिता दुकानांमध्ये नागरिक अक्षरशः तुटून पडले होते. प्रत्येक दुकानांमध्ये नागरिकांची झुंबड पाहायला मिळत होती. कालपर्यंत ग्राहकांच्या प्रतीक्षेत राहणाऱ्या दुकानांमध्येही नागरिकांची गर्दी ओसंडून वाहत होती. भाजीपाल्याचा तर आज दुष्काळ पाहायला मिळत होता. १ वाजेपर्यंतच अर्ध्याधिक भाजीपाल्यांची विक्री झाल्याने वेळेआधीच भाजीपाल्यांची दुकाने बंद होतांना दिसली. शहरात भाजीपाल्यासह प्रत्येक वस्तूंचे भाव आज वढारले होते. अंडे, मांस मच्छी पासून तर मद्य विक्रेत्यांपर्यंत सर्वांनीच चांगलीच भाव वाढ केल्याने जनतेची आज चांगलीचं लूट झाली. एका दोन दिवसा आधी मद्याच्या ७५० मी.ली. बॉटलवर ४० ते ६० रुपये छापिव किमतीपेक्षा जास्त घेणाऱ्या विक्रेत्यांनी आज अचानक १५० रुपयांची घसघशीत मार्जिन ठेवली. दारू विक्रेत्याकडे लांबच लांब रांग लागल्याने सोशल डिस्टंगसिंगचा पार फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत होते. पाच पन्नास लोकं एकत्रित आल्याचा गवगवा नेहमी होत असतांना मद्याच्या दुकानात लागलेली शेकडोची रांग ते ही पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर , याकडे कुणाचेही लक्ष जात नाही. एका दिवसात जिनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले, भाव विचारताच तोंडात बोटे टाकणारा सर्वसामान्य माणूस वस्तू न खरेदी करताच घराकडे जातांना दिसत होता. बहुतांश विक्रेत्यांनी अक्षरशः नागरिकांची आज लूट केली. कोरोनाच्या भितीतही कर्फ्यूची जास्त काळजी वाटल्याने नागरिकांनीही बाजार अक्षरशः डोक्यावर उचलून घेतला. त्यामुळे विक्रेत्यांचेही चांगलेच फावले. काही नागरिक तर किमतीही न विचारता फक्त वस्तू खरेदी करण्यावरच बार देत होते. गांधी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर वेळोवेळी जाम लागत होते. एकूणच जनता कर्फ्यूने जनताच काळजीत आल्याचे पाहायला मिळत होते. पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जनतेला ५ महिन्यांचा वाटत होता कि काय, अशा प्रकारे लोक बाजारावर तुटून पडले. त्याच्यात नागरिकांच्या खिशातून अतिरिक्त पैसा गेला व विक्रेत्यांच्या खिशांचे वजन वाढले. आज कोरोनाची जराही भीती नागरिकांमध्ये जाणवत नव्हती. जो तो खरेदी करण्याच्या लगबगीत सोशल डिस्टंगसिंगचेही उल्लंघन करतांना दिसत होता. एकंदर आज कर्फ्यूच्या काळजीने नागरिकांनी घरांमध्ये चांगलाच वस्तूंचा साठा केल्याचे यावरून लक्षात येते.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1647
1648
1649
1650
1651
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे