Warora News
लॉगिन
← मागे
🔗
बातम्या
24,771 पोस्ट
🏠 सर्व
🔗 बातम्या
24,771
🛒 सेकण्ड हॅन्ड मार्केट
💼 नोकरी
🏠 रियल इस्टेट
📍 लोकल अपडेट
🔧 सर्विसेस
▶️ व्हिडिओज लिंक
🎉 इव्हेंट्स
🎊 शुभेच्छा
🏷️ ऑफर
🏪 स्थानिक दुकान
📂 सरकारी योजना
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरात आणखी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या झाली सहा !
WANICITY.COM
शहरात आणखी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या झाली सहा !
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p><p>शहरात आणखी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आता ६ झाली आहे.शहरात २० तारखेला मुंबईवरून आलेले दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांच्या संपर्कातील व्यंक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेऊन त्यांना संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले असून एकूण ५९ व्यक्तींचे स्वाब तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ३७ कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. २० रिपोर्ट येणे बाकी होते. आज आणखी एका व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांची संख्या आता ६ वर पोहचली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाच्याही चिंतेत भर पडली आहे.३७ अहवाल निगेटिव्ह आल्याने कोरोना बाधितांचा आकडा वाढणार नाही असे वाटत असतांनाच आणखी एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याआता कोणता आकडा गाठेल या चिंतेने प्रशासनाबरोबरच शहरवासीयांनाही ग्रासले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरु झाले रोडच्या दुरुस्तीचे काम
WANICITY.COM
ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरु झाले रोडच्या दुरुस्तीचे काम
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- <p><p><p><p><p>शहरातील वार्ड क्रमांक २ मधील विठ्ठलवाडी परिसरातून एस.बी. लॉन जवळून वणी वरोरा रोडवर निघणाऱ्या मुख्य रस्त्याचे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर दुरुस्तीकरणाचे काम सुरु करण्यात आले असून याकरिता संपूर्ण रस्ता खोदून काढण्यात आल्याने पावसामुळे तयार झालेल्या चिखलातून मार्ग काढतांना नागरिकांना नानाविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चिखलमय रस्त्यावरून दुचाकीने जातांना घसरून पडून अपघात होण्याची भीती निर्माण झाली असून रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाच वर्षापूर्वी या रोडचे डांबरीकरन करण्यात आले होते.रोडवर जागोजागी खड्डे पडल्याने या रोडच्या दुरुस्तीकरणाची मागणी सुरु होती. लॉकडाऊनमुळे ठप्प पडलेली खनिज निधी अंतर्गत करण्यात येणारी रोडची कामे ऐन पावसाळा लागतांना सुरु झाल्याने मार्गक्रमण करतांना नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. त्यातल्यात्यात शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने संबंधित परिसराकडे जाणारे मार्ग सील करण्यात आल्याने विठ्ठलवाडी, गौरकार कॉलोनी व रेल्वे क्वार्टर कडे जाणारे पर्यायी रस्तेही बंद झाल्याने नागरिकांचा मनःस्ताप वाढला आहे. <p><p><p><p><p>शहरातील विठ्ठलवाडी परिसरातून मुख्य बाजारात जाणारा हाच एकमेव सोयीचा रस्ता आहे. गौरकार कॉलोनी व रेल्वे क्वार्टर परिसरातील नागरिकांच्या अवागमनाचा हाच एकमेव सोयीचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु असते. छोटी मोठी दैनंदिन गरजेची दुकानेही याच रस्त्यावर आहे. या परिसरात शासकीय व निमशासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग मोट्या प्रमाणात वास्तव्याला आहे. दररोज कामाच्या ठिकाणी वेळेत जाण्याच्या लगबगीत असणाऱ्या या वर्गाचे येण्या जाण्याचे रुटीन बिघडले असून गल्लीबोळातून मार्ग शोधून मुख्य रास्ता गाठावा लागत असल्याने त्यांचा जास्तीचा वेळ खर्ची जातो आहे. पाऊस पडला की काम बंद व नंतर पावसामुळे झालेल्या चिखलानेही काम बंद राहत असल्याने आता हा रोड तयार होण्याकरिता नेमका किती कालावधी लागतो हे सांगणे कठीण झाले आहे. लॉकडाऊनमुळे रोडच्या दुरुस्तीकरणाची कामे बंद असल्याने सध्यास्थितित असलेल्या रोडवरही पावसाळ्याचे दिवस निघाले असते. पावसाळा संपल्यानंतरही रोडचे काम सुरु करता आले असते. अशा प्रतिक्रिया आता विठ्ठलवाडी परिसरातील नागरिकांमधून उमटत आहे. खनिज विकास निधीअंतर्गत मंजूर झालेल्या या रस्त्याचे दुरुस्तीकरणाचे काम सुरु असून विठ्ठलवाडी परिसरातून मुख्य बाजारपेठेकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खोदण्यात आला आहे. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरु करण्यात आल्याने पावसामुळे कामामध्ये व्यत्यय निर्माण होत असल्याने कामाचा वेग मंदावला आहे. शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने सर्वच पर्यायी मार्ग बंद झाल्याने या परिसरातील लोकांना ड्युटी,बाजार व दवाखान्यामध्ये जाण्याकरिता याच चिखलमय रस्त्यावरून मार्ग काढावा लागत असल्याने याठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पावसाने उसंत दिल्यानंतर दिवसरात्र काम सुरु ठेऊन या रस्त्याच्या दुरुस्तीकरणाचे काम जलद गतीने पूर्ण करून रस्ता रहदारीकरिता मोकळा करून देण्याची मागणी या परिसरातील रहिवासीयांकडून केल्या जात आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरात ३७ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, रुग्ण संख्या ५ वर कायम
WANICITY.COM
शहरात ३७ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह, रुग्ण संख्या ५ वर कायम
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- <p>शहरात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्या नंतर त्यांच्या संबंधातील व संपर्कातील व्यक्तींचा युद्धपातळीवर शोध घेतल्या जात असून आतापर्यंत ५९ संशयितांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले असून त्यांचे स्वाब घेऊन तपासणी करीता पाठविण्यात आले होते. ५९ नमुन्यांपैकी ३९ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ३७ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला असून शहरवासियांमध्ये थोडी भीती तर थोडे समाधान पाहायला मिळत आहे. आणखी २० नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५ वर कायम आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३ व्यक्तींवर नागपूर येथे उपचार सुरु असून २ व्यक्ती वणी येथे संस्थात्मक विलीगीकरणात आहे. <p>२० जूनला शहरात दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाने खबरदारीच्या प्रत्येक उपायांबरोबरच त्यांच्या संपर्कातील नागरिकांचे शोधकार्य सुरु केले. त्यानंतर अल्पावधीतच एक आणखी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तर २३ जूनला २ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोना बाधितांची संख्या ५ झाली. शोध मोहिमेअंतर्गत २१ जूनला १५ नमुने, २२ जूनला २८, २३ जूनला १६ असे एकूण ५९ संशयित व्यक्तींचे स्वाब घेऊन तपासणी करीता पाठविण्यात आले. त्यापैकी ३९ चाचणी अहवाल प्राप्त झाले असून २ पॉझिटिव्ह तर ३७ संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे वेळीच उपाय योजना केल्याने प्रशासनाला कोरोनाची साखळी तोडण्यात काही प्रमाणात यश आले असून नागरिकांमधेही समाधान पाहायला मिळत आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरातील आणखी दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली पाच !
WANICITY.COM
शहरातील आणखी दोन व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या झाली पाच !
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- <p>शहरात मुंबईवरून आलेल्या दोन कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आणखी दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या आता पाच झाली आहे. यातील तीन रुग्ण नागपूर येथे उपचार घेत असून दोन व्यक्ती वणी येथे संस्थात्मक विलीगीकरणात आहे. <p>शहरात महावीर भावनासमोरील निवासस्थानी मुंबईवरून आलेल्या एका कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या नंतर त्यांच्या परिवारातील व परिचयातील लोकांचा शोध घेऊन त्यांचे स्वाब तपासणी करीता पाठविण्यात आले होते. त्यातील आणखी दोन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे. २० जून पासून २३ जूनपर्यंत ३ रुग्णांची भर पडली असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेतल्या जात असून आतापर्यंत ५८ व्यक्तींना विलगीकरणात हलविण्यात आले असून ४२ जणांचे स्वाब तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १० निगेटिव्ह तर दोन व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. रुंगणाची संख्या वाढीस लागल्याने प्रशासनाबरोबरच शहरवासीही चिंतेत पडले आहेत. तपासणी करीता पाठविण्यात आलेल्या स्वाबचे आणखी रिपोर्ट येणे बाकी असून रुग्णांच्या संख्येत आणखी किती वाढ होईल या चिंतेने आता सर्वांनाच ग्रासले आहे. तरी प्रशासन ही साखळी तोडण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करीत असून शहरवासियांनीही सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
वणीत आणखी दोन रुग्णाची भर, एकूण संख्या पाच
WANICITY.COM
वणीत आणखी दोन रुग्णाची भर, एकूण संख्या पाच
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p> यवतमाळ, दि. 23 : गत दोन तीन दिवसांपासून 63 वर स्थिरावलेल्या ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांच्या संख्येत मंगळवारी अचानक वाढ झाली. आज दिवसभरात 15 जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले आहे. यात नेर येथील 10 जण, दिग्रस आणि वणी येथील प्रत्येकी दोन तर एक दारव्हा येथील व्यक्ती पॉझेटिव्ह आला आहे. <p>शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 26 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 15 पॉझेटिव्ह तर 11 निगेटिव्ह रिपोर्ट आहे. निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्यांमध्ये दारव्हा येथील सहा, नेर येथील तीन, वणी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 78 आहे. तसेच 24 तासात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला 224 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. <p>वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 82 जण भरती आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 3971 नमुने तपासणीकरीता पाठविले असून यापैकी 3673 प्राप्त तर 298 अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या 247 आहे. यापैकी 78 एक्टिव पॉजिटिव्ह असून 161 लोकांना बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात 8 लोकांच्या मृत्युची जिल्ह्यात नोंद असून सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 3452 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अत्यंत दुःखद : पती गेला सती !! - नवविवाहित पत्नीच्या चितेवर पतिने घेतली उडी ! गर्भवती पत्नीचा परवा सापडला होता मृतदेह #found-dead
WANICITY.COM
अत्यंत दुःखद : पती गेला सती !! - नवविवाहित पत्नीच्या चितेवर पतिने घेतली उडी ! गर्भवती पत्नीचा परवा सापडला होता...
चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिंपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील गावालगत असलेल्या विहिरीत काल (रविवार) एका 19 वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला. रुचिता चित्तावार हीचा विवाह किशोर खाटीक याच्याशी 19 मार्च रोजी झाला होता. ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती. मात्र, चार दिवसांपूर्वी रुचिता भंगाराम तळोधी येथे आली होती. ती तीन महिन्यांची गर्भवती होती. <p> <p>काल सायंकाळच्या सुमारास शौचास बाहेर पडली. परंतु, बराच वेळपर्यंत घरी परतली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली. दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ लोटा आणि चप्पल आढळून आले. गोंडपिपरी पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रुचिताचा मृतदेह आढळून आला. <p> <p>रुचिताच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, याचा मोठा आघात पती किशोर खाटीक यांच्यावर झाला. आज (सोमवार) दुपारी रुचितावर अंत्यसंस्कार होत होते. पती किशोर ह्याने तिला चिताग्नी दिली. मात्र, त्याच्या मनात दुसरेच काही सुरू होते. दरम्यान, पत्नीचे पार्थिव पेट घेतल्यानंतर त्याने थेट चितेतच उडी घेतली. <p> <p>यात मोठया प्रमाणात किशोर जळाला. गावातील नागरिकांनी त्याला बाहेर काढले. परंतु, पत्नीच्या विरहात बहुदा त्याला एक क्षणही राहायचे नव्हते. अखेर त्याने धाव घेत थेट विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आणि चक्क बैलबंडीवरच वीज पडली, शेतकऱ्याचा मृत्यू
WANICITY.COM
आणि चक्क बैलबंडीवरच वीज पडली, शेतकऱ्याचा मृत्यू
(घुग्गुस ) येथून चार किमी अंतरावर असलेल्या शेणगाव येथील शेतकरी शंकर संभाजी वैद्य वय 35 वर्ष हा आज शेतीचे कामे आटपुन शेतातून बैल बंडीने घरी जात असताना दुपारी चार वाजता दरम्यान मुसळधार पाऊस पडला व विजा कडाडल्या पावसातच घरी जात असतांना अंगावर वीज पडून शंकरचा जागीच मॄत्यु झाला.</p> <p>मृतक शंकरला 4 बहिणी 2 मुले पत्नी असा मोठा आप्त परिवार आहे.</p> <p>पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.</p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
शहरात आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या आता तीन झाली !
WANICITY.COM
शहरात आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या आता तीन झाली !
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- शहरातील दोन व्यक्तींना कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला असतांनाच त्यात आणखी एका रुग्णाची भर पडली असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असून ऍक्टिव पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता तीन झाली आहे. या सर्व रुग्णांवर नागपूर येथे उपचार सुरु असून आतापर्यंत ३६ व्यक्तींना पळसोनी येथील संस्थात्मक विलीगीकरणात हलविण्यात आले आहे. तसेच या व्यक्तींशी जवळून संपर्क आलेल्या व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेणे सुरु आहे. <p>वणी वरोरा रोडवरील महावीर भावनासमोरील निवासस्थानातील दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णाच्या घरासभोतालचा १५० मीटर परिसर सील करण्याबरोबरच वार्ड क्र. ३ मधील साई दरबार व शांतिपार्क परिसर परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करून या परिसराच्या सर्व सीमा प्रशासनाने सील केल्या आहे. पुढील आदेशापर्यंत याठिकाणचे अवागमन बंद करण्यात आले असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरातील रहिवासी असलेल्या प्रत्येक नागरिकांचे आरोग्य विभागाकडून आशा सेविकांमार्फत सकाळ सायंकाळ थर्मल स्क्यानिंग करण्यात येत आहे. कोरोना बाधित व्यक्तींच्या वा त्यांच्या परिवारातील सदस्यांच्या संपर्कातआलेल्या ३६ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरणात ठेवण्यात आले असून इतरही व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेतल्या जात आहे.अशातच आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे. शहरवासियांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी अकारणघराबाहेर बाहेर पडणे बंद केले आहे. मास्क न लावता कोरोनाची साथ निवळल्याच्या अविर्भावात वावरणाऱ्यांच्या तोंडावरही आता मास्क परत आले आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःची खबरदारी घेतांना दिसत आहे. रविवारी बाजाराच्या दिवशीही शहरात वर्दळ जाणवत नव्हती. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शहरातील प्रत्येक रस्त्यांवर ओसंडून वाहणारा जनप्रवाह शहरात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे कळताच काही अंशी संथ झाला आहे. शहर कोरोनमुक्त असल्याने शहरवासीही भीतिमुक्त होते. उपाय योजनांचे नियमही ते सहजतेने घेत होते. परंतु आता अधिकृतपणे कोरोना रुग्ण आघळल्याने प्रशासनही आता नियमांची कठोर अंमलबजावणी करणार आहे. त्यामुळे जनतेलाही सावधगिरीने राहण्याबरोबरच शासनाच्या कोरोना संदर्भातील प्रत्येक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. तेंव्हा नागरिकांनी भयभीत न होता सावधगिरी बाळगून अनावश्यक गर्दी टाळण्याचे आव्हान प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला वार्ड क्रमांक ३ मधील तो परिसर सील, या भागाकडे येणारे सर्वच रस्ते व सीमा बंद
WANICITY.COM
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला वार्ड क्रमांक ३ मधील तो परिसर सील, या भागाकडे येणारे सर्वच रस्ते व सीमा बंद
प्रशांत चंदनखेडे वणी :- <p>मुंबई येथून शहरात आलेल्या एका कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून शहरातील गजबजलेले रस्ते आज ओस पडल्यागत जाणवत होते. पॉझिटिव्ह रुग्णांवर नागपूर येथे उपचार सुरु असून त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना पळसोनी येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वाब घेऊन कोरोना लॅब मध्ये तपासणी करीता पाठवण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली आहे. <p> <p>वणी वरोरा मार्गावरील महावीर भवनासमोर असलेल्या निवासस्थानी ११ जूनला मुंबईवरून एक कुटुंब आले. त्यातील दोन व्यक्तींना कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्याने ते तपासणी करिता नागपूरला गेले. तेथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच प्रशासनाने २० जूनला सायंकाळच्या सुमारास महावीर भावनासमोरील त्यांचे घर गाठत घरातील ९ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरण कक्षात पाठविण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेऊन आज २१ जूनला आणखी ५ व्यक्तींना विलीगीकरण कक्षात हलविले असल्याने एकूण १४ जणांचे स्वाब घेऊन ते कोरोना लॅब मध्ये तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. <p> <p>कोरोनाबाधित व्यक्तींच्या घरासभोतालचा १५० मीटर परिसर सील करण्यात आला असून परिसरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य विभागांतर्गत आशा सेविकांतर्फे सकाळ सायंकाळ स्कॅनिंग करण्यात येत आहे. राज्य, विदर्भ व जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊनही तीन महिने कोरोनामुक्त राहिलेल्या वणी शहरात कोरणाचा शिरकाव झाल्याने एकीकडे शहरवासी धास्तावले आहे तर दुसरीकडे प्रशासन गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने नागरिकही निश्चिंत होऊन शहरात वावरायचे. शासनाचे उपाययोजनात्मक नियमांनाही सहजतेने घ्यायचे. परंतु आता अधिकृतरित्या कोरोना रुग्ण आढळल्याने मार्गदर्शक तत्वांची कठोर अंमलबजावणी प्रशासनातर्फे केली जाणार आहे. त्यानुसार कोरोना बाधित रुग्ण आढळलेला वॉर्ड क्रमांक ३ (साई दरबार व शांतिपार्क परिसर) हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या भागाला पूर्णपणे सील करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत या भागातील अवागमन बंद राहणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्या करिता ही उपाय योजना आवश्यक असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी सांगितले आहे. यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीची बॉण्ड्री व डीपी रोड, तुकडोजी महाराज सभागृहा कडील मोहितकार व वऱ्हाटे यांचे घर, महादेव मोटर्स समोरील रास्ता व गौरकार यांचे घर, धवस ,दीपक छाजेड व गुप्ता यांचे घर, या भागातील सर्व सीमा व रस्ते पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक शासनाच्या सेवेतील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनाच याठिकाणी अत्यावश्यक सेवा, सुविधा पुरविण्यास जाण्याची मुभा राहील. या व्यतरिक्त कोणत्याही सामान्य नागरिकास याठिकाणी जाण्या येण्यास पूर्णतः बंदी असेल. या ठिकाणी आढळलेल्या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांपासून परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासकीय यंत्रणेने उचललेले हे उपाय योजनात्मक पाऊल असून जनतेने शासनाने सुचविलेल्या कोरोना प्रतिबंधक सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हानही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला वार्ड क्रमांक ३ मधील तो परिसर सील, या भागाकडे येणारे सर्वच रस्ते व सीमा बंद
WANICITY.COM
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला वार्ड क्रमांक ३ मधील तो परिसर सील, या भागाकडे येणारे सर्वच रस्ते व सीमा बंद
प्रशांत चंदनखेडे वणी :-<br> मुंबई येथून शहरात आलेल्या एका कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याचे प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केल्याने शहरात एकच खळबळ उडाली असून शहरातील गजबजलेले रस्ते आज ओस पडल्यागत जाणवत होते. पॉझिटिव्ह रुग्णांवर नागपूर येथे उपचार सुरु असून त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या १४ जणांना पळसोनी येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या सर्वांचे स्वाब घेऊन कोरोना लॅब मध्ये तपासणी करीता पाठवण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी दिली आहे. <p>वणी वरोरा मार्गावरील महावीर भवनासमोर असलेल्या निवासस्थानी ११ जूनला मुंबईवरून एक कुटुंब आले. त्यातील दोन व्यक्तींना कोरोना सदृष्य लक्षणे आढळल्याने ते तपासणी करिता नागपूरला गेले. तेथे त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने याबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच प्रशासनाने २० जूनला सायंकाळच्या सुमारास महावीर भावनासमोरील त्यांचे घर गाठत घरातील ९ व्यक्तींना संस्थात्मक विलीगीकरण कक्षात पाठविण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा युद्ध पातळीवर शोध घेऊन आज २१ जूनला आणखी ५ व्यक्तींना विलीगीकरण कक्षात हलविले असल्याने एकूण १४ जणांचे स्वाब घेऊन ते कोरोना लॅब मध्ये तपासणी करीता पाठविण्यात आले आहे. <p>कोरोनाबाधित व्यक्तींच्या घरासभोतालचा १५० मीटर परिसर सील करण्यात आला असून परिसरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींचे आरोग्य विभागांतर्गत आशा सेविकांतर्फे सकाळ सायंकाळ स्कॅनिंग करण्यात येत आहे. राज्य, विदर्भ व जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊनही तीन महिने कोरोनामुक्त राहिलेल्या वणी शहरात कोरणाचा शिरकाव झाल्याने एकीकडे शहरवासी धास्तावले आहे तर दुसरीकडे प्रशासन गंभीर झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात कोरोनाचा रुग्ण न आढळल्याने नागरिकही निश्चिंत होऊन शहरात वावरायचे. शासनाचे उपाययोजनात्मक नियमांनाही सहजतेने घ्यायचे. परंतु आता अधिकृतरित्या कोरोना रुग्ण आढळल्याने मार्गदर्शक तत्वांची कठोर अंमलबजावणी प्रशासनातर्फे केली जाणार आहे. त्यानुसार कोरोना बाधित रुग्ण आढळलेला वॉर्ड क्रमांक ३ (साई दरबार व शांतिपार्क परिसर) हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या भागाला पूर्णपणे सील करण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत या भागातील अवागमन बंद राहणार आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्या करिता ही उपाय योजना आवश्यक असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी सांगितले आहे. यानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीची बॉण्ड्री व डीपी रोड, तुकडोजी महाराज सभागृहा कडील मोहितकार व वऱ्हाटे यांचे घर, महादेव मोटर्स समोरील रास्ता व गौरकार यांचे घर, धवस ,दीपक छाजेड व गुप्ता यांचे घर, या भागातील सर्व सीमा व रस्ते पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. अत्यावश्यक शासनाच्या सेवेतील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांनाच याठिकाणी अत्यावश्यक सेवा, सुविधा पुरविण्यास जाण्याची मुभा राहील. या व्यतरिक्त कोणत्याही सामान्य नागरिकास याठिकाणी जाण्या येण्यास पूर्णतः बंदी असेल. या ठिकाणी आढळलेल्या कोरोना बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांपासून परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ नये या दृष्टिकोनातून प्रशासकीय यंत्रणेने उचललेले हे उपाय योजनात्मक पाऊल असून जनतेने शासनाने सुचविलेल्या कोरोना प्रतिबंधक सूचना व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आव्हानही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मुंबई येथून शहरात आलेल्या दोन व्यक्तींना कोरोनाची लागण, माहिती मिळताच प्रशासन हादरले
WANICITY.COM
मुंबई येथून शहरात आलेल्या दोन व्यक्तींना कोरोनाची लागण, माहिती मिळताच प्रशासन हादरले
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- <p>शहरातील वणी वरोरा रोड वरील महावीर भवनासमोर वास्तव्य असलेल्या व्यक्तीकडे काही दिवसांआधी मुंबईवरून आलेल्या कुटुंबातील सदस्यांपैकी दोन जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझीटीव्ह आला असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. <p>१२ जूनला मुंबईवरून एक कुटुंब शहरातील व्यक्तीकडे आलं. त्या कुटुंबातील दोन व्यक्तींना कोरोना सदृष्य लक्षणे जाणवू लागल्याने ते नागपूर येथे तपासणी करीता गेले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्याने त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाला माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मोठा ताफा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या व्यक्तीच्या निवासस्थानी पोहचला. प्रशासकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी व पोलीसांचा मोठा फौज फाटा पाहून नागरिकांचीही चाचपणी सुरु झाली. अशातच परठिकाणावरून आलेले दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची घटका काहींच्या कानावर पडताच ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने शहरवासियांमध्ये एकच खळबळ उडाली. आजपर्यंत कोरोनाचा शिरकाव न झालेल्या वणी शहरात बाहेरील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने कोरोना पसरेल काय, ही भीती शहरवासीयांच्या मनात निर्माण झाली आहे. शहर व तालुका कोरोना मुक्त असल्याने नागरिकही बिनधास्तपणे शहरात वावरायचे, बाजारपेठेत मुक्त संचार करायचे. परंतु ही वार्ता पसरताच त्यांच्यावर दडपण जाणवत होते. प्रत्येक व्यक्ती एकमेकांना फोन करून याबाबत माहिती जाणून घेतांना निशब्द होत होता. प्रशासनाने येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेणे सुरु केले असून त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांना पळसोनी येथील कोव्हिड केयर सेंटरमध्ये नेण्यात आले आहे. महावीर भावनासमोरील निवासस्थानात हे रुग्ण आढळल्याने या परिसराबाबत प्रशासनाकडून कोणते खबरदारीचे उपाय योजले जातात हे लवकरच कळणार आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
मुख्य महाव्यवस्थापकांचे चौकशी पथक सीसीआयच्या कापूस खरेदीतील घोळ शोधतील काय ?
WANICITY.COM
मुख्य महाव्यवस्थापकांचे चौकशी पथक सीसीआयच्या कापूस खरेदीतील घोळ शोधतील काय ?
<p>प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी<p> :- सीसीआयच्या कापूस खरेदी प्रणाली बाबत सर्वत्र टीकेची झोड उठत असतांना या कापूस खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करण्याची जबाबदारी घेऊन जिल्ह्यात दाखल झालेल्या मुख्य महाव्यवस्थापक पथकाने वणी शहरातील सीसीआयच्या कापूस केंद्राची चौकशीही न करता त्यांचीच बाजू उचलून धरल्याने ही चौकशी फुसका बार ठरली आहे. <p>कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अर्थात सीसीआयची कापूस खरेदी सुरुवातीपासूनच दोषपूर्ण राहिली आहे. शेतीचा हंगाम निकट येत असतांना शेतकऱ्यांची आर्थिक गरज लक्षात घेता शासनाने शेतमालाच्या खरेदीला प्राधान्य देत कापूस खरेदी केंद्रांना लॉकडाऊन मधून सूट देऊन सीसीआय अंतर्गत कापूस खरेदीला सुरुवात केली.सीसीआयची कापूस खरेदी प्रणाली कास्तकारांच्या नाव नोंदणी पासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिली. सहकार समितीच्या अहवालाने याबाबत स्पष्टताही दिलेली आहे. तासंतास रांगेत उभे राहून कास्तकारांनी नाव नोंदणी केली तर काहींनी ऑनलाईन नाव नोंदविले. परंतु खऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांनी विक्री करिता आणलेला कापूस नाकतोंड मुरडत काही प्रमाणात सीसीआयने खरेदी केला तर बहुतांश शेतकऱ्यांना कापूस निकृष्ट दर्जाचा असल्याचे कारण सांगून ग्रेडरने तो परस्पर नकारल्याचे चित्र सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रांवर पाहायला मिळाले. मग हवालदिल होऊन शेतकऱ्यांनी खाजगी बाजारात पडल्या दरात कापूस विकल्यानंतर तोच कापूस ग्रेडरशी साटेलोटे करून व्यापाऱ्यांनी सीसीआयकडे विक्रीस आणला असता सीसीआयने डोळे बंद करून तो कापूस खरेदी केला. कास्तकारांकडून आलेल्या कापसाच्या खरेदीला बगल देत नंतर या बगलबच्यांकडून आलेल्या कापसाची डोळेझाकपणे खरेदी करणाऱ्या या यंत्रने विरुद्ध कास्तकार वर्गांमध्ये कमालीची चीड निर्माण झाली व त्यांनी तक्रारीच्या माध्यमातून सीसीआयची अर्थपूर्ण कापूस खरेदी प्रणाली उजेडात आणली. सीसीआयच्या कापूस घोटाळा प्रकरणाच्या तक्रारी सीसीआयचे मुंबई येथील मुख्य महाव्यवस्थापक एस.के. पाणीग्रही यांच्या पर्यंत गेल्या. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचा पवित्रा त्यांनी घेतल्याने ग्रेडर व जिनिंग प्रेसिंग मालकाचे धाबे दणाणले. त्यांनी चौकशीत काही निष्पन्न होऊ नये याकरिता जीवापाड प्रयत्न केले. याचदरम्यान मुकुटबन व आबई येथील जिनिंगला आग लागून लाखोंचा कापूस आगीत भस्मसात झाला. परंतु या आगीतून निघालेला संशयाचा धूर प्रत्येकाच्याच डोळ्यात खुंल्याने या आगीच्या गबाडाची चर्चा अगदी खुल्या शब्दात होऊ लागली. कास्तकारांच्या कापसाची खरेदी करतांना अगदी बारकाईने पाहणी करणारे खरेदीनंतर बारीक लक्ष का ठेवत नाही असे अनेक प्रश्न या आगीच्या ज्वाळांनी निर्माण केले. १५०० ते १८०० क्विंटल कापूस जाळल्याची नोंद झाली पण प्रत्येक्षात एवढा कापूस जळाला का, नेमकी ठिणगी कुठे पडली या संपूर्ण चौकशीची जबाबदारी घेऊन एस.के. पाणिग्रही आपल्या पथकासह जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी मुकुटबन येथील बालाजी जिनिंगला भेट देऊन आगजळीत प्रकरणाची चौकशी केली. त्यांनी संपूर्ण कापूस जळाला नसून त्याठिकाणी कापूस शिल्लक असून ओला कापूस वाळविला जात असल्याचे तपासाअंती स्पष्ट केले. तसेच ३० टक्केच नुकसानीचा दावा विमा कंपन्यांकडे करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. मशीनमधे कापसाबरोबर दगडाचा तुकडा गेल्याने व त्यातून ठिणगी उडाल्याने सादर आग लागल्याचे प्रथमदर्शनी सांगितल्या गेले. त्यात सत्यता जाणवत असली तरी आगीचे प्रत्येक पैलू तपासले जाणार असल्याचे मुख्य महाव्यवस्थापकांनी स्पष्ट केले आहे. त्यांच्या बरोबर अकोला येथील महाव्यवस्थापक अजय कुमारही उपस्थित होते. <p>वणी केंद्राच्या आबई येथील अमृत जिनिंगलाही २८ फेब्रुवारी लागली होती. त्यातही सीसीआयचा लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला. वणी येथील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची लुबाडणूक व फसवणूक करण्यात येऊन ग्रेडरच्या आर्थिक सलोख्याने व्यापाऱ्यांचेच हीत जोपासल्या जात असल्याने शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांचाच कापूस सीसीआयने मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याची ओरड असतांनाही याठिकाणी पथकाने करण्याचे टाळल्याने नानाविध प्रश्न निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांच्या कापसाला नाकारून नंतर तोच कापूस व्यापाऱ्यांकडून एफक्यु दराने खरेदी केल्याने सीसीआयची कापूस खरेदी संशयाच्या भोवऱ्यात आली असतांना व ग्रेडरने व्यापाऱ्याचे हीत जोपासण्यातून करोडोचे आर्थिक व्यवहार झाले असतांनाही वणी येथे चौकशी करीता पथक आले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या बाष्पीभवनातून निर्माण झालेल्या काळ्या ढगांमधून पडलेल्या पैशाच्या पावसात आता किती लोक ओले झाले आहेत सांगणेही कठीण झाले आहे. कास्तकारांकडेच शेती आहे असे नाही. धनदांडग्यांनीही काल्याचे पांढरे करण्याकरिता शेट्ये घेऊन ठेवल्या आहे. कापसाची दलाली करणाऱ्यांकडेही शेट्ये आहेत. त्यामुळे सातबारा उपलब्ध होणे मोठी गोष्ट राहिलेली नाही. तलाठ्याला पैशाचे आमिष देऊन सातबाऱ्यावर कापसाचा पेरा चढवणेही अवघड काम नाही. त्यामुळे नुसता सातबारा वापरल्याने लाखोंची माया मिळत असल्याने त्याच क्षेत्रातील लोकांकडून शेकडो सातबारे व्यापाऱ्यांना उपलब्ध होतात. मग हे कापसाचा पेरा चढवलेले सातबारे वापरून शेतकऱ्यांकडून अल्पदरात खरेदी केलेला कापूस ग्रेडरशी आर्थिक व्यवहार करून सीसीआयला एफक्यु दराने विकल्या जातो. शेतामध्ये घाम गाळून पिकविलेल्या कापसाचा कास्तकाराला योग्य मोबदला न मिळता व्यापारी, ग्रेडर व संबंधित अधिकारीच कापसाच्या माध्यमातून लाखो रुपये कमवून मारत असल्याने " मेहनत करे मुर्गा, अंडा खाये फकीर" अशी परिस्थिती आज सर्वत्र निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्य महाव्यवस्थापकांच्या चौकशीत काय निष्पन्न होते व ते ही खेळी खेळणाऱ्यांविरुद्ध काय कार्यवाही करतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले होते. परंतु त्यांनी नानाविध कारणे समोर करून चौकशीच करणे टाळल्याने त्यांची ही चौकशी फुसका बार ठरली आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापारीच डल्ला मारत राहिले व त्यांची चौकशीही गुलदस्त्यात राहिली तर शेतकऱ्यांचे अच्छे दिन आल्यातच जमा झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांच्या कष्टाचे फळ मध्यस्थांच्या घशात जाण्याची ही परंपरा कुठे तरी थांबायला हवी त्याकरिता योग्य नियोजन व उपाय योजनांची आवश्यकता असण्याबरोबरच संबंधित विभागाकडे देण्यात आलेल्या जबाबदारीची योग्य अमलबजावणी होत आहे किंवा नाही याची चौकशी होणे ही गरजेचे असते. हीच भावना आज समस्त वर्गातून उमटत आहे. <p>
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
Job | Pre-School Teacher Requirement Life Educare Pvt Ltd , Location: Pusad, MH
WANICITY.COM
Job | Pre-School Teacher Requirement Life Educare Pvt Ltd , Location: Pusad, MH
Job description <p>Immediate requirement for Pre-Primary Teacher. <p> <p>Location: Pusad, MH <p>Qualification: Minimum Bachelors with NTT/MTT/ECCE training or 1-3 yrs of Pre-school Experience <p>Salary: 12000-15000 per month + acc <p>Institution: CBSE Residential School <p> <p>Details: <p>must have average to good communication skills <p>must have experience creating lesson plans and engaging the students with various activities <p> <p>NOTE: must be willing to relocate to Pusad, MH <p> <p> <p>Contact Details <p>hr@lifeeducare.com
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
अवैध रेती वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त , महसूल व पोलीस विभागाची धडक कारवाई
WANICITY.COM
अवैध रेती वाहून नेणारे दोन ट्रॅक्टर जप्त , महसूल व पोलीस विभागाची धडक कारवाई
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- <p> <p>अवैध रेती वहन करीत असलेल्या दोन ट्रॅक्टरवर कारवाई करून ते ताब्यात घेण्यात आले. महसूल प्रशासन व पोलीस विभाग यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. नांदेपेरा जवळील सोनापूर नजीक अवैध रेतीची वाहतूक करीत असल्याचे आढळल्याने हे दोन्ही टॅक्टर जप्त करण्यात आले. ही कारवाई १९ जूनला रात्री ३ वाजताच्या सुमारास करण्यात आली. <p> <p>नांदेपेरा जवळील वाघाळा नाल्याजवळ रेती तस्करांनी मोठा रेती साठा जमा करून ठेवला असून येथून मागील काही दिवसांपासून रेती तस्करी सुरु असल्याचे सांगण्यात येते. रेती तस्करांकडून होत असलेल्या अवैध रेती वाहतुकीची आधी पासूनच ओरड सुरु असून वृत्त पत्रातूनही या रेती साठ्या विषयीचे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. १८ जूनला नायब तहसीलदार वैभव पवार यांना रेती तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे व सुनील खंडागळे त्यांच्यासह रात्री उशिरा सापळा रचून नंबर नसलेले दोन ट्रॅक्टर अवैध रेती वहन करीत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर जप्तीची कार्यवाही करून दोन्ही ट्रॅक्टर पोलीस स्टेशनमध्ये लावले. सदर दोन्ही ट्रॅक्टर भांडेवाडा येथील माजी सरपंच प्रेमानंद भाऊराव धानोरकर यांच्या मालकीचे असून त्यांच्यावर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नायब तहसीलदार वैभव पवार यांनी दिली आहे.
लाईक
कमेंट
शेअर
k
ketan 33
6 years ago
·
बातम्या
शेअर करा
पोस्ट पाहा
मूळ बातमी उघडा
आर.आर. ढाब्यामध्ये सुरु असलेल्या जुगारावरील धाडित १३ आरोपींना अटक
WANICITY.COM
आर.आर. ढाब्यामध्ये सुरु असलेल्या जुगारावरील धाडित १३ आरोपींना अटक
प्रशांत चंदनखेडे प्रतिनिधी वणी :- वणी यवतमाळ बायपास मार्गावरील विद्यानगरी परिसरात आर.आर. ढाब्यामध्ये जुगार खेळत असलेल्या १३ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी लॉकडाऊन काळात छुप्या पद्धतीने घर व मोहल्ल्यात भरविण्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या सर्वच प्रकारच्या जुगारांवर धाडी टाकून जुगार खेळणाऱ्यांचे अटक सत्र चालवले असतांनाच जुगारीही शक्कल लढवून अशा गोपनीय ठिकाणी जुगार भरवितात की संशय करण्याची जागाही उरात नाही. परंतु मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वर्तुळावर बारीक नजर ठेऊन असलेल्या पोलिसांनी शहरातील प्रत्येक अपप्रकारांवर आळा घालण्याचे उद्दिष्ट जोपासले आहे. ढाब्यातील जुगारावरील धाड सत्राने जुगार खेळणाऱ्यांचे आता चांगलेच धाबे दणाणले आहेत. <p> <p>वणी यवतमाळ बायपास राज्य महामार्गावरील विद्यानगरी परिसरातील आर.आर. ढाब्यामध्ये जुगार सुरु असल्याच्या माहितीच्या आधारे डीबी पथकाने त्याठिकाणी धड टाकून जुगार खेळत असलेल्या १३ आरोपींना अटक केली असून त्यांच्या जवळून रोख ३२ हजार ५०० रुपये, ७ मोबाईल हँडसेट, ५ दुचाकी वाहने, १ चादर व ताश पत्ते असा एकूण ३ लाख २७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल केशवराव नागतुरे (३२) रा. काजीपुरा, शुभम शंकर टेकाम (२४) रा. चिखलगाव, सुगत किसान पेटकर (२७) रा. जैताई नगर, विजय रामकृष्ण बोधाने (३२) रा. चिखलगाव, अमोल विजय ठाकरे (२६) रा. चिखलगाव, विठ्ठल भिवसन कष्टी (३९) रा. चिखलगाव, निखिल गणेश धारणे (२८) रा. चिखलगाव, गौरव मधुकर टोंगे (२५) रा. विठ्ठलवाडी, दिनेश शेषराव बदखल (३५) रा. बोधेनगर, प्रतीक राजेश्वर चिडे (२२) रा. चिखलगाव, अविनाश विठ्ठलराव सोनुले (२५) रा. जैताई नगर, अक्षय राजेंद्र दडांजे (२२) रा. चिखलगाव, मंगेश रामजी वैद्य (३०) रा. बोधे नगर यांचा समावेश असून यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन करून सोशल डिस्टंनसीन्गचे पालन करता विना मास्क पत्ते खेळतांना आढळल्याने भादंविच्या कलम १८८,२६९ व सहकलम ४,५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, डीबी प्रमुख गोपाल जाधव, सुधीर पांडे, सुदर्शन वानोळे,सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, अमित पोयाम यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहे.
लाईक
कमेंट
शेअर
← मागे
1649
1650
1651
1652
पुढे →
होम
शोध
लॉगिन
शेअर
🔔
Warora News सूचना
ताज्या बातम्या लगेच मिळवण्यासाठी सूचना चालू करा
🔔 चालू करा
नको
✅ सूचना चालू झाल्या!
Warora News App
होमस्क्रीनवर इन्स्टॉल करा · जलद · ऑफलाइन
नंतर
📲 इन्स्टॉल
×
×
Warora News
होमस्क्रीनवर App इन्स्टॉल करा
हे करा (Safari मध्ये):
Share बटण दाबा
Safari च्या खाली (↑ हे चिन्ह)
"Add to Home Screen" निवडा
स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" दाबा
↓
Safari Share बटण खाली आहे