Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार
WANICITY.COM
फार्महाऊसवर सहा जणांनी पतीसमोर केला पत्नीवर बलात्कार
<p><strong>वर्धा : </strong>नोकरीचे आमिष देत एका विवाहितेवर सहा जणांनी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी सावंगी (मेघे) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वच सहाही आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेची शनिवारी (ता. 27) सायंकाळी उशिरा पोलिसांत नोंद करण्यात आली. </p> <p><p>पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला नोकरीचे आमिष देऊन मुलखतीच्या बहाण्याने सिंदी (रेल्वे) येथून सावंगी (मेघे) येथे बोलावण्यात आले. येथून तिला व पतीला कामानिमित्ताने सेलुसरा येथील शेतातील फार्महाऊसवर नेले. तिथे गेल्यावर सहा जण उपस्थित होते. पीडितेच्या पतीला बाहेरच बसवण्यात आले आणि महिलेला आतमध्ये बोलावण्यात आले. पतीला संशय आला असता आरोपींनी त्याला धमकी देऊन बाहेरच पकडून ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर एक-एक करून सहा जणांनी आळीपाळीने महिलेवर बळजबरी केली.</p> <p> <p><p>या घटनेनंतर आरोपींनी महिला व पतीला कुठेही या प्रकाराची वाच्यता केली तर तर ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यानंतर महिलेच्या पतीने देवळी पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रकरण सावंगी पोलिसांच्या हद्दीत असल्याने पोलिसांनी त्याला सावंगीला जाण्यास सांगितले. त्यांनी सावंगी पोलिस ठाण्यात पोहोचून तक्रार दाखल केली. </p> <p> <p><p>पोलिसांनी तातडीने पाऊल उचलत फार्महाऊसवर धाव घेऊन पंचनामा केला. तोपर्यंत घटनास्थळी देवळी पोलिसांचे एक पथक सुद्धा पोहोचले. पोलिसांना फार्महाऊसवरून आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्यात. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही करवाई उपविभागीय पोलिस अधिकारी पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सावंगीचे ठाणेदार रेवचंद शिंगणजुडे, प्रकाश नागापुरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.</p> <p> <p><h4><strong>आरोपींना ठेवले पोलिस कोठडीत</strong></h4> <p> <p><p>शेखर सुरेश चंदनखेडे (वय 24, रा. पवनार), लोकेश ऊर्फ अभिजित गजानन इंगोले (वय 24, रा. तुकाराम वॉर्ड), हेमराज बाबाराव भोयर (वय 39, रा. धारपुरे ले-आउट सिंदी (मेघे), नितीन मारोतराव चावरे (वय 27), राहुल बनराज गाडगे (वय 28) दोन्ही रा. खरांगणा (गोडे) आणि पनिंदाकुमार श्रीनिवास बलवा (वय 26, रा. सिंदी (मेघे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. </p> <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
छुप्या पद्धतीने खर्रे विकणाऱ्याला आज थेट एसडीओनीच पकडले
WANICITY.COM
छुप्या पद्धतीने खर्रे विकणाऱ्याला आज थेट एसडीओनीच पकडले
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू झाल्यापासून सुगंधित तंबाखु व खर्रा विक्रीस प्रतिबंध लावण्यात आले असतांना छुप्या पद्धतीने शहरातील रस्ते न गल्लीबोळांमध्ये सर्रास खर्रा विक्री सुरु असून काही छोटे पानटपरी चालक तर काही बड्या पान सेंटर धारकांनी रोजंदारीने लावलेल्या अल्पवयीन मुलांकडून चढ्या किमतीने खर्रे विकल्या जात आहे. काही व्यसनी व्यक्ती त्यांच्याकडून बिनधोक खर्रे विकत घेत असतांनाचे चीत्र शहरात रोजच पाहायला मिळत असून यवतमाळच्या ताज्या घटनेची पुनरावृत्ती होण्यास हे खर्रा विक्रेते करणी भूत ठरू शकतात. आज शहरात फळभाजी खरेदी करण्याकरीता गेलेल्या उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी प्रत्यक्ष एका अल्पवयीन मुलाला सर्रास खर्रे विक्री करतांना रंगे हात पकडले. त्याच्या जवळ एकंदरीत १४ खर्रे आढळून आले. मुलगा गर्दीचा फायदा घेत पळून गेला पण त्याच्या वडिलांचे नाव मात्र साहेबांनी जाणून घेतले आहे. ही बाब पोलीस निरीक्षकांना कळविली असून कार्यवाही करण्यास सांगितले आहे. आता या छुप्या पद्धतीने खर्रे विकणाऱ्यांवर वॉच ठेवण्यात येणार असून अशा या खर्रे विकणाऱ्यांची गोपनीय पद्धतीने माहिती काढली जाणार असल्याचे एसडीओ शरद जावळे यांनी सांगितले आहे. <p><p>कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरू शकणारे पान सेंटर व तंबाखुजन्य वस्तूंची विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंध लावण्यात आला असून खर्रे किंवा तंबाखुजन्य पदार्थ विकतांना आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या असतांना काही व्यक्ती व अल्पवयीन मुले रस्त्यांनी फिरून सर्रास खर्रे विकतांना दिसत असून व्यसनाधीन व्यक्तीही बिनधोक त्यांच्या कडून खर्रे खरेदी करतांना दिसतात. काही घरांमधून छुप्या पद्धतीने खर्रे विक्री सुरु आहे तर काही विक्रेते घरपोच खर्रे आणून देतात. अशाच प्रकारच्या खर्रा विक्री करणाऱ्याकडून यवतमाळात कोरोना पसरल्याचे ताजे उदाहरण असतांनाही शौक आवरला जात नसल्याने कोणत्याही प्रकारच्या परिणामाची तमा न बाळगता अनोळखी व्यक्तींकडूनही हे महाभाग खर्रे खरेदी करून आपली तलब भागावितांना दिसतात. खर्रा तयार करतांना व त्याची विक्री करतांना कित्येक हातांचा त्याला स्पर्श झालेला असतो याचेही भान त्यांना रहात नाही. तलब भागविण्याच्या नादात स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना आपल्या कुटुंबाचा मात्र त्याठिकाणी विसर पडतो. आपल्यामूळ आपलं कुटुंब धोक्यात येऊ शकतं हे त्यांनाच कळतं ज्यांच्यावर नंतर हे संकट ओढावतं. प्रशासन दिवसरात्र एक करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून लहान सहान गोष्टींकडेही बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. कोरोनाचे उच्चाटन करण्याकरिता प्रशासन आपले संपूर्ण योगदान देत असतांना काही महाभाग व्यसनाच्या आहारी जाऊन याच्या त्याच्या संपर्कात येऊन कोरोना पसरविण्याचे कारण बनत असून प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांवर पाणी फेरण्याचे काम करीत आहे. शहरात कोरोनाचा शिरकाव झाला तेंव्हा पासून शहरातील उपाययोजनांबरोबर शहरवासीयांना सावधगिरीच्याही सूचना प्रशासनातर्फे देण्यात येत आहे. शासनाची खबरदारीविषयीची कॉलर ट्युनही प्रत्येकाच्या मोबाईलवर वाजत असतांना त्यांचे असे बेसावध वागणे शासन व प्रशासनाच्या सूचनांकडे कानाडोळा करण्यासारखे आहे. त्यामुळे कोरोनाला पाय पसरण्यास जागा मिळेल असा बेसावधपणा नागरिकांतून होता काम नये हीच प्रशासनाची अपेक्षा आहे. नेहमी छुप्या पद्धतीने होणारी खर्रा विक्री आज प्रशासनाच्या डोळ्यासमोर आल्याने शहराची सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून पोलीस निरीक्षकांना अशा या छुप्या पद्धतीने गावात खर्रे विकणाऱ्यांवर कार्यवाही करण्यास सांगितले आहे. तसेच या खर्रे विकणाऱ्यांची गोपनीय माहिती घेऊन त्यांना शोधून काढून त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्याचेही एसडीओ जावळे यांनी पोलिसांना सांगितले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
चिखलगाव हद्दीत रेतीच्या ढिगाऱ्यावर आढळून आले मृत अर्भक
WANICITY.COM
चिखलगाव हद्दीत रेतीच्या ढिगाऱ्यावर आढळून आले मृत अर्भक
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- <p><p><p>तालुक्यातील चिखलगाव हद्दीतील सदाशिव नगर येथे एका वाळूच्या ढिगाऱ्यावर मृत अर्भक आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून गावात अनेक चर्चांना उधाण आले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून त्याठिकाणचा पंचनामा केल्यानंतर मृत अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केल्या जात आहे. <p><p><p>शहरापासून जवळच असलेल्या चिखलगाव हद्दीतील सदाशिव नगर येथील नंदिनी बारच्या मागे असलेल्या हिवरकर यांच्या घराजवळील हनुमान मंदिराच्या खुल्या जागेतील रेतीच्या ढिगाऱ्यावर अंदाजे ५ ते ६ महिन्यांचे मृत अर्भक वाहन चालकाच्या दृष्टीस पडले.त्याने याबाबत आपल्या मालकाला कळविले. मालकाने उपसरपंच रांगणकर यांना हि घटना सांगितली असता त्यांनी थेट पोलिसांना मृत अर्भक आढळल्याची माहिती दिल्याने पोलिसांनी घटना स्थळ गाठून त्याठिकाणचा पंचनामा करून मृत अर्भकाला ग्रामीण रुग्णालयात पाठवले. रेतीच्या ढिगाऱ्यावर अशा प्रकारे मृत अर्भक आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून नानाविध चर्चांना पेव फुटले आहे. अनैतिक संबंधातून अशा प्रकारचे दुष्कृत्य घडले असावे हा संशय याठिकाणी व्यक्त होत असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील २२ जणांना कोविड केंद्रात हलविले
WANICITY.COM
कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील २२ जणांना कोविड केंद्रात हलविले
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>शहरातील कोरोना बाधितांची संख्या सतत वाढत असून आज आणखी एका महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता सात झाली आहे. महिला रहात असलेल्या प्रभाग क्रमांक १० मधील सेवानगर परिसर सील करून त्याठिकाणी सॅनीटायझरची फवारणी करण्यात आली आहे. त्याव्यक्तीच्या संपर्कातील ९ व्यक्तींना आधीच इन्स्टिट्यूशन कॉरंटाईन करण्यात आले होते. आज आणखी त्या महिलेच्या संपर्कातील २२ व्यक्तींना (हायरिस्क) संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले आहे. काही व्यक्तींना (लोरीस्क} होम कॉरंटाईन केले असून संपर्कातील व्यक्तींचे शोधकार्य जलद गतीने सुरु आहे. संस्थात्मक विलीगीकरणात असलेल्या १७ लोकांना आज डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. <p>दरम्यान आज जनतेच्या संमतीने सोमवार २९ जूनपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविण्यात आले असून त्यासाठी रेस्टहाऊस येथे घेण्यात आलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधी, सर्व पक्षीय नेते व व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सोमवार पासून सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने पाच दिवसांपर्यंत बंद राहणार असून केवळ मेडिकल, दुधडेरी व कृषी केंद्र हे सकाळी ७ ते १० या वेळेत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. १० वाजेनंतर जर अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करायची झाल्यास ती घरपोच उपलब्ध करून देण्याकरिता लवकरच हेल्पलाईन नंबर देण्यात येणार आहे. रविवार २८ जून हा दिवस मोकळा असल्याने या दिवशी नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्यास मोकळीक देण्यात आली आहे. कोरोनाचे संक्रमण वाढून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय शहरातील काही सुज्ञ नागरिकांनी घेतला असून शहरात लोकांची चहलपहल न राहिल्यास प्रशासनालाही कोरोनाची साखळी तोडण्या करीता आवश्यक त्या उपाययोजना करता येईल. त्यामुळे जनता कर्फ्यूचे सर्वांनी पालन करून शहरात निर्माण झालेले कोरोनाचे संकट दूर करण्यास सहकार्य करण्याचे यावेळी आव्हान करण्यात आले.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने जनता कर्फ्यू पाळण्याचा सर्व पक्षीय सभेत निर्णय
WANICITY.COM
शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असल्याने जनता कर्फ्यू पाळण्याचा सर्व पक्षीय सभेत निर्णय
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p> <p>जिल्ह्यातील विविध तालुके व गावांमध्ये कोरोनाचे लोन पसरल्यानंतरही तीन महिन्यांपर्यंत कोरोनमुक्त राहिलेल्या वणी शहराला मुंबई कनेक्शन नडले व तेथून आलेल्या कुटूंबाने अखेर शहरात कोरोनाची बीजे रोवली. 20 जून पासून २४ जून पर्यंत ६ रुग्ण व दोन दिवसांच्या व्यत्ययानंतर २७ जूनला ७ वा पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कोरोनाची हि साखळी तोडण्या करिता प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत असतांना आज झालेल्या सर्वपक्षीय सभेत सर्वच सुज्ञ नागरिकांनी इतर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून सोमवार पासून शुक्रवार पर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचे ठरविले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे, <p><p><p><p>आज २७ जूनला सातवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने शहरवासियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनही चिंतेत पडले आहे. रुग्णांची संख्या दिसेंदिवस वाढत असल्याने नागरिक चांगलेच धास्तावले असून शहरात कोरोनाचा विळखा घट्ट तर होणार नाही ना ही एकच चिंता त्यांना सताऊ लागली आहे. दोन दिवस पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्याने कोरोनाला ब्रेक लागल्याची चर्चा सुरु असतांनाच आज पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने समाधानी चेहऱ्यांवर भीतीचे सावट दिसू लागले आहेत. प्रशासनाचीही डोके दुखी चांगलीच वाढली असून संपूर्ण यंत्रणा कमला लागली आहे. रुग्ण राहत असलेल्या मोक्षधाम परिसरासमोरील आजूबाजूचा १५० मीटर परिसर सील करण्यात आला असून या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. कोरोनाचे लोन संपूर्ण शहरात पसरू नये याकरिता खबदारीचा उपाय म्हणून जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय सर्व पक्षीय सभेत घेण्यात आला आहे. सतत वाढत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे शहरवासी चांगलेच हादरले आहेत. पुष्कळ दिवस शहर कोरोनामुक्त व शहरवासी भीतिमुक्त असतांना मुंबई रिटर्न व्यक्तीमुळे अखेर शहरात कोरोनाचा शिरकाव झाला व प्रसन्न चेहऱ्यांवर चिंतेचे ढग निर्माण झाले. सौख्याने नांदत असलेल्या शहरातील जनतेत अचानक दुरावा निर्माण झाला. दुरूनच नमस्ते व घराबाहेरूनच चालते करण्या इतपत परिस्थिती शहरात निर्माण झाली. कोरोनाची गडद छाया आपल्यावर पडू नये म्हणून दुराव्याच्या विरहात जनता लोटली गेली. विरंगुळ्यासाठीही जवळच्या लोकांकडेही जाण्याची धास्ती वाटू लागली. आता कोरोना कोणतं रूप धारण करतो या चिंतेने सर्वांनाच ग्रासले आहे. वाढती संख्या कोणता आकडा गाठते याकडे आता सरवासियांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आलेल्या लोकांकडून कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता सोमवार ते शुक्रवार जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांच्या संमतीने सर्व पक्षीय नेत्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणी शहरात आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या झाली सात !
WANICITY.COM
वणी शहरात आणखी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या झाली सात !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p> शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील संस्थात्मक विलीगीकरणात असलेल्या ९ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह तर ८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या ७ झाली आहे. <p>२४ जूनला एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर दोन दिवस कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह न आढळल्याने कोरोनाची साथ निवळत असल्याचे वाटत असतांनाच आज नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आली असल्याचे जाणवत असतांनाच आणखी एका रुग्णाची भर झाल्याने कोरोनाची संख्या वाढतीवर लागली आहे. त्यामुळे मागील दोन दिवस भीतीच्या सावटातून बाहेर पडलेल्या नागरिकांना हा आणखी एक धक्का बसला असून त्यांच्यात चांगलीच घबराहट निर्माण झाली आहे. प्रशासन योग्य ती दक्षता घेत असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याचे आव्हान प्रशासनाने केले आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मोबाईल चोरट्याला पोलिसांनी केली अटक, अतिशिघ्र छडा लावल्याचे आणखी एक प्रकरण
WANICITY.COM
मोबाईल चोरट्याला पोलिसांनी केली अटक, अतिशिघ्र छडा लावल्याचे आणखी एक प्रकरण
प्रशांत चंदनखडे प्रतिनिधी वणी :- <p> <p>राहत्या घरून मोबाईल व रोखरक्कम चोरी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्या कडून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजू पुरुषोत्तम पोटे (३५) रा. नवीन लालगुडा वणी असे या आरोपीचे नाव असून त्याच्यावर वणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. <p> <p>शहरातील शास्त्रीनगर परिसरातील राहत्या घरून एक मोबाईल व तीन हजार रुपये चोरीला गेल्याची तक्रार राहुल दिलीप गटेलवार (३२) यांनी २५ जूनला पोलीस स्टेशनला नोंदविली. या तक्रारीवरून डीबी पथकाने तपासकार्य सुरु करून खबऱ्यांकडून माहिती घेत अतिशीघ्र या प्रकरणाचा छडा लावून आरोपी राजू पुरुषोत्तम पोटे यास अटक केली. त्याच्या जवळून नऊ हजार रुपये किमतीचा मोबाईल हँडसेट व रोख सोळाशे रुपये असा एकूण १० हजार ६०० रुपयांचा चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्यावर भादंवि च्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. <p> <p>सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पो.नि. वैभव जाधव डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे,सुधीर पांडे, विठ्ठल बुर्रेवार, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वांड्रसवर, अमित पोयाम यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मागील दोन दिवसांपासून शहरात एकही पोझिटिव्ह रुग्ण नाही , प्रशासनाच्या उपाय योजनांना आले यश
WANICITY.COM
मागील दोन दिवसांपासून शहरात एकही पोझिटिव्ह रुग्ण नाही , प्रशासनाच्या उपाय योजनांना आले यश
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- <p><p>शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील ज्या व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले त्यापैकी ४ निगेटिव्ह व्यक्तींना डिस्चार्ज तर ११८ व्यक्तींना (लो रिस्क) हातावर होम कोरंटाईनचे शिक्के मारण्यात आले असून त्यांना इतर कोठेही भ्रमंती करण्यास शासनातर्फे मज्जाव करण्यात आला आहे. ते शहरात कोठेही फिरतांना आढळल्यास त्यांच्यावर उचित कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. <p><p>शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अलर्ट झालेल्या प्रशासकीय व्यवस्थेने कोरोनाची साखळी तोडण्या करीता दिवस रात्र राबून विविध उपाय योजनांतर्गत कोरोनाच्या वाढत्या संख्येवर अंकुश लावला आहे. कोरोना बाधितांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून काढून त्यांना विलीगीकरणात हलवून त्यांचे (हाय रिस्क) नमुने तपासणी करीता पाठविण्यात आले. संस्थात्मक विलीगीकरणात असतांना काहींनी विलीगीकरण केंद्रा बाबत असुविधा व अस्वच्छतेचे पुष्कळशे पाठेही वाचले. परंतु प्रशासनाने त्यांच्या या तक्रारींकडे विशेष लक्ष न देता आपल्या प्रमुख उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करून या आजाराला मुळातून उफडून काढण्या करिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांवर वॉच ठेऊन त्यांच्या जास्तीतजास्त तपासण्या करून अतिजोखिमीत असलेल्या व्यक्तींना विलीगीकरणात हलवून त्यांचे नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले. त्यामुळे खऱ्या रुग्णांचे निदान होऊन बहुतांश निकटवर्तीय निगेटिव्ह आल्याने नागरिकांच्याही भीतीचे निराकरण झले. आजच्या घडीला ९ रिपोर्ट प्रलंबित असून ४ निगेटिव्ह व्यक्तींना डिस्चार्ज करण्यात आले असून ११८ व्यक्तींना (लो रिस्क) शिक्के मारण्यात येणार आहे. शिक्के मारलेली व्यक्ती बाहेर कुठेही आढळल्यास त्याच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे. २० जून ते २४ जून पर्यंत दररोज रुग्ण आढळत असल्याने रुग्णसंख्या मोठा आकडा गाठते की काय असे वाटत असतांनाच २५ व २६ जून या दोन दिवसांत एकही व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह न आल्याने परिस्तिथी नियंत्रणात असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाची नियोजनबद्धता व आरोग्यविभागाने आशा सेविकांमार्फत नागरिकांची घेतलेली दक्षता तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या मार्गदर्शक सूचना यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आल्याने सर्वानीच समाधान व्यक्त केले आहे. कितीही टीकेची झोड उठली तरी सर्वहिताकरिता कोरंटाईन रहावेच लागणार असून कोरंटाईन सेंटरमध्ये सर्वच पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. २०० मुलांच्या या वसतिगृहात १० शौचालय व १०बाथरूम असून चालू स्थितीतील हे वसतिगृह मागील काही दिवसांपासून आरोग्य विभागाच्या अधीन आहे. साफसफाई व देखरेखी करीता पुरेपूर कर्मचारी उपलब्ध असून प्रशासनाच्या २४ तास निगराणीत या कोविड सेंटरचा कारभार सुरु असतो. नामांकित कॅटर्सचे जेवण याठिकाणी उपलब्ध असून दिवसातून दोन वेळेस रुग्णांना गरम पाणी दिल्या जाते. एकूणच सुविधापूर्ण असलेल्या या कोविड केंद्रात रिपोर्ट प्राप्त होईस्तोर किंवा कालावधी पूर्ण होई पर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना ठेवण्यात येते. मागील दोन दिवसांपासून एकही रुग्ण न आढळल्याने नागरिकांच्या मनातील भीती निवळली असून बाजारात त्यांची चहलपहल आढळून आली आहे. प्रशासनाची चिंताही काही अंशी कमी झाली असून त्यांनी केलेल्या उपाय योजनांना यश आल्याने त्यांच्यात समाधान पाहायला मिळत आहे. <p><p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
३५ लाखांची दारू पोलिसांच्या जाळ्यात, चालक अटकेत
WANICITY.COM
३५ लाखांची दारू पोलिसांच्या जाळ्यात, चालक अटकेत
२६ जून, <p> <p>प्रतिबंधित चंद्रपूर जिल्ह्यात सध्या अवैध दारू विक्रीचा मुद्दा वाढत आहे. पोलिस विभागाकडूनही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. कोरपना तालुक्यातील नारंडाफाटा रोडवर ट्रक दारू घेऊन जात होता. अशी माहिती मिळाली आणि ट्रक कोरपना पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात कोरपना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. <p> <p>ट्रकमध्ये १०० बॅग मद्य होते. पोलिसांनी एकूण ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी प्रकाश उईके उर्फ लोखंडे याला अटक केली. ही कारवाई ठाणेदार अरुण गुरनुले, वसंत रायसिडाम, प्रकाश निमकर, राम हेक, स्वप्निल बोंडे यांच्यासह उपविभागीय अधिकारी विलास यमवार यांनी केली. <p> <p>संपादन- संतोष पेंदोर
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जिल्हाधिकाऱ्यांची वणी शहराला भेट, घेतला परिस्थितीचा आढावा
WANICITY.COM
जिल्हाधिकाऱ्यांची वणी शहराला भेट, घेतला परिस्थितीचा आढावा
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p> <p>शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींपैकी कोणाचेही रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले नसल्याने दिवसभर सुरु असलेल्या शहरवासीयांच्या चर्च्यांना पूर्ण विराम मिळाला आहे. विलीगीकरणात असलेल्या ७१ व्यक्तींपैकी ६८ व्यक्तींचे (हायरिस्क) नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले होते. ५८ अहवाल प्राप्त झाले असून ५३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह तर ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. २ व्यक्तींचे नमुने परत तपासणी करिता पाठवावे लागणार असून बाकी नमुन्यांचे अहवाल अप्राप्त असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. <p> <p>दरम्यान आज गुरुवारी जिल्ह्याधिकारी एम.डी. सिंह यांनी वणी शहराला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच व्यवस्थेचा आढावा घेऊन आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत एसडीओ शरद जावळे, एसडीपीओ सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील महावीर भवन समोरील शांतिपार्क व साईदरबार क्षेत्र तसेच जगन्नाथबाबा मंदिरापासूनचा काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या क्षेत्राची पाहणी करून नियोजना विषयी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महावीर भवन येथे २४३ कुटुंब असून तेथील लोकसंख्या ९५३ आहे. आरोग्य विभागाच्या पाच टीम याठिकाणी कार्यरत आहे. तर जगन्नाथबाबा मंदिर परिसरात ९० घरांमध्ये ३५० लोकं रहात असून याठिकाणी चार टीम कार्यरत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची पल्स ऑक्सिमीटर व थर्मल स्क्यानर तपासणी करावी तसेच या क्षेत्रातील आणखी नमुने तपासणी करिता पाठवावे. त्याचप्रमाणे इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष देऊन त्यांची रोज तपासणी करावी. सारी व आयएलआयची लक्षणे असलेल्या नागरिकांची जास्तीतजास्त तपासणी करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले. सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व फिझिकल डिस्टन्स या नियमांचे पालन करून अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. त्यामुळे कोरोनाला रोखने शक्य होईल. शासनाने कोरोनाची रोखथाम करण्याकरिता नेमून दिलेले सर्वच नियम पाळून कोरोनाच्या या लढाईत शासनाला सर्वोतोपरी सहकार्य कारण्याचेआव्हानही त्यांनी आहे. उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नारिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊन घाबरून जाऊ नये असे आव्हान केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जिल्हाधिकाऱ्यांची वणी शहराला भेट, घेतला परिस्थितीचा आढावा
WANICITY.COM
जिल्हाधिकाऱ्यांची वणी शहराला भेट, घेतला परिस्थितीचा आढावा
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- <p><p>शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींपैकी कोणाचेही रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले नसल्याने दिवसभर सुरु असलेल्या शहरवासीयांच्या चर्च्यांना पूर्ण विराम मिळाला आहे. विलीगीकरणात असलेल्या ७१ व्यक्तींपैकी ६८ व्यक्तींचे (हायरिस्क) नमुने तपासणी करिता पाठविण्यात आले होते. ५८ अहवाल प्राप्त झाले असून ५३ व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह तर ३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. २ व्यक्तींचे नमुने परत तपासणी करिता पाठवावे लागणार असून बाकी नमुन्यांचे अहवाल अप्राप्त असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. <p><p>दरम्यान आज गुरुवारी जिल्ह्याधिकारी एम.डी. सिंह यांनी वणी शहराला भेट देऊन प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच व्यवस्थेचा आढावा घेऊन आरोग्य विभागाला विविध सूचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत एसडीओ शरद जावळे, एसडीपीओ सुशीलकुमार नायक, ठाणेदार वैभव जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील महावीर भवन समोरील शांतिपार्क व साईदरबार क्षेत्र तसेच जगन्नाथबाबा मंदिरापासूनचा काही भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या क्षेत्राची पाहणी करून नियोजना विषयी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. महावीर भवन येथे २४३ कुटुंब असून तेथील लोकसंख्या ९५३ आहे. आरोग्य विभागाच्या पाच टीम याठिकाणी कार्यरत आहे. तर जगन्नाथबाबा मंदिर परिसरात ९० घरांमध्ये ३५० लोकं रहात असून याठिकाणी चार टीम कार्यरत आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची पल्स ऑक्सिमीटर व थर्मल स्क्यानर तपासणी करावी तसेच या क्षेत्रातील आणखी नमुने तपासणी करिता पाठवावे. त्याचप्रमाणे इतर व्याधींनी ग्रस्त असलेल्या नागरिकांवर विशेष लक्ष देऊन त्यांची रोज तपासणी करावी. सारी व आयएलआयची लक्षणे असलेल्या नागरिकांची जास्तीतजास्त तपासणी करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले. सर्व नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर व फिझिकल डिस्टन्स या नियमांचे पालन करून अनावश्यक बाहेर पडणे टाळावे. त्यामुळे कोरोनाला रोखने शक्य होईल. शासनाने कोरोनाची रोखथाम करण्याकरिता नेमून दिलेले सर्वच नियम पाळून कोरोनाच्या या लढाईत शासनाला सर्वोतोपरी सहकार्य कारण्याचेआव्हानही त्यांनी आहे. उपविभागीय अधिकारी शरद जावळे यांनी शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून नारिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊन घाबरून जाऊ नये असे आव्हान केले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
दिवसभरात पॉझेटिव्ह रुग्णामध्ये वाढ नाही; जिल्ह्यात 118 रिपोर्ट निगेटिव्ह
WANICITY.COM
दिवसभरात पॉझेटिव्ह रुग्णामध्ये वाढ नाही; जिल्ह्यात 118 रिपोर्ट निगेटिव्ह
<p>यवतमाळ, दि. 25 : गत दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असतांनाच गुरुवारी मात्र दिवसभरात एकाही पॉझेटिव्ह रुग्णाची भर पडली नाही. ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णाचा आकडा 72 वर स्थिरावला आहे. <p>वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात एकूण 80 जण भरती आहे. तसेच गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 128 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 118 रिपोर्ट निगेटिव्ह तर 10 नमुन्यांचे अचून निदान न झाल्यामुळे त्याची पुन्हा तपासणी करण्यात येईल. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 258 झाली आहे. यात 72 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. तर उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या 178 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्ह्यात आठ मृत्युची नोंद आहे. <p>वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 4260 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी 4135 प्राप्त तर 125 अप्राप्त आहे. जिल्ह्यात एकूण 3877 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहे. <p>जिल्हाधिकारी रोज विविध तालुक्यात फिल्डवर : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव जिल्ह्याच्या इतर तालुक्यात झाल्यामुळे व येथे पॉझेटिव्ह रुग्ण आढळत असल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह हे रोज विविध तालुक्यांचा तसेच ग्रामीण भागाचा दौरा करून प्रत्यक्ष आढावा घेत आहे. गत तीन चार दिवसांपासून त्यांनी नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद येथील प्रतिबंधित क्षेत्राचा ऑनफिल्ड आढावा घेतला. तर गुरुवारी ते वणीत दाखल झाले. <p>वणी शहरातील महावीर भवन व जगन्नाथ बाबा मंदीर रोड येथील प्रतिबंधित क्षेत्राला त्यांनी भेट दिली. महावीर भवन येथे 247 कुटुंब असून येथील लोकसंख्या 953 आहे. आरोग्य विभागाच्या पाच टीम येथे कार्यरत आहे. तर जगन्नाथ बाबा मंदीर रोड येथे घरांची संख्या 90 आहे. येथील 350 लोकसंख्येसाठी चार टीम कार्यरत आहे. यावेळी बोलतांना ते म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व नागरिकांची पल्स ऑक्सीमीटर व थर्मल स्कॅनर तपासणी करावी. तसेच या भागातून आणखी नमुने तपासणीकरीता पाठवावे. पूर्वीपासून विविध व्याधींनी ग्रस्त नागरिकांवर विशेष लक्ष देऊन त्यांची रोज तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणीदरम्यन सारीची तसेच आयएलआयची लक्षणे असलेले नागरिक आढळल्यास आरोग्य यंत्रणेला माहिती द्या. तसेच सारी आणि आयएलआयची लक्षणे असलेल्या जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करा, असे निर्देश त्यांनी दिले. <p>सर्व नागरिकांनी बाहेर निघतांना मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करा ; सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली मागणी
WANICITY.COM
कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करा ; सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात...
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- <p> <p>देश व राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोरोना या साथीच्या रोगापासून तीन महिने बचावात्मक भूमिका घेतलेल्या वणी शहराला अखेर मुंबई कनेक्शन नडल्याने तेथून कोरोना घेऊन आलेल्या एका कुटुंबाने शहरात कोरोना संक्रमणाची साखळी तयार केली. मोकळ्या वातावरणात वावरणारी जनता भीतीच्या सावटाखाली आली. कोरोनाच्या धास्तीने जनजीवन विस्कळीत झाले. भयमुक्त वातावरणात खुला श्वास घेणाऱ्या शहरातील नागरिकांच्या मनात कोरोनाचा धाक निर्माण झाल्याने शहराचा पार कोंडवाडा झाला आहे. कोरोनाच्या दूषित वातावरणात विरंगुळ्यासाठीही कुण्या परिचितांकडे जाण्यास शहरवासी धजावत नसून आठवड्याभरापूर्वी देश व जिल्ह्याची रुग्णसंख्या जाणून घेणाऱ्या जनतेवर आता काळजीपोटी स्वतःच्याच शहरातील कोरोना विषयक अपडेट जाणून घेण्याची वेळ आली आहे. २० तारखेपासून सुरु झालेली कोरोना बाधितांची आकडेवारी २४ तारखेपर्यंत ६ वर पोहोचली आहे. यादरम्यान शहरात प्रतिष्ठितांच्या झालेल्या मेजवण्याही कोरोना संक्रमणास कारणीभूत ठरते कि काय या ही चिंतेत शहरवासियांचा जीव सुकत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या या काळात वेळेचे बंधन व नियमांचे पालन न करून मेजवान्यांचे आयोजन करून शासनाच्या धोरणाला बगल देणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. <p> <p>शहरातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. दिवसाआड कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात मुबईवरून आलेल्या कुटुंबातील त्या व्यक्ती कोरोना घेऊन आल्याने येथे कोरोना या साथीच्या रोगाने आपले पाय रोवले. हळूहळू संक्रमण वाढत चालल्याने प्रत्येक दिवस कोरोनाच्या दहशतीत उगवत आहे. याच काळात शहरात पार्ट्यांचे आयोजन झाल्याने भीतीचे सावट आणखीनच गडद झाले आहे. राज्यात लॉकडाऊनचा काळ सुरु असून वेळेचेही बंधन देण्यात आले आहे. लग्नसमारंभ व अंत्यविधी करीता नियमांच्या अधीन राहून मर्यादित लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली असली तरी इतर कोणत्याही सामूहिक कार्यक्रमास मुभा देण्यात आलेली नाही. तरी सुद्धा शहरात मेजवान्या देण्यात आल्याने नियमांचे सऱ्हास उल्लंघन झाल्याच्या प्रतिक्रिया शहरातून उमटत असून यानिमित्ताने एकत्रित येणाऱ्यांमुळे कोरोना संक्रमण वाढण्यास वाव मिळतो. त्यामुळे कोरोनाचे बीज रोवण्यास कारणीभूत असणारे व मेजवान्या देऊन कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण करणारे यांना याकाळात योग्य ती खबरदारी न घेता नियमांच्या विपरीत वागल्याने त्यांच्यावर कोव्हीड-१९ अधनियमांतर्गत कार्यवाही करण्याची मागणी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अनिल घाटे, अजय धोबे, दिलीप भोयर, अनिल हेपत, रुपेश ठाकरे, असीम हुसेन, संदीप गोहोकर, अनिकेत चामट, दत्ता दोहे, नितीन तुराणकार, सागर जाधव, गौरव तातकोंडवार यांनी केली आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करा ; सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली मागणी
WANICITY.COM
कोरोना काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करा ; सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निव...
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- <p>देश व राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोरोना या साथीच्या रोगापासून तीन महिने बचावात्मक भूमिका घेतलेल्या वणी शहराला अखेर मुंबई कनेक्शन नडल्याने तेथून कोरोना घेऊन आलेल्या एका कुटुंबाने शहरात कोरोना संक्रमणाची साखळी तयार केली. मोकळ्या वातावरणात वावरणारी जनता भीतीच्या सावटाखाली आली. कोरोनाच्या धास्तीने जनजीवन विस्कळीत झाले. भयमुक्त वातावरणात खुला श्वास घेणाऱ्या शहरातील नागरिकांच्या मनात कोरोनाचा धाक निर्माण झाल्याने शहराचा पार कोंडवाडा झाला आहे. कोरोनाच्या दूषित वातावरणात विरंगुळ्यासाठीही कुण्या परिचितांकडे जाण्यास शहरवासी धजावत नसून आठवड्याभरापूर्वी देश व जिल्ह्याची रुग्णसंख्या जाणून घेणाऱ्या जनतेवर आता काळजीपोटी स्वतःच्याच शहरातील कोरोना विषयक अपडेट जाणून घेण्याची वेळ आली आहे. २० तारखेपासून सुरु झालेली कोरोना बाधितांची आकडेवारी २४ तारखेपर्यंत ६ वर पोहोचली आहे. यादरम्यान शहरात प्रतिष्ठितांच्या झालेल्या मेजवण्याही कोरोना संक्रमणास कारणीभूत ठरते कि काय या ही चिंतेत शहरवासियांचा जीव सुकत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या या काळात वेळेचे बंधन व नियमांचे पालन न करून मेजवान्यांचे आयोजन करून शासनाच्या धोरणाला बगल देणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याची मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. <p>शहरातील कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाने सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली आहे. दिवसाआड कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात मुबईवरून आलेल्या कुटुंबातील त्या व्यक्ती कोरोना घेऊन आल्याने येथे कोरोना या साथीच्या रोगाने आपले पाय रोवले. हळूहळू संक्रमण वाढत चालल्याने प्रत्येक दिवस कोरोनाच्या दहशतीत उगवत आहे. याच काळात शहरात पार्ट्यांचे आयोजन झाल्याने भीतीचे सावट आणखीनच गडद झाले आहे. राज्यात लॉकडाऊनचा काळ सुरु असून वेळेचेही बंधन देण्यात आले आहे. लग्नसमारंभ व अंत्यविधी करीता नियमांच्या अधीन राहून मर्यादित लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली असली तरी इतर कोणत्याही सामूहिक कार्यक्रमास मुभा देण्यात आलेली नाही. तरी सुद्धा शहरात मेजवान्या देण्यात आल्याने नियमांचे सऱ्हास उल्लंघन झाल्याच्या प्रतिक्रिया शहरातून उमटत असून यानिमित्ताने एकत्रित येणाऱ्यांमुळे कोरोना संक्रमण वाढण्यास वाव मिळतो. त्यामुळे कोरोनाचे बीज रोवण्यास कारणीभूत असणारे व मेजवान्या देऊन कोरोनाचे संक्रमण वाढण्याचा धोका निर्माण करणारे यांना याकाळात योग्य ती खबरदारी न घेता नियमांच्या विपरीत वागल्याने त्यांच्यावर कोव्हीड-१९ अधनियमांतर्गत कार्यवाही करण्याची मागणी प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अनिल घाटे, अजय धोबे, दिलीप भोयर, अनिल हेपत, रुपेश ठाकरे, असीम हुसेन, संदीप गोहोकर, अनिकेत चामट, दत्ता दोहे, नितीन तुराणकार, सागर जाधव, गौरव तातकोंडवार यांनी केली आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
जिल्ह्यातील 17 जण कोरोनामुक्त; 11 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर
WANICITY.COM
जिल्ह्यातील 17 जण कोरोनामुक्त; 11 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वाणी :- यवतमाळ, दि. 24 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच जिल्ह्यातील विविध कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर येथे भरती असलेले 17 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 78 वरून 61 वर आला होता. मात्र जिल्ह्यात पुन्हा नव्याने 11 जणांचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आल्याने हा आकडा आता 72 झाला आहे. <p> <p>बुधवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 11 जणांमध्ये पाच पुरुष आणि सहा महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील एक पुरुष, वणी येथील एक पुरुष, दिग्रस येथील एक महिला, दारव्हा येथील एक पुरुष आणि दोन महिला तर नेर येथील दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. <p> <p>वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात सद्यस्थितीत 58 जण भरती आहे. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 258 झाली असून यापैकी सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह 72 आहे. तसेच उपचारानंतर पूर्णपणे बरे झालेल्या 178 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आठ मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आतापर्यंत 4186 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी 4011 रिपोर्ट प्राप्त तर 175 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 3753 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. <p>कोरोनाच्या संकटात नागरिकांच्या आरोग्यासाठी संपूर्ण यंत्रणा झटत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे. बाहेर निघतांना मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. अनावश्यकपणे बाहेर पडू नये. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. आपले हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवावे तसेच सॅनिटायझरचा वापर करावा. या संकटाच्या काळात सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1648
1649
1650
1651
1652
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे